Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चोरी

प — पालीचा खंडोबा १, Wed, 12/23/2015 - 12:17
न्हाव्याच्या परसातल्या तुळशी वृन्दावनातील देव चोरल्याबद्दल तू मला कोंडून मारले होतेस मग दिवसभर तू डोळे पुसत राहिलीस मी तुला टाळत राहिलो मध्यरात्री जाग आली तेव्हा तुझा हात छातीवर होता अन् पश्चातापचे भाव ठेवून शांत चेह-याने तू निजलेली ! मग अशीच तू कधीतरी निजलीस न उठण्यासाठी ओल्या डोळ्यानी मी स्वत:ला कोंडून घेतले सा-या जगाला टाळत मध्यरात्री जाग आल्यावर दार तसेच बंद होते अन् छाती उघडी तुझा हात नसलेली आता मला पुन्हा चोरी करावीशी वाटत आहे...... हाय ! पण मीच आज कोंडलेला आहे ! विजयकुमार......... ११.०८.२००९, मुंबई

प्रतिक्रिया द्या
3276 वाचन

💬 प्रतिसाद (18)
न
निनाव Wed, 12/23/2015 - 14:22 नवीन
भन्नाट. कसे काय सुचते तुम्हास हे सर्व.. अस सहज लिहून जाता.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Wed, 12/23/2015 - 14:55 नवीन
वाह!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 12/23/2015 - 15:01 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/23/2015 - 15:10 नवीन
जब्बरदस्त
  • Log in or register to post comments
प
पर्ण Wed, 12/23/2015 - 20:15 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 12/24/2015 - 07:55 नवीन
का रडिवतो भक्तांना !!! खंडुराया काही चुकलं माकल असलं तर सांग तसं ! पण असा तरास दिऊ नगं.. प्र,मात्र नाखु
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 12/24/2015 - 08:01 नवीन
सुरेख
... अन् पश्चातापचे भाव ठेवून शांत चेह-याने तू निजलेली ! ...
हाच स्पीड ब्रेकर खरा स्पीड ब्रेकर असतो तो कोणत्याही कायदा आणि नितीमत्तेच्या डोसांपेक्षाही अधिक परिणामकारक नाही का ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 12/24/2015 - 08:05 नवीन
न्हाव्याच्या परसातल्या तुळशी वृन्दावनातील देव चोरल्याबद्दल
तुळशी वृन्दावनातील, देव चोरल्याबद्दल हे समजले इथे कविने न्हाव्याचीच प्रतिमा का वापरली आहे ?
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ गुरुवार, 12/24/2015 - 08:28 नवीन
हि कविता ह्याच सत्य घटनेवर आधारित आहे अशी चोरी माझ्याकडून झाली होती तीही आमावस्येला सत्यनारायण पूजेच्या दिवशी बाकी कविता काव्यांतरीत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
शैलेन्द्र गुरुवार, 12/24/2015 - 08:18 नवीन
bhannat
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 12/24/2015 - 08:35 नवीन
.
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 12/24/2015 - 09:30 नवीन
कविता आवडली ..
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 12/25/2015 - 11:10 नवीन
फारच जिव्हारी लागणारी कविता!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 12/26/2015 - 14:35 नवीन
फारच जिव्हारी लागणारी कविता!
..सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
पैसा Fri, 12/25/2015 - 12:25 नवीन
खूप छान!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 12/26/2015 - 14:45 नवीन
पोहचली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 12/26/2015 - 15:32 नवीन
लहानपणी मी ही एका घरातल्या तुळशी वृंदावनातले देव चोरले होते आणि त्यानंतर आईने वळ उठेपर्यंत चोपला होता. कविता पोचली भो आतपर्यंत... _/\_
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Sat, 12/26/2015 - 19:18 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा