चालते व्हा
चालते व्हा...
शीर्षक वाचून कोण कुणाला चालते व्हा म्हणतोय असे वाटेल.
चलते रहो, चाला,चालत रहा,नसाल तर चालणे सुरु करा या अर्थाने ते आहे.
आजकाल कॅच लाईन लागते म्हणणे खपवायला .काय करणार.
चालण्याचे फायदे सर्वांनाच माहिती आहेत.
मग नवीन काय.
नवीन , ह्या कारणाचा शोध कि का चालत नाही व चालणं सुरु करण्यासाठी काही उपाय असू शकेल का.
आपण का चालत नाही?
सुरक्षीत मार्ग नाहित.
ह्याला काहीच करू शकत नाही.
दुसरे काय?
मोटीवेशन /प्रेरणा नाही ?
मला वाटत हे खरं कारण नाही
चालण्याचं मोजमाप नाही हे खरं कारण असावं.
एका कंपनीने (इच्छूक) कर्मचा-यांना ला पेडोमिटर दिले आणि walk in to health campaign सुरू केला. दिवसाला साधारण 10,000 steps (~6किमी/अंतर प्रत्येकाच्या stride वर अवलंबून)चालण्याची अपेक्षा ठेवली.
नेहमीप्रमाणे निराशावादी मंडळींनी त्याकडे दुर्लक्षचं केले.
काहींनी मात्र पेडोमिटर खिशात ठेऊन चालण्यास सुरवात केली. किती पावलं चाललोय हे पहाण्याचा चाळाचं लागला.
यात मुख्य म्हणजे नियमितता महत्वाची,कारण कंपनीने दर आठवड्याला सरासरी जास्त असणा-यांची रॅकींग प्रसिध्द करायला सुरवात केली. त्यामुळे चालण्या-यांना किती चालणं शक्य आहे आणि आणि आपण त्यात कुठं आहोत हे कळू लागलं.एक निरोगी स्पर्धा सुरू झाली.
मी आधीचं आठवड्यात 3-4 वेळा 4 किमी धावत होतो,आता अंतर वाढवण्यासाठी चालण्यास सुरवात केली. 17,000 steps दर दिवसापर्यंत पोचलो.(12 तास बैठं आॅफिस काम झाल्यावर)
माझा एक मित्र आधीपासूनचं चालत होता,त्यानं जोर लावला,3 आठवडे तोच टाॅप रॅंकर आहे.पठ्या सरासरी 26,000 steps/ day चालत होता ,आता 36,000 steps /day पर्यंत पोचला. खरं म्हणजे तो ही स्पर्धा येण्या आधीच पेडोमिटर असलेले घड्याळ बांधून चालत होता. आधी तंबाखू चघळायचा,आता म्हणे 3 आठवड्यापासून स्पर्श नाही.त्याचं मनोबल सोलीडच वाढलयं
आपल्याला अतिरेक करा हा सल्ला द्यायचा नाहिय.पण जरा आपला वकूब कुठंवर आहे हे माहित करून घेण्यात पण मजा असते.
दहाहजारी मनसबदार व्हायला काय हरकत आहे मग जमलं तर पुढची पायरी.
आजकाल मोबाईलवरही काही पेडोमीटर चे अॅप आहेत पण मोबाईल बॅटरी लो असली की चालणं टाळण्यासाठी बहाणा होऊ शकतो त्यामुळे पेडोमीटर युनीट घेणेच चांगले. अगदी हलके असते, क्लीपने आपण कपड्याला लावू शकतो /खिशात ठेवू शकतो.घड्याळासारखी त्याची बॅटरी वर्ष, 2वर्ष चालते.
न्यूटनचे गतीविषयक नियम आपल्या सवयींबाबत पण लागू होत असावेत का ?
external unbalanced force (आॅफ मोटीव्हेशन अर्थात )लावल्याशिवाय शरीरे चल होणार नाहित कि काय.
एकदा सवय लागली,त्याचे फायदे /उत्साह दिसला की सांगायची गरज नाहीच.
ह्याचे रिच डिव्हिडेंडस् नजीकच्या भविष्यात दिसणारच.
एक प्रकारची ही अल्पबचत आहे,सहा महिन्यांनी आपल्याला त्याचे परिणाम स्पष्ट दिसतील.
पेडोमीटर वर्तमानात जगायला शिकवतो असे म्हणायला पाहीजे कारण तारीख बदलली कि पाटी कोरी होते (display 0)
दिवस बदलला कि स्वत:ला नव्याने सिध्द करायचं.त्यामुळे भूतकाळात रमण्यात अर्थ नाही,आजचा रोकडा प्रत्यय पाहिजे.
सांगे कालची कीर्ती,
तो एक मूर्ख !
असे तर पेडोमीटर सुचवत नाही ना ?
बाॅलीवूडचा डायलाॅग आठवतोय,
"इज्जत मे कोई discount नही साहब" (धूम कुठलातरी)
याप्रमाणे ,
Target मे कोई discount नही.
असं आपणच आपल्याला म्हणायचं.
चालतांना फक्त शरीरच नाहि तर मन ही चालत असतं, आपणस भोवती एरवी न पाहीलेला निसर्ग पहातांना,
आकाश मंडप, पृथ्वी आसन........
आपलाच वाद आपल्याशी
किंवा
तेरा कोई साथ ना दे तो,
तू खुदसे प्रीत जोडले,
अशी अवस्था होत जाते,नकळत अनेक गोष्टींवर चिंतन होत जाते.मनाचीही मशागत होते.
एक प्रकारे चल-समाधीच लागते.
किंवा गाणी ऐकतांना मंत्रमुग्ध व्हायला होतं,अर्थाची नवीन भेंडोळी उलगडत जातात.
कोई पत्ता हिले हवा तो चले
कौन अपना है ये पता तो चले
तू सितम से न खींच हाथ अभी
और कुछ दिन ये सिलसिला तो चले
चालणं आणि सुरक्षा : कालच शिरडीला चालत जाण्या-या 5 जणांना भिवंडीजवळ गाडीने ठोकरल्यामुळे एक ठार व इतर जबर जखमी झाल्याचे वाचून फार दु:ख झाले. हायवे वर चालणे अतिशय धोकादायक असतेच. चालणा-यांना सेफ लेन सारखी जागा देणारा कोणी आमदार /संस्था(न) नाहिच का.
चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे म्हणजे येणारे वाहन समोरुन दिसेल व सुरक्षा वाढेल.
आपण कायकाय वाचत असतो, भारतात मधूमेहाची आकडेवारी वाढतेय वगैरे आणि त्या साठी सरकारचे बजेट इतके आहे वगैरे.
मला वाटतं समाजाचं आरोग्य योग्य जिवनशैली व आहार विहारातून येतं. चकचकीत हाॅस्पीटलमधून नाही.
जर नियमित चालण्याची सवय व त्यातलाआनंद जास्त लोकांनी अंगिकारला तर तेआरोग्यविषयक खर्चात कपात करुन एक प्रकारची देशाला मदतचं करतील.
whatsapp वरआपण हा मेसेज कदाचीत वाचला ही असेल.
30 मिनीट चालण्याचे ३० फायदे जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन. !!
कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे
१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
१२. वजन कमी करण्यासाठी
१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
१९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात
२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते.
२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव
२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग.
२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्रकधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!
आता नवीन वर्ष येतयं. सालाबाद प्रमाणे काही जण नवीन वर्षाचा निश्चय करतात, आणि साधारण फेब्रुवारीत सपशेल शरणागती स्विकारतात. मी तर ठरवून टाकलंय रोज 10,000 + पावलं चालायचचं.सध्या चालतोच आहे आता हीच जिवनशैली कायम ठेवायची म्हणतोय.
मंजिले खुद करीब आयेंगी
ए अजिजानो काफ़िला तो चले
💬 प्रतिसाद
(47)
र
रेवती
Sun, 12/20/2015 - 02:31
नवीन
छान लिहिलय. आजकाल बर्याच कंपन्यांनी पेडोमिटर्स त्यांच्या कर्मचार्यांना देण्यास सुरुवात केलेली दिसते. नवर्याला व मला असा त्याच्या कंपनीनेच दिला. आम्हाला मजा वाटली व नेहमीच्या चालण्यात थोडी वाढ झाली. मग फिरायला जाताना आणखी काही जणांना कंपनीने पेडोमिटर्स दिलेत असे समजले. काहीजण अॅप वापरतात तर काहीजण आपापल्या मित्रमैत्रिणींशी, नातेवाईकांशी निकोप स्पर्धा म्हणून चालत, पळत असतात हे समजले. चांगलेच आहे. तुमचा लेख आवडला.
