Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३

त
तुषार काळभोर
Sat, 12/12/2015 - 07:11
🗣 176 प्रतिसाद
सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २ १०० प्रतिसाद झाल्याने (व सध्या संमं हायबरनेट झाल्याने,) मीच तिसरा भाग सुरू करतोय. जानेवारीच्या ८-१० तारखेला महाबळेश्वरला जायचे नियोजन आहे. (प्रेरणा: चौदहवी कि रात). मागच्या वेळी प्रतापगड रस्त्यावर मधुसागरच्या मागे असलेल्या ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन चांगलं आहे. एकदम जंगलाच्या मध्ये असल्यासारखं. खोल्याही चांगल्या आहेत. परत तिथेच जाणे हा पर्याय आहेच, तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय. मागच्या वेळी दोघे गेलो होतो. यावेळी दीड वर्षाचा मुलगाही बरोबर आहे. बजेट अंदाजे २५००-३००० प्रति रात्र. (स्वतःची गाडी न्यायची आहे. पार्किंगची व्यवस्था हवी.).हॉटेल्/रिसॉर्टमध्ये जेवण्याची व्यवस्था नसेल वा चांगली नसेल तरी चालेल. गावात जाऊन जेवता येईल. ठिकाण मात्र असे हवे जिथे 'कुटुंब' नेता येईल. धन्यवाद!
वर्गीकरण
माहिती

प्रतिक्रिया द्या
54255 वाचन

💬 प्रतिसाद (176)
भ
भीमराव Sat, 12/12/2015 - 10:19 नवीन
माझा बी १ प्रश्न हाय, दखल मधले सगळे जुने लेख कुठे वाचायला मिळतील?
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 12/12/2015 - 17:05 नवीन
पूर्वी CNBC वर GE corporation ची tion असलेल्या भरपूर शब्दांचा गाण्यात वापर करुन बनवलेली एक जाहिरात लागायची ती कोणती? त्याची लिंक मिळेल का? किंवा पूर्ण गाणे कोठे मिळेल?
  • Log in or register to post comments
G
gogglya Tue, 12/15/2015 - 11:49 नवीन
शहरात न जाताही पोहोचु शकता bright land हॉटेल च्या वळणावरुन. पुण्यात बुकींग होते. एकदम शांत जागा आहे. मुख्य म्हणजे पोट-माळा असलेल्या रूम आहेत, मुलांना मजा येते जिन्यावरून ये-जा करायला.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 12/16/2015 - 07:30 नवीन
लोकेशन जबरा आहे. पण.. बजेटच्या थोडं बाहेर आहे. :) २ रात्रींचे २२,००० होतात. माझं बजेट अंदाजे ३०००-३५०० रुपये प्रतिरात्र आहे. (विथ ऑर विदाउट फूड)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gogglya
श
श्रीरंग_जोशी Tue, 12/15/2015 - 23:08 नवीन
वाटाण्याच्या अक्षता या वाकप्रचाराची व्युत्पत्ती कुणी सांगू शकेल काय? हा धागा सुरू करण्याबद्दल धन्यवाद पैलवानसाहेब.
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त Tue, 12/22/2015 - 08:40 नवीन
अक्षत-कपाळीं लावलेल्या गंधांत काळ्या रंगाचा जो टिकला लावतात तो किंवा तें गंध. वाटाण्याच्या अक्षता लावणें = साफ नाकारणें.वाटाणे वाटोळे असल्यामुळें कपाळास चिकटून राहत नाहींत म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Tue, 12/22/2015 - 15:29 नवीन
अर्थ सांगण्यासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीडस्त
त
तुषार काळभोर Mon, 12/21/2015 - 04:03 नवीन
'सुरज का सातवा घोडा' पुस्तकाचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे का? ऑनलाईन कुठे दिसत नाही. (आख्ख्या इंटरनेटवर सुद्धा कसलाही उल्लेख नाहीये भाषांतराचा). कुणी पाहिलंय/ऐकलंय का मराठी भाषांतराविषयी?
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 12/22/2015 - 06:26 नवीन
माझ्याकडे एक लाकडी अलमारी आहे, अतिशय चांगल्या कंडिशन मधे ! कमीतकमी ७०-८० वर्षांपूर्वीची. त्यावर मधल्या काळात कुणीतरी रेड अॉक्साईड नाहीतर अॉइल पेंट मारला होता. त्यामुळे त्याचे लाकूड झाकल्या गेले . काल तो कलर काढण्यासाठी abrasive paper चा वापर केला असता थोडा ओरीजनल लाकडी भाग दिसला जो की अतिशय सुंदर आहे. आता प्रश्न असा आहे की त्या लाकडावरील red oxide कसे काढावे? Abrasive paper ने काढणे अतिशय मेहनतीचे व वेळखाऊ काम आहे. यापेक्षा काही सोपा उपाय करता आला तर मदत होईल .
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 12/22/2015 - 07:29 नवीन
"पेंट रिमूव्हर केमीकल" मिळते ते थोड्या भागावर वापरून बघा. मात्र त्याचा लाकडावर काही परिणाम होणार का याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
स
संदीप डांगे Tue, 12/22/2015 - 07:43 नवीन
वेळखाऊ असले तरी अब्रेझिव पेपरनेच काढा. पेंट रीमूवरने एका दिवसात काम होईल पण लाकूड डॅमेज होइल. त्यापेक्षा महिना गेला तरी पेपरने घासून काढा. चांगल्या लाकडाची काळजी घ्यायलाच पाहिजे. चांदवडच्या होळकर महालाच्या कलाकुसरीवरचं आधीचं रंगकाम घासूनच काढलंय. किती पेशन्स असावे याचा उत्तम नमुना, तुम्हालाही प्रेरणा मिळेल. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
र
रुस्तम Tue, 12/22/2015 - 10:07 नवीन
१ नंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आदिजोशी Tue, 12/22/2015 - 14:11 नवीन
त्या माणसाला शोधून आत टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 12/22/2015 - 15:25 नवीन
पेंट म्हणजे काहीतरी काळ्या रंगाचं उपयुक्त रसायन होतं. रिनोवेशनची प्रक्रिया सुरू असल्याने सर्व खरवडून काढलंय. पुन्हा कुठलंतरी रसायन लावणार आहेत. त्याचा काय रंग असेल देवजाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
र
रेवती Tue, 12/22/2015 - 14:21 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
उ
उगा काहितरीच Tue, 12/22/2015 - 15:02 नवीन
दंडवत पेशन्सला ! कारण कुठल्याही प्रकारची कलाकुसर नसलेल्या लाकडावरचा रंग काढायला किती मेहनत लागते हे अनुभवतो आहे कालपासुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 12/22/2015 - 15:26 नवीन
;-) लगे रहो. शेवटी जो आनंद होइल तो निव्वळ अवर्णनीय असेल...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
प
पिलीयन रायडर Wed, 12/23/2015 - 12:38 नवीन
कोलाडला कुणी रिव्हर राफ्टींग केलंय का? आणि मुक्काम केलाय का / कँपिंग केलय का? असल्यास प्लिझ माहिती द्या!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 12/23/2015 - 13:33 नवीन
१. सध्याच्या सीझनमधे करणार असाल तर उत्तम सीझन आहे. २. वैविध्यपूर्ण डास असतात , त्याचा उपाय स्वतः करून जाणे. ३. गोठवणारी थंडी असते. ४.२-३ कपड्याचे एक्स्ट्रा सेट न्या . जंगल ट्रेल असेल तर खरब होतात. ५. अगदी बियास नदीचा फील नसला तरी मजा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
कपिलमुनी Wed, 12/23/2015 - 13:35 नवीन
Kundalika River Rafting यांचा अनुभव चांगला आहे.(काही वर्षांपूर्वीचा , सध्या रीव्हू वाचून जाणे) कँपिगमधे तंबू मिळाल्यास मजा येते पण त्रास ( डास , थंडी ) सहन करायची तयारी ठेवा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 12/23/2015 - 14:11 नवीन
धन्यवाद! पुढच्या एक दोन आठवड्यातच करायचे आहे. कँपिंगचे माहित नाही पण राफ्टींग तरी करुच. http://koladrafting.co.in/ ही साईट चांगली वाटत आहे. रेट्स पुष्कळ आहेत. पण ठिके..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 12/23/2015 - 14:20 नवीन
http://www.riverandforest.com/ हे देखील चांगले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
भ
भुमन्यु Fri, 01/15/2016 - 12:21 नवीन
बर्‍याचदा फसवतात. धरणातुन पाणी सोडले तरच राफ्टींग होऊ शकते. मागच्या वर्षी आमच्या ऑफिसची ट्रीप गेली होती २-३ तास सगळे लाईफ जॅकेट घालून पाणी येण्याची वाट बघत होते. शेवटी पोपट होऊन परतले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
कंजूस Wed, 12/23/2015 - 17:01 नवीन
#लाकूड काळं रसायन : काजळी,जवसाचं तेल,अंड्याचा पांढरा बलक खूप खलून लावलेलं आहे. भारतात अल्कोहोलमध्ये लाख मिसळून लुकण लावणे बहुतेक पोतृगिजांच्या अगोदर नव्हते. होड्यांच्या लाकडांना काजूचं तेल लावतात ते काळं दिसतं आणि लाकूड सडू देत नाही.तेपण नंतरचंच असावं.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 12/23/2015 - 17:19 नवीन
#लाकूड काळं रसायन : काजळी,जवसाचं तेल,अंड्याचा पांढरा बलक खूप खलून लावलेलं आहे. >>> हे बरोबर आहे काका, तिथल्या माणसाने हेच मिश्रण सांगितलं होतं बहुतेक. रिनोवेशन पूर्ण पेशवेकालिन पद्धतींनीच होत असल्याने बर्‍याच असंबंधित वस्तूंची मिश्रणे, त्यांची नावे कानावर पडत असल्याने नेमकं लक्षात राहिलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
D
DEADPOOL Wed, 12/23/2015 - 17:22 नवीन
मिपावर लेखाच्या आधीच्या भागाच्या लिंक कशा द्याव्यात?
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 12/24/2015 - 03:10 नवीन
DEADPOOL यांना त्यांच्या जन्या लेखाची लिंक द्यायची आहे ते असे करता येईल. तुमच्या "घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ "या लेखाची लिंक अशी देता येते- घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ याचे टेम्प्लेट:- <a href="***" target="_blank" >???</a> वरील टेम्प्लेटात *** च्या जागी लेखाची अॅड्रेसबारमधली लिंक कॅापी पेस्ट करायची, ??? च्या जागी लेखाचे नाव वगैरे जे लिहाल त्यामागे लेखाची दडलेली लिंक असते ती क्लिक करता येते. वरच्या उदाहरणात *** = http://www.misalpav.com/node/34204 ??? = घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL गुरुवार, 12/24/2015 - 04:29 नवीन
थँक्स!
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL गुरुवार, 12/24/2015 - 04:32 नवीन
मात्र याचा वापर अँड्रॉइडवर कसा होईल!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 12/27/2015 - 17:56 नवीन
??? अँड्रॉइडशी काय संबंध??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
प
पिशी अबोली Sun, 12/27/2015 - 16:05 नवीन
रस्त्यावर विकले जाणारे कपडे कुठून येतात? ते खरोखरच स्मगल्ड असतात का फक्त रिजेक्टेड माल असतो?
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sun, 12/27/2015 - 16:13 नवीन
भांड्यांच्या बदल्यात घेतलेले, लोकांनी टाकून दिलेले, भिकार्यांनी विकलेले आणि रिजेक्ट झालेले असे सगळेच असतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
ख
खेडूत Sun, 12/27/2015 - 16:14 नवीन
आल्यापासून सुंठ कशी करतात? कुणाला माहीत आहे का?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 12/27/2015 - 17:24 नवीन
आल्याची सालं काढून घेतात. मग ते तुकडे एकदोन दिवस चुन्यात भिजवतात (म्हणजे चुन्याच्या पाण्यात - हे बहुतेक दुकानात मिळतं.) त्या आल्याच्या शिरा दिसायला लागतात. मग ते आलं सावलीत वाळवतात. झाली सुंठ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
र
रॉजरमूर Wed, 01/13/2016 - 09:17 नवीन
चुना कोणता? पानवाल्याकडे मिळतो तो का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Wed, 01/13/2016 - 11:36 नवीन
हो, पण पानवाल्याकडे ज्या डब्या / ट्यूब्ज मिळतात त्यापेक्षा जास्त लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
र
रॉजरमूर गुरुवार, 01/14/2016 - 18:49 नवीन
धन्यवाद........! उपयुक्त माहिति बद्दल. सर्व मिपाकरान्ना मकर सन्क्रान्तिच्या हार्दिक शुभेच्छा....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 02/01/2016 - 12:09 नवीन
चुन्याचे पाणी म्हणजे निवळी का हो आदूबाळ साहेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Mon, 02/01/2016 - 12:28 नवीन
हो. हाच शब्द आठवत होतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
न
नाव आडनाव Sun, 12/27/2015 - 16:58 नवीन
टीव्ही वर लागणार्‍या फॅशन शो मधे घालतात तसे चित्रविचित्र कपडे खरं कोणी घालत नसेल. अश्या फॅशन शो साठी कपडे "डिजाईन" करणार्‍यांना काय फायदा - म्हणजे जर कोणी ते विकत घेणारंच नसेल तर? काही तरी कारण असणार, पण ते मला समजत नाहीय, म्हणून इथे विचारतोय.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 12/27/2015 - 17:04 नवीन
फॅशन डीझायनरने जे डीझाईन केले असते ते विकल्या जातं. घातलेले कपडे नाही. (तेही विकल्या जातात खरे तर) कपड्यांचा पोत, प्रकार, त्यावरचे रंगसंगती, आकार-रेषा, कट्स, इत्यादी बरंच काही असतं. जे नाविन्यपूर्ण आणि बाजारात चालण्यासारखं आहे असे व्यापार्‍यांना वाटतं ते तेवढं उचलून घेतात. त्याबद्दल फॅ-डी शी करार केला जातो. नंतर मार्केटप्रमाणे कपड्यांचे साईझेस तयार करून बाजारात येतात. सविस्तर नंतर लिहिन. ही थंडी हात गोठवून टाकतेय राव!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
भ
भिंगरी Mon, 12/28/2015 - 02:52 नवीन
एखाद्या धागाकर्त्याचे लेखन कसे शोधावे? जसे राजघराणं यांचे 'विज्ञानाच्या चष्म्यातून जाती'हा लेख शोधायचा असल्यास कसा शोधावा?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 12/28/2015 - 03:50 नवीन
त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहाद Primary tabs द्रश्य(active tab) What links here प्रेषक, राजघराणं, Tue, 22/05/2012 - 21:08 यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर - http://www.misalpav.com/node/21602 ********************************************* http://www.misalpav.com/node/21729
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 01/03/2016 - 12:43 नवीन
kindle paper white घ्यायच आहे.. त्याअनुषंगाने प्रश्न- यावर किती मराठी पुस्तक उपलब्ध आहेत ?किती भारतीय भाषातील पुस्तक उपलब्ध आहेत? इतर ठिकाणी उपलब्ध असलेली पुस्तके वाचता येतात का (उदा.bookganga.com,इसाहित्य.कॉम)?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 01/03/2016 - 14:04 नवीन
किंडलवर मराठी पुस्तकं फारशी पाहिली नाहीत. किंडलचे दोन फाईल फॉरमॅट आहेत - .mobi आणि .azw३. त्यात फक्त azw३ मध्ये देवनागरी फॉन्ट रेंडरिंग होतं. आपण आपली पुस्तकं azw३ मध्ये रूपांतरित करून किंडलवर वाचू शकतो. उदा० मी स्पार्टाकस यांची ट्रॅप केली होती. "काही कारणांनी" वैतागून ती डिलिट केली ते सोडा. मिपावरच्या मोठ्या मालिका याप्रकारे किंडलवर वाचण्याचा विचार आहे. माझं किंडल पेपरव्हाईट नसल्याने त्यात इतर सॉफ्टवेअर आणता येत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
भ
भाते Wed, 01/06/2016 - 07:51 नवीन
बहुतेक आहारतज्ञ अंडी खायला सांगताना अंडयाचा केवळ पांढरा भाग खायला सांगतात. मग अंडयातल्या पिवळा बलकाचे काय करायचे? फेकुन द्यायचा का तो? अंडयातल्या पिवळा बलक आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतो का? संपुर्ण अंडे खाल्ले तर काय फरक पडतो?
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Wed, 01/06/2016 - 08:07 नवीन
माझ्या मते एखादे पिवळे बलक खाण्यास काही हरकत नसावी, पिवळ्या भागात जास्त कोलेस्त्रोल असते, त्यामुळे ते टाळण्याचा सल्ला दिला जातो. पांढऱ्या भागात जास्त प्रोटीन असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
प
प्रसाद१९७१ Wed, 01/06/2016 - 11:04 नवीन
मधे कदाचित मिपावर च एक लिन्क मिळाली होती. आता बर्‍याच तज्ञ लोकांचे असे मत झाले आहे की खाण्यातुन कोलेस्ट्रोल जास्त गेले किंवा कमी गेले तरी शरीरातील कोलेस्ट्रोल लेव्हल वर परीणाम होत नाही. जरी कोलेस्ट्रोल कमी खाल्ले तरी शरीर मोठ्याप्रमाणावर कोलेस्ट्रोल बनवतच असते. Cholesterol is no longer a villain. The 2010 guidelines suggested we should limit cholesterol from foods to no more than 300 milligrams daily. (A large egg has about 186 mg of cholesterol.) Experts now say cholesterol is ''not a nutrient of concern," because cholesterol from foods doesn't cause higher blood cholesterol levels.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
न
नितीनचंद्र Wed, 01/06/2016 - 10:27 नवीन
रिव्हर राफ्टींग केलय मजा येते खास करुन पावसाळ्यात जेव्हा कुंडलिका प्रचंड वेगाने वहाते. मी १५ ऑगस्ट २०१५ ला केले आहे. राफ्ट आपोआपच पुढे जात असतो. फक्त दिशा देणे इतकाच भाग रहातो. हिवाळ्यात महत्वाचे चार " रॅपीड " ( जिथे राफ्ट पलटी होण्याची शक्यता असते असा प्रवाह ) असेल की नाही माहीत नाही. माझ्या मते मुक्कामाची आवश्यकता असली तरी तो ह्या अ‍ॅडव्हेचरचा भाग नाही. इंटरनेटवर रिव्हर राफ्टींग चे बुकिंग करुन आपण कोलाडच्या जवळ कुठेही राहु शकता. जय कुंडलिका !
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र Wed, 01/06/2016 - 12:18 नवीन
https://www.linkedin.com/home?trk=nav_responsive_tab_home तुम्ही एल पी जी सिलेंडर वापरता का ? जर दुदैवाने आपल्याला अपघात झाला तर रुपये ४० लाखाचा विमा आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा