उशीरहोणार्यांसाठी (चांगल काही)
हा धागा केवळ सातत्याने उशीरहोणार्यांना त्यांची भूमिका ज्येनुआईनली समजून घेण्यासाठी आहे, या धागा लेखाचा उद्देश मुळीच सर्कॅझम अथवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टिका नाही. वेळ व्यवस्थापना बद्दल मी वेगळा धागा काढणार आहे त्यामुळे तोपर्यंत टिका सर्कॅझम अथवा वेळ व्यवस्थापना बद्दल चर्चा करू इच्छिणार्यांनी येथूनच रजा घेतल्यास आभारी राहीन.
वेळ व्यवस्थापनाबद्दल मी व्यक्तीशहा आग्रही असलो तरीही युअॅप्टीट्यूड म्हणजे दुसर्यांची ज्येनूआईन भूमिका अडचण समजून घेणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या बद्दलही मी तेवढाच आग्रही असतो.
आजच्या आर्थीक ताणतणावाच्या जगात मानवाला यंत्रवत जगावे लागते, पण म्हणून माणूस काही यंत्र नाही, वेळ ही कदाचित माणसांनी त्यांच्या सोईच जग तयार करण्यासाठी केलेली निव्वळ मिथ असेल, वेळेत उशीर करणार्या व्यक्तींना त्यांचा स्पेस हवा असू शकतो. जशी वेगवेगळ्या रंगरुपाची शरीरयष्टीची माणसे असतात तसच आपल्या आपल्या वेळेनुसार वागण हेही कदाचित नैसर्गीक असू शकेल. कदाचित एखादी न आवडणारी गोष्ट इतरांच्या मर्जीसाठी, किंवा कसल्यातरी अपरिहार्यतेने करावी लागते तेव्हा त्या गोष्टीचे निटसे पालन होत नाही. उशीर होणार्यांना मनातून गिल्टी वाटत नसतानाही जोर जबरदस्तीने आणि/अथवा अपरिहार्यतेने गिल्टी फिलींग झाल्याची बतावणी करावी लागणे त्यातुन होणारी कुचंबणा एक वस्तुनिष्ठ सत्य असू शकते.
तर उशीरहोणार्यांनो, हा धागा निव्वळ आणि निव्वळ तुमच्या ज्येनुआईन, अडचणी, भूमिका ज्या इतर कुणी समजून घेत नाही त्या आपापसात चर्चा करण्यासाठी समजून घेण्यासाठीच आहे. तुमची कारणे कितीही जेन्युआईन असली तरी इतर मंडळी समजून घेऊ शकतीलच असे नाही त्यामुळे मन मोकळे करताना गरजे नुसार टोपणनावे आणि डुआयडींचा जरुर उपयोग करावा.
वेळ व्यवस्थापनवादी मंडळींनी या धागा कोनाड्यापुरते उशीर होणार्या मंडळीना आणि असा चर्चा विषय मांडल्याबद्दल मला माफकरुन या धागा लेखातील चर्चेत मनमोकळे करणार्या मंडळींना मोठ्या मनाने आपल्या क्षमाशिलतेचा परिचय देऊन मौन बाळगावे झेपल्यास काढता पाय घ्यावा आणि अगदीच तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपावयाचे असल्यास वेगळ्या धागा लेखातून आमच्या या धागा लेखाचे अगदी विडंबनही करावे परंतु कसेही करून या धागालेखचर्चेची कृपया सँक्टीटी जपण्यासाठी मदत करावी.
तर उशीरहोणार्यांनो, हि धागाचर्चा आपापल्या भूमिका मनमोकळेपणाने मांडण्यासाठी तुमचे मनमोकळेपणाने स्वागत करत आहे, चर्चेतील आपल्या मनमोकळ्या सक्रीय सहभागासाठी आभारी आहे. चर्चेस सुरवात सोपी जावी म्हणुन "मला आत्ता/आज/मागचा उशीर का कशात आणि कशामुळे झाला याचे माझे ज्येनुआईन कारण" हा विषय देतो आहे.
अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.
💬 प्रतिसाद
(62)
अ
अगम्य
Mon, 12/21/2015 - 08:44
नवीन
आशावाद हे एक कारण असू शकते.
http://www.thescienceworld.com/science-says-if-you-are-an-optimist-youll-be-late-for-everything/
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Mon, 12/21/2015 - 08:49
नवीन
मी ऑफिस ला कायम वेळेवर पोचतो . .
९.३० चा 'इन' चा पंच कायम ९.४५ लाच करतो . . का माहिती नाही .. पण सकाळी ६ ला उठलो तरी तेवढा वेळ होतोच.
लवकर उठलोय म्हणून मग काही तरी वाचत बसतो , मांजराशी खेळत बसतो . कुठली तरी सिरियल राहिलेली असते रात्री झोपताना. तेव्हा एक एपिसोड संपवू म्हणत पुढचेहि एपिसोड लागत जातात ..
मग ९.२५ चा अलार्म वाजला कि लक्षात येतं . कि अरे. .आज पण उशीर झाला .
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 12/21/2015 - 09:29
नवीन
शाळा/कॉलेज/डब्बे नाश्त्यांना होणारे उशीर, रात्रीच्या जागरणांचे परिणाम इत्यादी वालेही लोक आहेत का कुणी ?
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 12/21/2015 - 12:25
नवीन
मी आय.टी कंपनीत काम करतो तिथे येण्या-जाण्याच्या लवचिक वेळा असतात त्यामूळे रोज उशीरा जातो किंवा वेळेवर जातो असं काहीच म्हणता येणार नाही. पण सकाळीच मिटींग वगैरे लागली असेल तर वेळेवर जातो, मिटींगला सहसा उशीर करत नाही.