- Log in or register to post comments
ग
गवि
Sun, 12/20/2015 - 02:41
नवीन
अप्रतिम. चालणं हा सर्वात सुरक्षित आणि शक्य कोटीतला व्यायाम.
या निमित्ताने चर्चा आणि अनुभव शेअर व्हावेत अशी इच्छा.
फार आवश्यक आहे ते.
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 12/20/2015 - 04:30
नवीन
+१!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 12/20/2015 - 04:39
नवीन
नुसतंच चालून फारसा फ़ायदा होत नाही.
भरभर चालणं (brisk walking) साधारण ताशी ६ किमी ह्या वेगाने निश्चितच फायदा होतो.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 12/20/2015 - 05:06
नवीन
हां. ब्रिस्क वॉकिंग जवळपास ४किमी अन रनिंग २ किमी रोज.
फायदे : दिनभर फ्रेश वाटते. एसिडिटी कंट्रोल झाली. ढेरी गायब. आधी सर्दीचा त्रास होता तो पण गायब. चिडचिडी कमी झाली. तेथील रोज येणाऱ्या ग्रुपच्या ओळखी होऊन नवीन काम मिळाले. एकूण फायदेशीर आहे. आता वर्ष होत आले.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 10/04/2016 - 11:50
नवीन
ब्रिस्क वॉकिंग ने दुखापत होण्याचा जास्त संभव असतो, धावण्यापेक्षाही.
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Wed, 10/05/2016 - 10:52
नवीन
विशेषतः shin splint
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sun, 12/20/2015 - 03:15
नवीन
अॅप कोणती चांगली आहेत? त्ः
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 12/20/2015 - 04:57
नवीन
Pedometer ५० लाखाहून अधिकवेळा डाऊनलोडवलं गेलंय.
Pedometer & Weight Loss Coach १० लाखाहून अधिकवेळा डाऊनलोडवलं गेलंय.
WalkLogger pedometer १० लाखाहून अधिकवेळा डाऊनलोडवलं गेलंय.
Noom Walk Pedometer ५० लाखाहून अधिकवेळा डाऊनलोडवलं गेलंय.
हे सर्व अॅप्स सर्वात जास्त वापरले जाणारे पाऊलमापके आहेत व सर्वात जास्त गुणांक (४+) असलेले आहेत.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/20/2015 - 11:55
नवीन
Pedometer & Weight Loss Coach डाऊनलोडवले.
उद्या बघतो यंत्र काय काय माहिती देते. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Sun, 12/20/2015 - 04:32
नवीन
"चालतांना फक्त शरीरच नाहि तर मन ही चालत असतं" - हे एक सनातन सत्य आहे. आपण जर एकटेच चालत असू तर मनाशीच एक संवाद निर्माण होतो जो इतर वेळी शक्य नसतो. पेडोमीटर लावल्याने आपल्या चालण्याचा एक deta तयार होतो जो फार उपयुक्त ठरू शकतो. मी 'fitbit' पेडोमीटर वापरतो. ज्यात एकूण किती चाललो, किती पायऱ्या चढलो, किती कॅलरीज वापरल्या गेल्या त्याशिवाय, पल्स रेट, स्लीप क्वालिटी वगैरे गोष्टींची माहिती मिळते. fibit.com वर अतिरिक्त माहिती मिळू शकते. बाजीगर साहेब, चांगल्या विषयावर लिहिल्याबद्दल अभिनंदन.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Sun, 12/20/2015 - 04:55
नवीन
सकाळी सकाळी वाचला... प्रसन्न वगैरे वाटलं . नुसतं चालण्याचे फायदे वाचून प्रसन्न वाटू शकते तर प्रत्यक्ष चालन्याने किती प्रसन्न वाटेल ?
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Sun, 12/20/2015 - 09:46
नवीन
धन्यवाद. मी EndoMondo हे फिटनेस अॅप वापरतो, त्यांचा युजर बेस खुप मोठा आहे व त्यात आपल्याला वेगवेगळ्या चॅलेंजेस मधे भाग घेता येतो त्यामुळे वापरायला मजा येते.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 12/20/2015 - 10:09
नवीन
खूपच उपयोगी लेख लिहिला आहात, बाजीगर साहेब ! धन्यवाद !
जलद चालणे हा उत्तम व्यायाम तर आहेच पण त्यात इतर व्यायामप्रकारांत संभव असलेले स्नायू व सांधे यांच्यावरचे ताण / झीज होत नाहीत. तसेच हा व्यायामप्रकार नेहमीच्या कामाबरोबर होऊ शकणारा आहे. तो काही विशिष्ट आजार नसलेल्या कोणाही पुरूष, स्त्रीया व मुलांना आरोग्यवर्धकच आहे.
- Log in or register to post comments
अ
अरिंजय
Sun, 12/20/2015 - 10:20
नवीन
फार छान लेख लिहिलात. मी गेली कित्येक वर्षे नियमीत पणे ३ किमी चालण्याचा आणि ४ किमी पळण्याचा व्यायाम करतो. कुठलेही अॅप अथवा उपकरण वापरत नाही. घरापासुन निघुन सरळ चालत जातो म्हणजे परतताना कितीही कंटाळा आला तरी तेव्हढे अंतर चालावेच लागते. मैदानावर गोल गोल चकरा मारण्यापेक्षा हे जास्त चांगले.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/20/2015 - 11:51
नवीन
चालणे हाच व्यायाम गेली दोन वर्षापासून आहे. चार किमी चालतो. दिवसभर उत्साही असतो हेच पुष्कळ आहे.
आपल्या लेखामुळे उत्साह अजूनच वाढला. थंडीमुळे जरा कंटाळा येतोय. पण, थंडी असू दे की पाऊस अब रुकना नही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sun, 12/20/2015 - 11:58
नवीन
खूप छान लेख. आवडला.
चालण्याने इंचेस भराभर कमी होतात, फ्रेश वाटतं असा अनुभव आहे. फक्त नियमितता हवी. आता पेडॉमीटर घायला हवा असे वाटतेय.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sun, 12/20/2015 - 11:58
नवीन
खूप छान लेख. आवडला.
चालण्याने इंचेस भराभर कमी होतात, फ्रेश वाटतं असा अनुभव आहे. फक्त नियमितता हवी. आता पेडॉमीटर घायला हवा असे वाटतेय.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 10/04/2016 - 11:52
नवीन
हेल्थ इज नॉट अबाउट इन्चेस तै...
बॉडी कंपोजिशन बघावं. वजन इत्यादी दुय्यम.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Wed, 12/30/2015 - 06:38
नवीन
उत्तम माहिती. मी देखील रोज ४ ते ५किमी धावतो.खूप चांगले वाटते दिवसभर. Nike Running नावाचे अँप वापरतो.अतिशय उत्तम आहे.वापरुन पहा,नक्कीच आवडेल.
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
Wed, 12/30/2015 - 07:10
नवीन
आधी मोरे सरांचा जिम वाला लेख आणि आता हे. काय बोलणार!
(गिल्टी) सुमीत भातखंडे
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
Wed, 12/30/2015 - 07:11
नवीन
लेख आवडला आणि पटला देखील.
(आळशी पण समजुतदार) सुमीत भातखंडे
- Log in or register to post comments
न
नीलकांत
Wed, 12/30/2015 - 07:40
नवीन
चाललं पाहिजे हे खरेच आहे. सध्या किलो किलोने वाढणारं वजन हे सांगतंय. यासाठी मी एम आय बॅण्ड नावाचे एक हातात घालण्याचे गॅजेट घेतले आहे. असे गॅजेट घ्यायचे म्हणजे महाग असणार आणि आपल्या उत्साहाचा काय भरवसा? मागे घेतलेले स्पोर्ट शूज तसेच पडून होते. ती मागे आलेली ओएलएक्स्ची 'बडी बडी बाते....' ची अॅड जणू काही माझ्यासाठीच बनवलेली असावी एवढा उत्साह असतो. म्हणून असे गॅजेट घ्यावे की नाहि असा विचार होता. या बॅन्डची किंमत म्हणजे आठशे रूपये एवढीच असल्याने घ्यावेच असा विचार झाला.
ह्या बॅन्ड्ला हातात घालून जेवढे चालाल तेवढ्या पावलांची नोंद हा ठेवतो. आपल्या मोबाईलमध्ये एक एमआय फिट नावाचे अॅप टाकल्यावर ब्लुटूथने ह्या बॅण्डशी जोडता येतं आणि मग आपल्या पावलांची संख्या आणि त्यानुसार जळालेल्या कॅलरीज असे सगळे ते अॅप आपल्याला दाखवते. रोजचे चालण्याचे धेय्य ठरवता येते. अधून मधून हे अॅप आपल्याला आठवण देते की आज ठरवलेल्या धेय्याच्या आपण दोन हजार वगैरे पावले मागे आहोत. आणि आजचे धेय्य पुर्ण केले की शाबासकि सुध्दा देते. सद्या सुरूवातीच्या टप्प्याला ८ हजार पावलांचे टारगेट आहे. एवढं मात्र नक्की की आपण किती चाललो आणि किती कॅलरीज बर्न केल्या हे बघायला मजा येते. चाललं पाहिजे असे वाटते.
नवीन वर्षाला हे रोजचे धेय्यं १० हजारावर नेऊया. (दहा हजारी मनसबदारी ;) )
- नीलकांत
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 12/30/2015 - 08:35
नवीन
मालक कृपया ह्या ८०० वल्य ब्यान्डची लिंक देणे.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 12/30/2015 - 10:05
नवीन
तो xiaomi वाला mi band असेल तर ही लिंक,
चांगला वाटतोय हा,
http://www.mi.com/in/miband/
- Log in or register to post comments
न
नीलकांत
Wed, 12/30/2015 - 10:46
नवीन
हो हाच तो बॅन्ड आहे.
स्वस्त आहे आणि बॅटरी महिनाभर चालेले एकवेळा चार्ज केल्यावर. झोपेचे सुध्दा ट्रॅकिंग ठेवतो (कसे ते कुणास ठाऊक) किती वेळ झोपला आणि त्यात गाढ झोप किती वगैरे सांगतो.
यात आता त्यांनी नवीन प्रकार आणला आहे. सध्या भारतात विकत नाहीयेत पण बाहेर मिळतो. त्यामध्ये हृद्याचे ठोकेसुध्दा मोजल्या जातात. :)
- Log in or register to post comments
अ
अजया
गुरुवार, 12/31/2015 - 04:18
नवीन
धन्यवाद लेखाबद्दल आणि अनुषंगिक मौल्यवान प्रतिसादांबद्दल.अॅप घेतले आत्ताच.आता बँड बघते!
पण मी फार आरंभशूर आहे:( हा मेंटल ब्लाॅक काढायचं अॅप कुठेच नाही :(
- Log in or register to post comments
स
सतिश पाटील
Tue, 10/04/2016 - 09:14
नवीन
आता मिळतोय हा ब्यान्ड ९९९ रुपयात आपल्या देशात.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 10/04/2016 - 11:53
नवीन
एम आय बँड भारी आहे. व्हॅल्यू फॉर मनी.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 12/30/2015 - 08:08
नवीन
पेडोमीटर हे आप भ्रमणध्वनी मध्ये उतरवून घेतलंय. रोज ३-४ किमी चालणे होते. १० किमी चालायचे आहे.
वजन अजून प्रमाणात आहे म्हणून चाललंय.
आळस हा माणसाचा शत्रू आहे.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 12/30/2015 - 08:27
नवीन
चालणं माझ्यासाठी एक रिलॅक्सेशन टेक्निक आहे त्यामुळे रोज थोडंतरी चालण्याशिवाय पर्याय नसतो.
चालण्याचे फायदे पहिल्यापासून माहीत आहेत आणि जो काही थोडाफार फिटनेस आहे तो त्यामुळेच !
पण त्यामुळे बरेच टोमणेही ऐकावे लागतात, उदा - काय करणार एवढे पैसे वाचवून, बँक बॅलंस चांगला झाला
असेल तुझा, इ. काहीही. लोक स्वतः चालत नाहीत, जरा कोपर्यावर जायचं तरी गाडी काढतात आणि दुसरा चालतो
तर ते कमीपणाचं समजतात. अशांना समजवतही बसत नाही, मी दिवसातले ८-९ तास बसून काम करते त्यामुळे
चालणं मस्ट आहे, फिटनेस वाढवतेय एवढंच सांगते.
ऑफिस जवळ असल्यामुळे (२ किमीच्या आत: १५-२० मिनीटे) शक्यतो चालत ये जा करण्याचाच प्रयत्न असतो.
सध्या गुगल फीट मोबाईलमध्ये टाकलंय, त्यात रोज किती पावले चालणं झालं, अंतर, कॅलरी बर्न सगळी माहिती
येते आणि ते पाहून उत्साह जास्त वाढतो. साधारण ६००० पावले (३ किमी) च्या आसपास रोज चालणे होते,
टार्गेट अजून वाढवायचंय :)
"नदिया चले, चले रे धारा, चंदा चले, चले रे तारा
तुझ को चलना होगा, तुझ को चलना होगा.."
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 12/30/2015 - 08:51
नवीन
(किमान) चालायला (तरी) पाहिजे हे खरेच. रुजुता दिवेकरच्या पुस्तकातील माहिती इच्छुकांनी वाचावी. चांगले विवेचन केले आहे.
"वॉक विथ लेस्ली"ची माहिती द्या ग कुणीतरी.. पैसा तै? मितान?
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 12/30/2015 - 15:45
नवीन
पैतैच्या सांगण्यामुळे मला वॉक विथ लेस्लीच्या चित्रफितींची माहिती समजली. अगदी १५ मिनिटांच्या एक मैल वॉकपासून दोन, तीन मैल असेही प्रकार असलेले व्हिडिओज आहेत. नेहमीच्या व्यायामाने कंटाळा आल्यावर एक दोन दिवस हे व्हिडिओज लावून चालल्यास बदल मिळतो व बरे वाटते.
- Log in or register to post comments
म
मितान
गुरुवार, 12/31/2015 - 03:55
नवीन
Walk at home हे मी गेली २ वर्षे नियमीत करतेय. यूट्यबब वर विडिओ आहेत ते उतरवून ठेवलेत. बाहेर चालायला जाताना Google fit or stepsmania फोनमध्ये वापरते. काही कारणाने वेळ चुकली की बाहेर न चालण्याचे निमित्त मिळते;) मग लेस्ली चे विडिओ लावून घरात ५ कि मी चालते. बाहेर जाऊन चालणे ज्यांना जमत नाही त्यांना हे फार उपयुक्त आहे.
- Log in or register to post comments
M
Madhavi_Bhave
Wed, 12/30/2015 - 09:04
नवीन
नमस्कार मंडळी
पेडोमीटर कोणता घ्यावा? Amazon वर जावून पाहिले तर निरनिराळे प्रकार पाहून गरगरायला झाले. जाणकार काही माहिती देवू शकतील का? पेडोमीटरचे काय फायदे आहेत? पेडोमीटर ला दुसरा काही option आहे का? मी पेडोमीटर aap download केले व जवळपास १२०० मीटर अंतर चालले तरी aap चा result शुन्य. चालायला तर मी रोजच जाते व शक्य असेल तेव्हा देखील चालणेच पसंद करते. कृपया मार्गेदर्शन करावे.
- Log in or register to post comments
म
मोगा
Wed, 12/30/2015 - 18:53
नवीन
सुरु आहे
- Log in or register to post comments
P
palambar
Wed, 12/30/2015 - 19:55
नवीन
आधि मि भाजि किराणा सामान वगेरे आणायला गाडि वर जात असे , पण आता बरेच दिवस झाले , चालतच जाते. समोरिल बागेत वाकिंग ट्रअॅक वर चालायला जाते. शक्यतो लिफ्ट वापरत नाहि.
- Log in or register to post comments
स
सोत्रि
गुरुवार, 12/31/2015 - 06:40
नवीन
'लोगोंको चलानेवाले को बाजीगर केहते है|' - असे म्हणावे लागेल आता ह्या लेखानंतर :)
- (पेडोमीटर डाउन्लोडला लावलेला) सोकाजी
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
गुरुवार, 12/31/2015 - 13:58
नवीन
"जो चालतो त्याचे नशीब चालते " अशा अर्थाचे संस्कॄत सुभाषीत आहे . यांवरुनच "म्ह्णजेच पोस्टमन हा सर्वात नशिबवान" असा चुकीचा अर्थही काढला जातो.
- Log in or register to post comments
ब
बाजीगर
Fri, 01/01/2016 - 11:24
नवीन
सर्व प्रतिक्रियांबद्दल आभार.
सोत्रि यांची कमेंट वाचून असूरी आनंद झाला.
नीलमोहर यांनी छान लिहिलेय.
रेवती,पिलीयन रायडर,palambar,सुबोध खरे,अजया,नीलकांत...वाहवा,लगे रहो.
- Log in or register to post comments
क
कौशिकी०२५
Fri, 01/01/2016 - 12:16
नवीन
माहितीपुर्ण लेख...चालायला हवे हे वारंवार पटुनसुद्धा होत नाहिये...पण ह्या अॅप्समुळे काही फरक पडतोय का ह्यासाठीतरी सुरुवात करेन..धन्यवाद बाजीगर ह्या लेखासाठी.
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
Tue, 10/04/2016 - 10:24
नवीन
मी फिरायला जातो. दररोज एकाच दिशेने, ठरलेल्या रस्त्याने जात नाही, दिशा व रस्ता बदलुन जातो. घरुन निघतांना किती वाजता निघालो त्याची नोंद घेतो. घड्याळ अर्थातच हातावर असते. बरोब्बर तीस मिनिटे झाली की अबाऊट टर्न करतो. जातांना उत्साह असतो, त्यामुळे किती दूर गेलो ह्याची मोजणी करण्याची गरज नाही. परत घरी यावेच लागते, तेथे कंटाळा करून चालणार नसते. पण दररोज एक तासाची भतकंती, चार ते पाच किमी. चा प्रवास घडवते. त्यामुळे पेडोमीटर घेण्याची तशी गरज वाटत नाही. मोबाईल घेऊन गाणी ऐकत जाणे आवडत नाही. जाता-येता कोणाशी गप्पा मारीत नाही. एकट्याने जावे हे ऊत्तम.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 10/04/2016 - 12:01
नवीन
बाजीगर भाऊ लेख छान. शायरी उत्तम. चालणं चांगलं यात दुमत नाही. त्यातील आनंदही मोठा आहे.
परंतु त्यापेक्षा धावणं जास्त श्रेष्ठ अशा मताचा मी आहे. चालणं या क्रियेत शरीराला 'व्यायाम' असा घडत नाही. अर्थात, अनेकदा चालणं हा धावण्यापेक्षा सोपा पर्याय म्हणून बरेच जण निवडतात. पण त्याने व्यायाम होतो, फिटनेस वाढतो इज नॉट रियली ट्रू. तेंव्हा जॉग करा चालण्यापेक्षा असं सुचवेन सगळ्यांना.
टू वॉक ऑर टू जॉग
- Log in or register to post comments
क
कायरा
Tue, 10/04/2016 - 16:20
नवीन
चालणे महत्त्वाचे. पेड़ोमीटर असला काय किंवा नसला काय. उगाचच नमनाला घडीभर तेल घालून मूळ उद्देश बाजूलाच रहातो. किती कॅलरीज खर्च झाल्या हे कळून तुम्ही करणार तरी काय. शेवटी आरोग्यदायी असणे हे महत्त्वाचे. ड़ाॅक्टर किंवा ड़ाएटीशिएन यांच्यासाठी कॅलरी कन्सेप्ट ठीक आहे तो त्यांच्या प्रोफेशनचा एक भाग आहे. उठसूठ सगळ्यांनी कॅलरीज मोजायची गरज नाही. शेतकर्याला पेड़ोमीटर माहीतसुद्धा नसेल तरीही तो फीट असतो.
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
Tue, 10/04/2016 - 20:24
नवीन
कायरा यांची मते माझ्या मताशी जुळतात. धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
स्वीट टॉकर
Wed, 10/05/2016 - 09:30
नवीन
सुरेख लेख ! शीर्षकदेखील!
"सालाबाद प्रमाणे काही जण नवीन वर्षाचा निश्चय करतात, आणि साधारण फेब्रुवारीत सपशेल शरणागती स्विकारतात." यावर टिपण्णी आहे. एखादी व्यक्ती चांगलं काम सुरू करायला नववर्षापर्यंत थांबू शकते यावरच त्यातल्या गांभीर्याचा अभाव दिसतो. फेब्रुवरीपर्यंत चाललं तरी खूपच म्हणायचं!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 10/05/2016 - 09:49
नवीन
हाहा हे अगदी खरं बोललात.
कल करे सो आज... उगाच नाही म्हण पडली
- Log in or register to post comments