Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टेकडी आणि तो..........

ए — एक एकटा एकटाच, Sun, 12/13/2015 - 19:14
आजही तो जात होता त्या टेकडीवर अर्धवट धुंदीत, शरिराला झोकांड्या देत पाउलवाटेची कोडी अंदाजाने सोडवत सरळसोट रस्त्यावरही उगाचची वळणं घेत लहानपणापासून यायचा तो तिथे जणू ती टेकडी त्याची सर्वस्व होती जिवनातल्या सगळ्या चढ-उतारांची त्याच्या ती एकमेव साक्षीदार होती आयुष्यातली प्रत्येक आनंदाची बातमी त्याने सर्वप्रथम तिलाच तर सांगितली होती आजवरच्या भांडणातली आपली बाजू फक्त तिच्याकडेच मोठ्या उमेदीने मांडली होती सगळे डाव मनासारखे जुळून आलेले समृध्दी प्रतिष्ठाही हातांत हात घालुन मिरवीत आली पण ........ अचानक फासे पलटले, दैवाने खो घातला आपलं म्हणवणाऱ्यानीही, आपली खरी ओळख दाखवली त्यानंतर तो वरचेवर तिच्याकडे येउ लागला त्याच्या मनातला आक्रोश, ती शांतपणे ऐकू लागली आयुष्याच्या उतरणीवरचा सुरू झालेला त्याचा जिवघेणा प्रवास, ती हताशपणे पाहु लागली आजही तो परत आला होता तिच्याकडे तहांत स्वतःलाही गमावलेल्या महाराजासारखा पहात होता दूर क्षितिजाला, तिच्या डोक्यावरून वाटत होता बेफिकीर तरी आतुन खचल्यासारखा दुसऱ्याच क्षणाला तो तिथुन गायब झाला तिच्याशिवाय त्यानंतर तो कुणालाच गवसला नाही आताही येतो तो नेमाने, दर पुनव - अवसेला बाकी कुणी आता तिच्याकडे चुकूनही फिरकत नाही

प्रतिक्रिया द्या
2216 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
पद्मावति Sun, 12/13/2015 - 20:24 नवीन
बापरे! मस्तं लिहिलंय.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Mon, 12/14/2015 - 03:09 नवीन
मस्त लिहीलय
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Mon, 12/14/2015 - 10:25 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 12/14/2015 - 13:19 नवीन
खूप मस्त.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 12/15/2015 - 18:18 नवीन
सगळ्यांचे आभार
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Wed, 12/16/2015 - 07:57 नवीन
१ नंबर . आवडल
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/16/2015 - 08:32 नवीन
छान रे ..
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/16/2015 - 08:32 नवीन
छान रे ..
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Wed, 12/16/2015 - 18:45 नवीन
जबरदस्त!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/16/2015 - 19:36 नवीन
आवडलं
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 12/18/2015 - 09:06 नवीन
धन्यवाद सगळ्यांचे
  • Log in or register to post comments
आ
आनंद कांबीकर Sat, 12/19/2015 - 08:41 नवीन
...
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 12/19/2015 - 13:08 नवीन
अप्रतिम.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा