Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'सात' वार, 'आठ' वडा?

न
निमिष सोनार
Mon, 12/14/2015 - 09:46
🗣 21 प्रतिसाद
एकूण वार 'सात' आहेत. हिंदी मध्ये आठवड्याला सप्ताह म्हणजे सप्त (सात) वारांचा समूह म्हणतात पण मराठीत त्याला 'आठ'वडा का म्हणतात? मला पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर कुणाला माहित असेल तर सांगावे. माझा प्रश्नच चुकीचा असेल किंवा गृहितकं चुकत असतील तर तसे ही सांगावे. धन्यवाद!!
वर्गीकरण
प्रश्न

प्रतिक्रिया द्या
4563 वाचन

💬 प्रतिसाद (21)
प
प्रसाद१९७१ Mon, 12/14/2015 - 10:57 नवीन
मराठी लोकांना हिंदी लोकांपेक्षा एक जास्त अंक मोजता येतो हे दाखवून द्यायचे असेल. किंवा मराठी लोकांना ७ पर्यंतचे अंक पण नीट मोजता येत नसतील, एक , दोन, तिन, चार, पाच, सात आणि आठ असे झाले असेल.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 12/14/2015 - 10:59 नवीन
बाबा "सप्ताह " पाहिलाय सगळीकडे सौजन्य सप्ताह, वगैरे आठवडा हे बाजाराशी संबधीत असावे.. आठवडी बाजार
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 12/14/2015 - 11:07 नवीन
माझा प्रश्नच चुकीचा असेल किंवा गृहितकं चुकत असतील तर तसे ही सांगावे.
आजीबात चुकत नाहीये एवढच मी सांगू शकतो ;-) Sandy
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 12/14/2015 - 11:31 नवीन
रैवारी दोन वडे खायची प्ध्दत असते हो. टोटल सात वार आठ वडा. बरोबर हाय हिशोब.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 12/14/2015 - 11:38 नवीन
बहुधा ते आठवा दिवस या अर्थाने प्रचलित झाले असावे.. अजूनही आमच्याकडे रविवार रविवार आठ, सोमवार नऊ असे मोजायची पद्धत आहे.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Mon, 12/14/2015 - 11:47 नवीन
याच पानावर सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३ या ठिकाणी पुन्हा हाच प्रश्न विचारावा- उत्तर मिळू शकते !!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 12/14/2015 - 11:52 नवीन
दर आठव्या दिवशी नवीन सुरू होतो तो आठ-वडा
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 12/14/2015 - 12:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 12/14/2015 - 13:27 नवीन
हायला जव्हेरभऊ जिफ्फ चालतेत काय मिपावर? म्हैतच नव्हते राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
अ
अभ्या.. Mon, 12/14/2015 - 13:29 नवीन
Image removed. . . आता मज्जा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सुनील Mon, 12/14/2015 - 13:57 नवीन
त्याचा संबंध "आठ"शी नसून "हाट"शी आहॆ.
  • Log in or register to post comments
ज
जातवेद Mon, 12/14/2015 - 14:03 नवीन
आठवडा या शब्दातून आठ हा शब्द बाहेर काढला तर उरलेल्या वडयाचा सप्ताहाशी काही संबंध लागतोय काय?
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 12/14/2015 - 14:26 नवीन
सोम- बटाटावडा.. मंगळ- मेदुवडा.. बुध- दहिवडा.. गुरु- शाबुवडा.. शुक्र-कोंबडी वडा.. शनि- ?? वडा.. रवि- ?? वडा.. सोम- बटाटा वडा......... . . ....
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Mon, 12/14/2015 - 16:25 नवीन
शनीवारला उडिदवडा जेप्या... शनीमहाराजांचा आवडता प्रसाद तो... रवीवारला पाहिजे तर गहु व गूळ या रवीमहाराजांच्या आवडीच्या वस्तुंचा नवीन वडा शोधून काढा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नीलमोहर Mon, 12/14/2015 - 17:16 नवीन
शनि- ह्याला वडा.. रवि- त्याला वडा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सूड Mon, 12/14/2015 - 14:27 नवीन
शनि- कट वडा.. रवि- भाजणी वडा..
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Mon, 12/14/2015 - 16:15 नवीन
जबरदस्त प्रश्न. तुमचे प्रश्न वाचून मला एक प्रश्न पडला - सातंच वार असतांना लुगडं "नऊ"वार का असतंय. सहावार-नऊवार लॉजिक चूक आहे. सात वार असतांना लुगडं कसंकाय नऊवार? कुछ तो गडबड है दया ...
  • Log in or register to post comments
स
साती Mon, 12/14/2015 - 19:25 नवीन
अहो ते सोडा, काही मॉडर्न म्हणवणार्‍या बायका सात वार असतानादेखिल पाच वार/ सहा वार साड्या नेसतात. (कपड्याची बचत करायला.) वात्रट मेल्या! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
म
मास्टरमाईन्ड Mon, 12/14/2015 - 19:49 नवीन
पटलं आपल्याला. ;)
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Mon, 12/14/2015 - 20:18 नवीन
वात्रटा , ' ते सोडा ' म्हणजे नेमके काय सोडा ? लुगडे की बोलणे ? नाही , मनात शंका म्हणुन विचारले हो ! !
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 12/14/2015 - 20:22 नवीन
जाउद्याना भौ कायले मिपाकरायच्या डोक्याले त्रास दिउन रायले ?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा