आतातरी जाग
उठा करुणाकरा
पसरला काळोख
सैतानी प्रवृत्तीची
वाढली लगबग
दयाघना
आतातरी जाग !
क्रूसावरी लटकुनी
करू नका डोळेझाक
आंधळ्या जगात
डोळस सावज
प्रभो
आतातरी जाग !
सीता जरी सुटली
मातले रावण
विवस्त्र द्रौपदीला
पदरात घाल
दयानिधी
आतातरी जाग !
अश्वत्थाम्याच्या शराने
डळमळे उत्तरेचा गर्भ
अनिष्ट प्रव्रुत्तींचा
करा विसर्ग
श्रीहरी
आतातरी जाग !
दिवस ग्रासल्या काळोखाला
दाव प्रकाशास्त्र
रुतल्या रथाचे
सारथ्य त्याग
विश्वरूपा
आतातरी जाग !
विजयकुमार.........
०४.०९.२००९,मुंबई
💬 प्रतिसाद
(2)
व
वेल्लाभट
Wed, 12/16/2015 - 13:07
नवीन
ओक्के
- Log in or register to post comments
न
निनाव
गुरुवार, 12/17/2015 - 11:56
नवीन
apan aplya khaas shailee muLey amuchya apeksha khoopach unchaavlya aahet :).
arthaat , hee kavita cchaan aahech. paN tumhi khoop pudhe nighoon gela aahat. :)
- Log in or register to post comments