Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चांदणधुळ

प — पालीचा खंडोबा १, Tue, 12/15/2015 - 06:38
चांदणधुळ माळुनी केसात आजही तू तशीच दिसतेस सोडुनी आलो कळीला तरीही टवटवीत भासतेस ! उल्कापाताचे खडे आजही जपलेत कालचे कृष्णमेघ रूपेरी जाहलेत तशीच ओढ अजुनी आहे बरसण्याची शिशिरगोठल्या ओठी स्मित टेकविण्याची ! काळात हरवलेली सय पुनश्च मिलनाचे भय जाळीदार पिंपळपानापरी हृदयी कोरले पुन्हा आठवणींचे पुस्तक जोडले ! वळुनी जातानाची नजर हृदयी बंद आहे अत्तरकुपीपरी युगे लोटली अनेक साहवासाची उर्मी साठवली उरी ! फिरुनी आलीस तू सामोरी मनाची जाहाली भिंगरी देऊनी गेलीस बगल हलकेच पुन्हा तीच उरी शिरशिरी ! विजयकुमार................. 01 / 01 / 2009

प्रतिक्रिया द्या
4478 वाचन

💬 प्रतिसाद (32)
अ
अभ्या.. Tue, 12/15/2015 - 06:55 नवीन
वाचताना लय नाही सापडत पण.. कवितेतली वेदना जाणवतेय. लिहित राहा खंडेराया
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 12/15/2015 - 07:25 नवीन
सुरेख रचना. शब्दांमधून अंतरीची रुखरुख, सल पोचला आहे.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Tue, 12/15/2015 - 08:22 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
क
कहर Tue, 12/15/2015 - 09:51 नवीन
फिरुनी आलीस तू सामोरी मनाची जाहाली भिंगरी मस्तच उपमा उपमेय उपमान यमक शब्द्छंद नादब्रम्ह अलंकार वृत्त साऱ्या परीमानांना पुरून उरलेली रचना … मला वाटते पण "देऊनी गेलीस बगल" पेक्षा "मारून गेलीस बगल" जास्त छान वाटले असते …
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/15/2015 - 11:26 नवीन
प्रतीसादाबद्दल धन्यवाद आहो तो प्रौढ वयातील प्रियकर असे कसे म्हणेल मरून गेलीस वगैरे, कारण नकळत बगल देतात म्हजे अचानक सोडून गेली किंवा जाणे बगल देतात मारत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
क
कहर Wed, 12/16/2015 - 10:44 नवीन
बॉस खास तुमच्यासाठी तुमच्याच शैलीत आमच्याकडून दोन ओळी चहाच्या गाळणीतून जेव्हा चांदण्या गाळल्या तेव्हा वाळूतून तेल निघाल्याप्रमाणे उस्फुर्तलास रे खंडेराया बाळंतीण अधाशासारखी निहारात होती दर्पण आणि दूर क्षितिजावर समुद्र लाटांच्या डिजे वर वाजवत होता … बानुबया बानुबया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
प
पालीचा खंडोबा १ Wed, 12/16/2015 - 11:37 नवीन
मस्तच वा वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
ज
जव्हेरगंज Wed, 12/16/2015 - 11:55 नवीन
आणि दूर क्षितिजावर समुद्र लाटांच्या डिजे वर वाजवत होता … बानुबया बानुबया
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
च
चांदणे संदीप Wed, 12/16/2015 - 17:00 नवीन
लाटांच्या डिजे वर वाजवत होता … बानुबया बानुबया
=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
श
शार्दुल_हातोळकर Tue, 12/15/2015 - 18:52 नवीन
अतोनात ताकद आहे या शब्दांमध्ये.... छानच आहे कविता... उल्कापाताचे खडे आजही जपलेत कालचे कृष्णमेघ रूपेरी जाहलेत तशीच ओढ अजुनी आहे बरसण्याची शिशिरगोठल्या ओठी स्मित टेकविण्याची !
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 12/16/2015 - 04:37 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 12/16/2015 - 10:32 नवीन
काही काही शब्द खूप आवडले, जसे चांदणधू़ळ, शिशिरगोठल्या..
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 12/16/2015 - 22:28 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
न
निनाव गुरुवार, 12/17/2015 - 12:00 नवीन
अत्तरकुपीपरी युगे लोटली अनेक साहवासाची उर्मी साठवली उरी ! .....हे खूप आवड्ले.
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 12/17/2015 - 12:06 नवीन
या खंडोबाला चॅलेंज नाही बाय द वे जेजुरी वाचली का हो तुम्ही ?
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Wed, 12/23/2015 - 12:19 नवीन
जेजुरी काय आहे ? हल्ली वयोमानाप्रमाणे लक्षात काही रहात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ब
बोका-ए-आझम Tue, 12/29/2015 - 17:29 नवीन
जेजुरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
स
सुमीत भातखंडे Wed, 12/23/2015 - 13:27 नवीन
नाही फार....तरी पण आवडली
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 12/26/2015 - 16:39 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 12/26/2015 - 17:35 नवीन
कविता आवडली खंडेराया. चांदणचकवा आठवली कवितेच्या शीर्षकावरून
  • Log in or register to post comments
स
समीर_happy go lucky Sat, 12/26/2015 - 17:44 नवीन
कृपया खर्या कवीचे नाव टाका,हि कविता तुमची नाही, मी या आधी ऑर्कुटवर वाचलेली आहे, हि "पुनश्च हरिओम" यांची कविता आहे, अश्या चोर्या मार्या बंद करा !!!!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 12/26/2015 - 17:50 नवीन
01 / 01 / 2009
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/29/2015 - 06:39 नवीन
समीर आभार मित्रा पण तुझ्या माहितीसाठी सांगतो मीच पुनश्च हरिओम आहे . लक्ष्यात ठेवल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/29/2015 - 09:20 नवीन
आभार मित्रा पण तुझ्या माहितीसाठी सांगतो मीच पुनश्च हरिओम आहे . लक्ष्यात ठेवल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीर_happy go lucky
च
चांदणे संदीप Tue, 12/29/2015 - 10:41 नवीन
पुनश्च सांगितलेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/29/2015 - 06:39 नवीन
समीर आभार मित्रा पण तुझ्या माहितीसाठी सांगतो मीच पुनश्च हरिओम आहे . लक्ष्यात ठेवल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
स
समीर_happy go lucky Wed, 12/30/2015 - 16:17 नवीन
धन्यवाद सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 12/29/2015 - 10:50 नवीन
विजय हे आमचे जुने ओर्कुट मित्र आहेत...त्यांच्या कवितेचे आम्हा ओरकुटकर फ्यान आहोत..
  • Log in or register to post comments
स
समीर_happy go lucky Wed, 12/30/2015 - 16:18 नवीन
प्लस वन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 12/29/2015 - 10:58 नवीन
विजय हे आमचे जुने ओर्कुट मित्र आहेत...त्यांच्या कवितेचे ,आम्हि ओरकुटकर फ्यान आहोत..
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Tue, 12/29/2015 - 15:10 नवीन
अविनाश काका आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
ब
बोका-ए-आझम Tue, 12/29/2015 - 17:27 नवीन
पुनश्च मीलनाचे भय - हे काही समजलं नाही. :(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा