घरट्याची ओढ
वेळूच्या बनात
एक पाखरू एकटे
शीळ देई वारियाला
सांगे जा तू घरट्याला
वारा उनाड बावरा
घुमे वेळूच्या भवती
म्हणे वेळूचे गे गाणे
गळा भर, पाखराला
पारा उन्हाचा महान
लखलख मृगजळ करी
कंठी पाखराच्या परि
पाऊस घरचा ओला
जीव बनी अडकला
जीव एक घरट्यात
देई हळवा संधिकाल
बळ नाजूक पंखाला
- संदीप चांदणे
💬 प्रतिसाद
(21)
प
प्रचेतस
Mon, 12/14/2015 - 09:22
नवीन
अप्रतिम कविता संदिप.
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Mon, 12/14/2015 - 09:26
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 12/14/2015 - 09:30
नवीन
वा वा वा वा वा! अप्रतिम काव्य.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 12/14/2015 - 09:55
नवीन
___/\___
प्रतिसादासाठी धन्यवाद!
प्रचेतस आणि गुर्जींचे प्रतिसाद नेहमीच सुखावून जातात तर ३ए सरांचा प्रतिसाद म्हणजे एका कवीची अनमोल दाद!
धन्यवाद,
Sandy
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 12/17/2015 - 05:59
नवीन
धन्यवाद संदीप
पण चांगल्या कलाकृतीला दाद ही मिळाल्याशिवाय कधीच रहात नाही.
असेच लिहित रहा....
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 12/17/2015 - 06:02
नवीन
सर नका म्हणु.....
एकेरी उल्लेख all ways welcome.
तेव्हढीच सहजता रहाते.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 12/17/2015 - 06:15
नवीन
वोक्के....नोटेड!
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
Wed, 12/16/2015 - 18:43
नवीन
सुंदर शब्दरचना....
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Wed, 12/16/2015 - 18:50
नवीन
कविता आवडली.
पण ...
शेवटच्या कडव्यात काहीतरी गडबड वाटली.
पुन्हा जरा निवांतपणे वाचते.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 12/17/2015 - 06:38
नवीन
देई हळवा संधिकाल
बळ नाजूक पंखाला
ह्याएवजी
लागे हळव्या संध्याकाळी
पिसे नाजूक पंखांना
चालले असते असे वाटते का?
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 12/17/2015 - 07:04
नवीन
शब्दरचना उत्तम आहे... पण अपेक्षित अर्थापासून दूर चालल्यासारखी वाटते! :)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 12/18/2015 - 07:04
नवीन
अर्थात सॅन्डी.
मला जर कविता करायला येत असती तर.... :(
.
असो. नाही येत तेच बरेय ;)
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Fri, 12/18/2015 - 08:44
नवीन
तुम्हाला एक ट्राय करायला काय हरकत आहे.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Wed, 12/16/2015 - 22:27
नवीन
मस्तचं की!
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
गुरुवार, 12/17/2015 - 05:45
नवीन
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 12/17/2015 - 05:50
नवीन
कवीता..
मस्त
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 12/17/2015 - 06:20
नवीन
___/\___
आतिवासताईञ्च्या निवांत वाचनानंतरच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असलेला...
Sandy
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 12/17/2015 - 06:36
नवीन
अरे सॅण्डीबाबा त्या बुलेट ट्रेन अन नास्तिक आस्तिकाच्या घोळात हे राह्यलेच की वाचायचे.
सॉल्लीड जमलीय.
पंखांना असलेली ओढ भिडली रे एकदम.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 12/17/2015 - 07:02
नवीन
___/\___
असंच होतंय आजकाल मिपावर माझपण! :(
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 12/17/2015 - 15:33
नवीन
सुरेख लय आहे कवितेला. आवडलीच ..
- Log in or register to post comments
द
देशप्रेमी
Tue, 01/17/2017 - 14:47
नवीन
सुंदर काव्यरचना.!!
निखळ भावना अलगदपणे मांडलेल्या आहेत..
- Log in or register to post comments