त्यापुर्वी कधी काळी उत्पादन कंपनीत काम करत असताना धावत पळत कसेही करुन ८:३५ च्या आधी कार्ड स्वाईप करायचोच. पुढे त्याच ठिकाणी काम करताना आमच्या कंपनीसाठीची (मी दुसरर्या पेरोल वर होतो) काही नियम्/धोरणे बदलली, मग स्वाईपिंग ही फक्त औपचारिकता उरली हे लक्षात आल्यावर ९-९:१५...म्हणजे नियम असल्याशिवाय शिस्त नाही.
बाकी एरवी कुठे जायचे असेल तर उशीर होत राहतो. म्हणजे मी एक वेळ ठरवतो पण निघतो थोडा उशीरा. खास करुन स्वतःच्या गाडीने जात असल्याने हे होत असावे. विमानप्रवासासाठी तर वेळेच्या बर्यापैकी आधी पोचतोच, धोका पत्करत नाही.
बाकी अनौपचारिक भेटीत उशीर (मला किंवा अन्य कुणालाही ) होत असेल तर त्याचे एक कारण मोबाइल हे असावे. आपण गृहीत धरतो की "कॉल किंवा एस एम एस करुन सांगू उशीर होईल म्हणून किंवा समोरची व्यक्ती कॉल करेलच"
मला ओ हेन्री ची एक कथा आठवते, त्यात दोन मित्र बरोबर वीस वर्षानी एका ठिकाणी भेटायचं ठरवतात आणि भेटतातही म्हणजे दिवस , वेळ सगळं काही वीस वर्षांपुर्वी ठरवूनच..त्याकाळात मोबाईल नसल्याने हे झाले असावे. अन्यथा आजकाल "निघाला की कॉल कर/करेन, पोचलस की कॉल कर/करेन" मुळे अनौपचारिक भेटीत उशीर ठरलेला आहे.

Mon, 12/21/2015 - 12:29

आ
आनन्दा
Mon, 12/21/2015 - 13:45
नवीन
तुम्ही ३ -३ दा हा प्रतिसाद टाकल्यामुळे मला खाली य्=पोचायला उशीर झाला.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 12/21/2015 - 14:20
नवीन
मिपाच्या सर्वर मध्ये गडबड झाल्याने असे झाले. मी निष्पाप आहे.
- Log in or register to post comments
प
पक्षी
Mon, 12/21/2015 - 14:51
नवीन
पूर्वी शार्प ६.३० ला झोपेतून उठायचो, ऑफिस ला वेळेवर पोहचायचो.
आता ८ ला उठतो, ऑफिस ला उशीर होतो.
कारण: नुकतंच लग्न झाल आहे.
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Mon, 12/21/2015 - 22:27
नवीन
उशीर होण्याचं एक कारण म्हणजे आपण पोचण्याची वेळ लक्षात ठेवतो. ९ ला पोचायचं म्हणजे किती वाजता घरातून निघायला पाहिजे ती वेळ ठरवली पाहिजे आणि घरातून निघायच्या वेळेनुसार नियोजन केलं पाहिजे.
मी सगळीकडे वेळेवर जातो, औपचारिक भेट असो वा अनौपचारिक, ९९% ठिकाणी मला उशीर होत नाही. त्यामुळे इतरांना होणार्या उशिराची मी ऐकलेली काही कारणे -
१. गजर झालाच नाही
२. गजर झाला तरी परत बंद करून झोपलो
३. रात्री ****** कारणाने झोपायला उशीर झाला आणि त्यामुळे सकाळी जाग नाही आली
४. गाडीतलं पेट्रोल संपलं / गाडी चालू होत नव्हती
५. काहीतरी विसरल्यामुळे परत जायला लागलं
६. पोलिसांनी पकडलं
७. महत्वाचा कॉल आला
८. एवढ्या लवकर जाउन काय करायचंय, कोणीच आलेलं नसतं
आणि सगळ्यात सर्रास सांगितलं जाणारं
८. ट्राफिक खूप होतं….
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 12/22/2015 - 04:03
नवीन
इतरांसाठी सांगण्याची आणि खरी कारणे यात फरक असू शकतो, तुम्हाला सांगितलेल कारणच जर खोट असेल तर तुम्ही सांगितलेला अथवा योजलेला उपाय सुद्धा चुकण्याची शक्यता असते म्हणूनच खरी कारणे जी काही असतील ती मनमोकळेपणाने शेअर व्हावीत म्हणून केवळ आणि केवळ उशीर होणार्यांसाठी या धागाचर्चेचे प्रयोजन केले आहे.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 12/22/2015 - 12:34
नवीन
..प्रचंड सहमत!
मी स्वत: कधीच उशीर करत नाही. पण लोकांच्या उशीर होण्याचं मुख्य कारण म्हणजे वेळेचं नियोजन नाही/ वेळेचा अंदाज नाही.
कोणाकडे सात ला बोलावले तर खरं म्हणजे सहा पासून सर्वांनी तयार व्हायला सुरूवात करावी जेणे करून साडे सहा ला घरातून निघता येईल.
पण सहाला जर एखाद्याला वाटले आता अर्धा तासाचा प्रचंड वेळ हाताशी आहे तर जरा व्यायाम करून घ्यावा. मग आता मी पटकन जिम मधे जातो, चटकन वर्क आऊट करतो आणि झपकन घरी येतो (या सगळ्या गोष्टी अर्ध्या तासात?) की ऑन द डॉट साडे सहाला निघुच.....हे टाइम मॅनेज्मेंट असल्यावर उशीर होणारच.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2