प्रसन्न सकाळ
सकाळ होती वाचत होतो
पेपर, हातामध्ये चहाचा कप
ग्यालरी माझी चार फुटाची
माती भरल्या मडक्यांचे जग
एका मडक्यात होती तुळस
रांगोळीला केलेला आळस
गतलग्नाच्या बांगड्याही तशाच
नुकतीच आलेली न्हाउनी उन्हात
दुसर्या मधील अबोली तर खास
खेळवीत होती ओल्या दवास
थोडीशी गच्ची बाहेर झुकून
रोखवीत होती अगणित श्वास
हाय एक होते कोरफड तशात
ना रूप सुगंध गणनाही कशात
घेतसे कधिमधी आजारी असता
औषध म्हणून केवळ लावावयास
चौथ्यात असे गोकर्णाची वेल
खच्च संपूर्ण गच्चीवर पसरलेली
फुले टपोरी दर कोंबानजिक
काही परडीत काही राहू दिलेली
संपला चहा वाचून झाला पेपर
पाण्याचा बंब सोडी गरम हवा
उठतच होतो शोधीत कपडा-पंचा
आतून आवाज वाजले किती पहा
जाळ भास्करा असली घड्याळे
प्रातः प्रसन्नतेला आवरणारी
परत दाखवावा हाच देखावा
हीच विनंती तुमच्या चरणी
💬 प्रतिसाद
(5)
ज
जव्हेरगंज
Sun, 12/20/2015 - 17:17
नवीन
वाह!
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 12/20/2015 - 17:17
नवीन
वाह!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sun, 12/20/2015 - 17:21
नवीन
मस्तं!
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Sun, 12/20/2015 - 18:42
नवीन
मस्त
प्रसन्न
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 12/21/2015 - 15:50
नवीन
आवडली कविता!
Sandy
- Log in or register to post comments