Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझ्यासाठी..........

ए — एक एकटा एकटाच, Sat, 12/19/2015 - 11:55
तु सोडुन गेलेल्या वाटांवरती, आता मी देखिल फिरकत नाही तुला सोबत न घेउन आलेलं, बहुदा त्यांनाही ते आवडत नाही अशी आल्यापावली माझी कितीदा परत पाठवणी केलीय त्यांनी.................तुझ्यासाठी तु दिसत नसलेल्या सांजेपासून, बेलगाम उधळलाय तो प्रत्येक ओहोटीशी झुंज देत, तुझ्या शोधात निघालाय तो हर भरतीला वेड्यापरी सगळे किनारे पिंजुन काढलेत त्याने....................तुझ्यासाठी आजकाल तु या गावात नसतेस, हे बहुदा कळलयं आहे त्याला खुणेच्या सगळ्या जागांवर अडला, तरी भेटली नाहीस त्याला आजही तुझ्या आठवसरीं डोळ्यांत साठवुन पुन्हा पुन्हा दाटुन येतो तो............तुझ्यासाठी तुला काही फरक पडला नसला, तरी तो खरचं उध्वस्त झालाय खिडकीत तुझी वाट पाहुन, कित्येकदा ओसरीवरुनच परत गेलाय जाताना मात्र सवयीने अंगणात पारिजातकाचा सडा सांडत जातो तो...........तुझ्यासाठी हे सगळे माझ्याकडे "तुला" मागतात्, पण मी दाद देत नाही तुला गमावल्याचा दोष मला लावतात्, तरी मी काहीच बोलत नाही तुझ्या प्रतारणेच्या जखमा उरात दडवून आता कायमचा शांत झालोय मी..........तुझ्यासाठी

प्रतिक्रिया द्या
2121 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अभ्या.. Sat, 12/19/2015 - 12:20 नवीन
सल जाणवतोय चांगलाच. मस्त एकेकेकटाच राव.
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sat, 12/19/2015 - 13:53 नवीन
भाऊ ड्वले पाणावले!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 12/19/2015 - 15:04 नवीन
पुन्हा एकदा मैफिलीला साजेशी कविता! लय भारी! Sandy
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 12/20/2015 - 05:47 नवीन
मी काय म्हणतो एकदा मैफिल जमवुच......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Sun, 12/20/2015 - 07:35 नवीन
अशी मैफल जमवावी किंवा त्यात सहभागी व्हावे असे खूप आधीपासून वाटते आहे पण कधी योग जुळालाच नाही. मिपावरच किंवा मिपाकरांसोबत बाहेर कुठेही काव्यकट्टा करायला आवडेल. सध्यातरी पिं.चिं. मध्ये भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि संमेलनपूर्व संमेलनात भाग घेणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे! तिथेही कदाचित मिपाकरांपैकी कोणाला भेटता येईल. Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच
प
प्रचेतस Sun, 12/20/2015 - 09:04 नवीन
अस्मादिकांसह बरेच मिपाकर आहेत पिंपरी चिंचवडात. आपले स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/19/2015 - 15:57 नवीन
अजून टोकदार होऊ देत हाच आशय. दिल का हर घाव भरने लगता है तेरी आवाज है की मरहम. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 12/20/2015 - 05:49 नवीन
पुढल्या वेळेस नक्की प्रयत्न करीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
शार्दुल_हातोळकर Sat, 12/19/2015 - 18:31 नवीन
आसमंतात भरुन राहिल्या आहेत या आठवणी.....
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 12/20/2015 - 05:46 नवीन
सगळ्यांचेच मनपुर्वक आभार.......
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Sun, 12/20/2015 - 05:53 नवीन
खूप सुंदर कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Sun, 12/20/2015 - 16:57 नवीन
छान
  • Log in or register to post comments
न
निनाव Mon, 12/21/2015 - 16:32 नवीन
हे खूप आवड्ले.... खासच .. तुला काही फरक पडला नसला, तरी तो खरचं उध्वस्त झालाय खिडकीत तुझी वाट पाहुन, कित्येकदा ओसरीवरुनच परत गेलाय जाताना मात्र सवयीने अंगणात पारिजातकाचा सडा सांडत जातो तो...........तुझ्यासाठी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा