माझी कारवार मुर्डेश्वर भ्रमंती
पावसाळयाचे दिवस होते. सहज म्हटलं बायकोला कुठेतरी फिरायला जाऊ, माझी ब-याच दिवसांची कारवार भ्रमंतीची इच्छा होती, जूलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात मी आणि मिसेस आम्ही दोघेही कारवार भ्रमंतीसाठी जायला निघालो. त्यासाठी सावंतवाडीतून बसची चौकशी केली. सकाळी 7.30 वाजता कदंबा बस होती, पण तिही फक्त मडगांव पर्यंत, तेथून पुढे आम्हांला दुसरी बस पकडावी लागणार होती.
ठरल्याप्रमाणे सावंतवाडी स्टॅंडवर मडगांव जाणा-या कदंबा बसमध्ये बसलो, सावंतवाडी ते मडगांव कदंबा बसचे तिकीट 70 रुपये आहे. तासा दिड तासात आम्ही मडगाव ला पोहोचलो, तेथे माझी मेहूणीही येणार होती, ठरल्याप्रमाणे ती मडगाव ला आली, आणि तिथून पुढे कारवार जाणा-या बसमध्ये आम्ही बसलो. कारवारला पोचेपर्यंत दूपार झाली होती, तिथून पुढे मेहूणीने सांगितले की मुर्डेश्वरला शंकराचे एक सुंदर मंदिर पाहण्यासारखे आहे, तिथे जाऊया, त्याप्रमाणे चौकशी केली, खरंतर तिथे आमची भाषा कोणालाच समजत नव्हती, त्यांना हिंदीही थोडी थोडीच येत होती, सरतेशेवटी आम्ही मुर्डेश्वर जाणा-या बसमध्ये चढलो, आणि इथून पुढे आमचा प्रवास सुरु झाला, हा बराच लांबचा व जरासा कंटाळवाणा प्रवास होता, परंतू कर्नाटक सरकारचे रस्ते व तिथली स्वच्छता एकदम चांगली होती. शेवटी संध्याकाळी आम्ही मुर्डेश्वरला पोहोचलो. एकंदर बसने एकाचे सुमारे 200 रुपये तिकीट होते.
मुर्डेश्वर मंदिर स्टेशनपासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर आहे, तिथून आम्ही मंदिरात पोहोचलो.
तिथे पाहण्यासारखे बरेच काही आहे. सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शंकराची सर्वात मोठी आसनस्थ मुर्ती
तिथून निसर्गाचे रुपही अत्यंत विलोभनीय असेच वाटत होते.
अशीच फिरती करुन थोडे बाजारात फिरलो, आणि तिथून स्टेशनला परतलो. स्टेशनवर रात्री उशिरा 2.30 वाजता नेत्रावती ट्रेन ने आम्ही परतलो.
तिथे पाहण्यासारखे बरेच काही आहे. सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शंकराची सर्वात मोठी आसनस्थ मुर्ती
तिथून निसर्गाचे रुपही अत्यंत विलोभनीय असेच वाटत होते.
अशीच फिरती करुन थोडे बाजारात फिरलो, आणि तिथून स्टेशनला परतलो. स्टेशनवर रात्री उशिरा 2.30 वाजता नेत्रावती ट्रेन ने आम्ही परतलो.
💬 प्रतिसाद
(8)
स
स्पा
Tue, 12/22/2015 - 10:56
नवीन
अप्रतिम फोटो, डोळ्यांचे पारणे फिटले
प्रवास वर्णनही सुंदर, भाराऊन गेलोय
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 12/22/2015 - 12:34
नवीन
तारीफ़ करावी तितकी कमीच.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 12/22/2015 - 11:57
नवीन
सुंदर भटकंती. मंदिर फारच सुरेख दिसतंय.
शंकराचा फोटो फक्त खूप मोठा झालाय. त्याचा आकार कमी करता येईल तर पहा.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Tue, 12/22/2015 - 13:04
नवीन
:))
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Tue, 12/22/2015 - 13:55
नवीन
सदस्यकाळ
1 month 1 week
पु.ले.शु.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Tue, 12/22/2015 - 14:07
नवीन
शंकरांची मूर्ती अप्रतिम टिपलिय!
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Tue, 12/22/2015 - 16:35
नवीन
जमलं की!
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 12/22/2015 - 16:42
नवीन
भारीये.अजून उजवीकडून फोटो काढला असता तर शंकर देव कॅमर्यात( आपल्याकडेच ) बघतोय असं आलं असतं.ओंकारेश्वराच्या डोंगरावरही असाच आहे एक.देवळात प्रवेश नाही/ फोटो काढता येणार नाही वगैरे प्रश्न कायमचे सोडवलेत.
एक विनंती :- या भटकंती सदरातील लेखाला "संपादन" आहे ते वापरून धाग्यातच उरलेले फोटो आणि माहिती वाढवा.
- Log in or register to post comments