Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सॅचुरेशन पॉइंट

व — विशाल कुलकर्णी, Wed, 12/16/2015 - 08:18
एक सूर्य चांदण्या रात्री संथ जलाशयात खड़े मारत बसलेला दिसला 'रस्ता चुकलायस का मित्रा?' त्याच्या शेजारी बसत, हसत विचारले म्हणाला ... कंटाळा आला राव ! रोज रोज पूर्वेकडे उगवायचं स्वत:लाच जाळत मावळतीकड़े जायचं.. रोजचा जन्म आणि रोजचाच मृत्यु ते काय म्हणता तुम्ही? संपृक्तता की काय, तशी स्थिती आलीय बहुदा काहीतरी नवीन.. काही वेगळं करावंसं वाटतय मित्रा एखादी हळुवार कविता ऐकावी एखाद्या चित्रात संध्याप्रकाश व्हावं अगदीच काही नाही तर गेलाबाजार एखाद्या आमराईत मस्त ताणून द्यावी आणि मग... शांतपणे पाण्यावर उठणारे तरंग पाहात बसला एक विलक्षण शांतता.. वाऱ्याची नाजुकशी सळसळ अचानक कुठुनतरी पाखरांची किलबिल कानी आली आणि गडबडून उठला बिचारा... जातो मित्रा, अप्रेजलची वेळ झाली "तुलाही अप्रेजल मिळते?" हळुवार हसला, म्हणाला.. रोजची सकाळ इथे कुणा ना कुणासाठी एक आशेचा किरण घेवून येते रे त्या चेहऱ्यावर उमटलेलं हसु हेच माझं अप्रेजल तुला वर्षातून एकदाच मिळतं माझ्या बाबतीत त्याला 'सॅचुरेशन पॉइंट' नाही तेवढेच काय ते सुख ! पूर्वा पुन्हा उजळायला लागली होती ... विशाल

प्रतिक्रिया द्या
6473 वाचन

💬 प्रतिसाद (35)
ए
एक एकटा एकटाच Wed, 12/16/2015 - 08:52 नवीन
जबरदस्त विशाल दा काय सॉल्लिड कल्पना आहे यार
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 12/16/2015 - 10:32 नवीन
वाह! मस्तं कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 12/16/2015 - 10:54 नवीन
.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 12/16/2015 - 10:57 नवीन
कुठून सुचते बे?? ___/\___
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/16/2015 - 11:03 नवीन
जातो मित्रा, अप्रेजलची वेळ झाली "तुलाही अप्रेजल मिळते?" हळुवार हसला, म्हणाला.. रोजची सकाळ इथे कुणा ना कुणासाठी एक आशेचा किरण घेवून येते रे त्या चेहऱ्यावर उमटलेलं हसु हेच माझं अप्रेजल तुला वर्षातून एकदाच मिळतं माझ्या बाबतीत त्याला 'सॅचुरेशन पॉइंट' नाही तेवढेच काय ते सुख ! पूर्वा पुन्हा उजळायला लागली होती ...
टाळया..
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/16/2015 - 12:19 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 12/16/2015 - 13:08 नवीन
क्लास्स!
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 12/16/2015 - 13:15 नवीन
मुक्तक
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Wed, 12/16/2015 - 13:19 नवीन
मस्त कल्पना.जबारा !!!
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Wed, 12/16/2015 - 13:28 नवीन
आवड्यास.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Wed, 12/16/2015 - 13:59 नवीन
मस्त कल्पना आहे
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 12/16/2015 - 14:04 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
स
सचिन Wed, 12/16/2015 - 14:12 नवीन
अनोखी कल्पना !!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 12/16/2015 - 15:00 नवीन
मस्त रे विशाल. आवडले अप्रेजल.
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 12/16/2015 - 15:03 नवीन
मस्त कविता. बर्‍याच दिवसांत तुमच्याकडून मुक्तछंदातलं काही वाचायला मिळालं नव्हतं. (किंवा माझ्या नजरेतून सुटलं असेल.)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/16/2015 - 16:16 नवीन
धन्यवाद मंडळी _/\_ एस, खुप दिवसात मुक्तछंदात काही लिहीलेच नव्हते. किमान मराठीत तरी नाहीच. हिंदीत काही लिखाण केलय तितकंच. वानगीदाखल ... उस पीपल के पेड के तले बहुत सी तनहाईयाँ रहती हैं अपनी ही... खामोशीयोंमें सिमटी हुयी एक चाँद आजकल पीपल केँ... चक्कर काटते देखा है मैं ने कुछ मायूस, कुछ तनहा-तनहा खोया-खोयासा रहता हैं जैसे निकला हो... किसी की तलाश में कसमसा के रह जाता है पीपल कुछ बोल नही पाता पर बहुत कुछ बोलती हैं पत्तीयों में उलझी खामोशियाँ जैसे महसूस कर रही हो उस खामोश दर्द कों मैं जानता हूँ ... चाँद चुप्पी नही खोलेगा किसी ना किसी दिन मुलाक़ात होगी उस की चांदनी से... पुछूँगा नही मैं हाल-ए-बेकरार कभी तो रोशनी का मंजर होगा उजालों से मुलाकात होगी मैं इंतज़ार करुंगा उस मुस्कुराहट का ! विशाल...
  • Log in or register to post comments
स
सटक Wed, 12/16/2015 - 16:37 नवीन
क्या बात!! तरल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
ए
एक एकटा एकटाच Wed, 12/16/2015 - 16:39 नवीन
वाह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
प
पैसा Wed, 12/16/2015 - 16:30 नवीन
खासच लिहिलंस! वरची दुसरी हिंदी कविता पण मस्त आहे!
  • Log in or register to post comments
स
सटक Wed, 12/16/2015 - 16:39 नवीन
एक सूर्य
खूप आवडली ही प्रतिमा!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 12/16/2015 - 17:09 नवीन
मस्त कविता.
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 12/16/2015 - 17:16 नवीन
फार सुंदर आहेत दोन्ही कविता.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/16/2015 - 18:11 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 12/16/2015 - 18:35 नवीन
कल्पनाच अफलातून आहे! :) दुसरी हिंदी कविताही गुलजारच्या अंगानं जाणारी वाटली. तीही सुरेख आहे. -------------------------------- कविता आवडली की आपली दाद अटळ असते......ही घ्या..... एक नवरा चांदण्या रात्री काचेच्या पेल्यात 'खड़े' टाकत बसलेला दिसला 'ब्रँड चुकलाय का मित्रा?' त्याच्या शेजारी बसत, हसत विचारले म्हणाला ... कंटाळा आला राव ! रोज रोज पहाटेला उठायचं स्वत:लाच सावरत किचनकड़े जायचं.. रोजचीच पत्ती आणि रोजचीच साखर ते काय म्हणता तुम्ही? संपृक्तता की काय, तशी स्थिती आलीय बहुदा काहीतरी नवीन.. काही वेगळं व्हावंसं वाटतय मित्रा एखादा हळुवार हात चहाचा कप घेऊन यावा एखाद्या बशीत खारी आणि बिस्किटं असावीत अगदीच काही नाही तर गेलाबाजार एखाद्या पहाटे मस्त ताणून तरी देता यावी आणि मग... शांतपणे द्रवावर उठणारे तरंग पाहात बसला एक विलक्षण शांतता.. एसीची गंभीर घरघर अचानक वरच्या मजल्यावरुन घड्याळ्याचा गजर कानी आला आणि गडबडून उठला बिचारा... जातो मित्रा, चाहा मिळायची वेळ झाली "तुलाही चाहा मिळते?" ओशाळतं हसला, म्हणाला.. रोजची सकाळ इथे माझ्यासाठी एक आशेचा किरण घेवून येते रे चहाच्या कपाने तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसु हीच माझी चाहा तुला वर्षातून एकदाच मिळते माझ्या बाबतीत त्याला 'सॅचुरेशन पॉइंट' नाही तेवढेच काय ते सुख ! आधण पुन्हा उकळायला लागलं होतं ...
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/16/2015 - 18:58 नवीन
मुजरा सरकार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 12/17/2015 - 05:38 नवीन
जबरदस्त मस्तच खासच म्हणुन साला मला मिसळपाव खुप आवडते ते ह्याच गोष्टी साठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ज
जव्हेरगंज गुरुवार, 12/17/2015 - 05:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
न
नाखु गुरुवार, 12/17/2015 - 06:07 नवीन
काव्य पेल्यावर, हा उतारा पेलाही खास... मिपा असं आहे असंच राहील "जिंदा दील" (न कुठे परीक्षाण येताही) प्रतिसाद मात्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/16/2015 - 18:56 नवीन
खुप छान ! सुंदर कल्पना !! अवांतर : आजचा दिवस काहीतरी खास असणार ... तब्बल दोन नव्या क्लासिक कविता एकाच दिवसात वाचायला मिळाल्या !!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 12/16/2015 - 18:59 नवीन
ती किती तरल कविता आहे रे चैतन्यची. प्रचंड आवडली यार. धन्स शेयर केल्याबद्दल !
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 12/16/2015 - 22:26 नवीन
दोन्ही कविता आवडल्या! हिंदी तर एकदम गुलज़ारचीच वाटतीये!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 12/17/2015 - 05:02 नवीन
कमाल लिहिलियेस रे.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 12/17/2015 - 07:25 नवीन
.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर गुरुवार, 12/17/2015 - 08:27 नवीन
दोन्ही कविता सुरेख, तरल..!! चतुरंग यांची 'चहा' वरील कविता ही सुंदर..
  • Log in or register to post comments
न
निनाव गुरुवार, 12/17/2015 - 12:02 नवीन
+१ निर्विवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा