Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मदहोश (शायरी)

श — शार्दुल_हातोळकर, Sat, 12/12/2015 - 10:08
हा असा बेधुंद वारा, धुंद मज जातो करुनी मग जणु होऊन गंध, येतेस तू माझ्या मनी खेळ सारा काळजाचा, जालिम हा मद्यापरि ना दिसे ते चेहऱ्यावर, पण ओढ मात्र अंतरी ना कळे मजला तुझे, हे गुढ रम्य हावभाव काय मी वर्णु तयांना, काय त्यासी देऊ नाव एवढे मज जाणवे की, तू तुझी नाहीस आता दूर का मग राहसी तू , कैफ ओसंडुन वाहता या अशा तारुण्यकाळी, हे धुंद रुप यौवनाचे का उगा करतेस मग तू, ढोंग हे परकेपणाचे हाय त्या तुझिया अदांची, काय ती जबरी नशा मी आहे कोठे उभा अन् ना मला कळते दिशा भासेन तुजला रांगडा मी, अन् प्रेमही हे रांगडे पण पोटातले ओठावरीही, अन् बोलणेही रोकडे मी नव्हे मजनु कथेतील, अन् प्रेम नाही आंधळे मी जरी आहे दिवाना, ना लाचारवाणा घुटमळे प्राशुनी प्रेमामृताला, झिंगुनी मदहोश होऊ वाटुदे हेवा जगाला, बेफाम त्या मस्तीत गाऊ उसळु दे काळिज आता, ना आता पर्वा जगाची होऊ दे आपुली कहाणी, प्रेरणा भावी युगाची -शार्दुल हातोळकर

प्रतिक्रिया द्या
3815 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ए
एक एकटा एकटाच Sun, 12/13/2015 - 04:41 नवीन
वाह!!!!!! क्या बात क्या बात क्या बात जियो उस्ताद
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 12/15/2015 - 18:24 नवीन
तुमच्या जिंदादिल प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/15/2015 - 08:56 नवीन
क्या बात
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 12/15/2015 - 10:05 नवीन
ठीक वाटली. लय मधेच सापडते, मधेच बिघडते. पु ले शु
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 12/15/2015 - 18:39 नवीन
या शायरीमध्ये प्रत्येक शेर जरी सर्वसाधारणपणे समान आशयाचा असला, तरी प्रत्येक शेर हा पुर्णपणे स्वतंत्र आहे. मुळात अशा शेर-ओ-शायरीमध्ये गझलप्रमाणे प्रत्येक शेर हा सारख्या लयीत किंवा तालात असण्याचे कोणतेही बंधन असत नाही.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 12/16/2015 - 06:04 नवीन
शेर-ओ-शायरीमध्ये गझलप्रमाणे प्रत्येक शेर हा सारख्या लयीत किंवा तालात असण्याचे कोणतेही बंधन असत नाही.
हे मला ठाऊक आहे. मी स्वतंत्र शेराबद्दलच म्हटलं की एक दोन शेर योग्य वाटतात वाचताना बाकीच्यात सुधार शक्य आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
श
शार्दुल_हातोळकर Wed, 12/16/2015 - 18:28 नवीन
वेल्लाभट तुमच्या म्हणण्यात तथ्य असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण शायरीच्या बाबतची मुख्य अडचण ही आहे की शायरी नुसती वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष सादर केली तरच खरी रंगत येते. कारण प्रत्येक शेरातले चढ-उतार आणि लय वगैरे स्वतः शायरच त्याला अभिप्रेत असे अधिक चांगल्या प्रकारे सादर करु शकतो. बाकी तुमच्या सुचनांचे स्वागतच आहे. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/19/2015 - 16:00 नवीन
भासेन तुजला रांगडा मी, अन् प्रेमही हे रांगडे पण पोटातले ओठावरीही, अन् बोलणेही रोकडे मी नव्हे मजनु कथेतील, अन् प्रेम नाही आंधळे मी जरी आहे दिवाना, ना लाचारवाणा घुटमळे या चार ओळी आवड्ल्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 12/19/2015 - 18:12 नवीन
लिहिलेय चांगले पण का कोण जाणे आजकाल मिपावरच्या सगळ्याच गजला मला एकसारख्याच वाटायल्यात. ते मिसरा, कदीफ(?) वगैरे नियमामुळे तसे होत असावे का? तरी बरय मला काही कळत नाही जास्त ते.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 12/20/2015 - 11:42 नवीन
सर्वांचे आभार !!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 12/20/2015 - 11:42 नवीन
सर्वांचे आभार !!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 12/20/2015 - 11:42 नवीन
सर्वांचे आभार !!
  • Log in or register to post comments
द
देशप्रेमी Sat, 07/15/2017 - 17:30 नवीन
खुपच छान !!! आवडली...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा