Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विटाळ

प — पालीचा खंडोबा १, Fri, 12/18/2015 - 11:41
काचेच्या काळ्या, आरसा नसलेल्या तावदानी फक्त तुझाच चेहरा दिसतो जन्मजात जार तू जारिणीचा संग करतो ! देऊनी माझ्या कळीला फुलाची भूल, काय साधलेस सांगताना जरा शहारते कौमार्याच्या गळी माळलास कामाग्निचा अंगार ! कौमार्याच्या अनवट क्षणी तू शिलगवलास वासनेचा कोळसा माळती माझ्या कुंताली कौमार्ययोग्या आरसा ! कातरवेळी, कुवारवेळेस मी मागते कुकवाचा जोगवा गारठधूक्यात दडल्या चंद्रास माझा विटाळ देईल सांगावा ! तुझ्या परतवाटेस मी फासला शेंदुर गोठणबिंदू गाठणा-या बेवारशी रात्रीस शरीरी पेटे अंगार ! कोवळ्या आर्द्र बोटानी मी चाळवते निखारे उरलेत माझ्या भोगल्या शरीरी रासवटलेले तुझे शहारे ! विजयकुमार.................. 23 / 11 / 2008

प्रतिक्रिया द्या
2404 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/18/2015 - 17:00 नवीन
असाच अपमान हो णार असेल तर ह्या पुढे मि कविता पोस्ट करनार ना हि
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 12/24/2015 - 05:12 नवीन
कविता पोस्ट करायची सक्ती केली आहे का कोणी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
न
निनाव Mon, 12/21/2015 - 16:30 नवीन
जब्बर्दस्त. :) तुम्ही जर का कधी मराठी शब्द शिकविण्य साठी क्लास्सेस वगेरे सुरु केले तर पहिले नाव नोंदणी माझी कराल का प्लीज :)
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 12/21/2015 - 16:52 नवीन
×१ खंडोबा, टाकरे अजून कविता, हम है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाव
त
तुडतुडी Tue, 12/22/2015 - 10:47 नवीन
अश्लील , मसालेदार शब्द वापरून लिहिलेल्या अर्थहीन कविता . सं . मं. ने लक्ष घालावे. ह्या आईडीच्या सगळ्या कविता अश्याच प्रकारच्या आहेत . का रं बाबा ५ बायका कमी पडल्या का तुला ?
  • Log in or register to post comments
म
मारवा Tue, 12/22/2015 - 14:55 नवीन
कविता अत्यंत दर्जेदार आहे एक ही शब्द अनावश्यक नाही अश्लील तर अजिबातच नाही तुडतुडी यांचा प्रश्न अत्यंत अश्लील आहे तुडतुडी यांचा अश्लील प्रश्न सं.मं. ने तपासावा भरचौकात अनो़ळखी पुरुषाला असा प्रश्न विचारणे हे किमान आपल्या संस्कृतीत तरी शोभत नाही. याने त्या पुरुषाला संकोच वाटतो लज्जा निर्माण होते त्याचा एक प्रकार विनयभंग होतो.
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Wed, 12/23/2015 - 12:10 नवीन
मित्रा ह्या कवितेत कोणता अश्लील शब्द आहे ते मला कळेल का ? का आपले उगाच काहीही आरोप करणे हे आपले काम आहे ? आपणास मराठी शब्द कळतात का ? कोणता शब्द अश्लील शब्द ह्यात आहे हे दाखवा
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 12/24/2015 - 05:32 नवीन
सुंदर कविता, आवडली
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL गुरुवार, 12/24/2015 - 06:08 नवीन
अत्यंत सुंदर कविता!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा