Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविता

श — शैलेन्द्र, गुरुवार, 12/24/2015 - 05:25
तू म्हणतेस कवितेतल, तुला काही कळत नाही पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही हलकी हसतेस नजरेतून, अदा जीव घेवून जाते मतल्यासह एक सुंदर, गझल सहज होवून जाते ही बेहोशी सखे, कुठल्या मैफीलीत मिळत नाही, अन म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही.. मुक्तछंदात बोलताना, गुंफून घेतेस सहज आर्या , तुझ्या मात्रा मोजताना, गाते अभंग माझी चर्या, काय लघु, काय गुरु, हिशोब काही जुळत नाही, पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही.. कविता म्हणजे काय ग, शहाण्यासारख वागायचं, थोडं जगात सांगायचं , अन बराच मनात भोगायचं, आपली कविताही कधी, आपल्यालाच कळत नाही, पण म्हणून काही आपल, कविता होण टळत नाही.. - शैलेंद्र

प्रतिक्रिया द्या
5718 वाचन

💬 प्रतिसाद (29)
प
प्रचेतस गुरुवार, 12/24/2015 - 05:34 नवीन
सुरेख. खूप दिवसांनी आलास रे.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 12/24/2015 - 05:52 नवीन
धन्यवाद, अरे mac वर टाईप नाही करता येत मराठी (हा जाहिरातीचा प्रयत्न नव्हे ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
D
DEADPOOL गुरुवार, 12/24/2015 - 05:42 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 12/24/2015 - 06:51 नवीन
बर्‍याच दिवसांनी दिसलास मित्रा. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र गुरुवार, 12/24/2015 - 06:56 नवीन
वाचनमात्र होतो, आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
अ
अभ्या.. गुरुवार, 12/24/2015 - 07:19 नवीन
अहाहा. ह्याला म्हणायचे काव्य. अप्रतिम शैलेन्द्रा
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 12/24/2015 - 14:50 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 12/24/2015 - 14:54 नवीन
क्या बात शेलेन्द्र भाई मजा आली
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 12/24/2015 - 15:42 नवीन
मस्त मस्त मस्त
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 12/25/2015 - 08:59 नवीन
सुंदर कविता !
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 12/26/2015 - 05:35 नवीन
धन्यवाद, डेडपूल, एकटा, स्पा, मनीषा, पद्मावती, अभ्या
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 01/01/2016 - 05:49 नवीन
आपली कविताही कधी, आपल्यालाच कळत नाही, सुंदर. :-)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 01/01/2016 - 07:09 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/01/2016 - 07:32 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 01/01/2016 - 08:11 नवीन
हीच हीच कविता !
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/01/2016 - 08:50 नवीन
खूप छान लिहिलंस!
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 01/01/2016 - 09:36 नवीन
एक तो विशाल्या आणि दुसरा तू.... हाडाचे कवी ( नाहीतर आम्च्या कवीतांनाच हाड हाड म्हणतात) प्रतिसाद मात्र नाखु
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 01/01/2016 - 11:17 नवीन
अतिशय सुंदर कविता!
  • Log in or register to post comments
स
स्वप्नज Sun, 01/03/2016 - 03:47 नवीन
पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही... फारच सुरेख. अप्रतिम काव्य.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Sun, 01/03/2016 - 04:41 नवीन
कविता फार आवडली. मोजक्या शब्दात खूप सांगून गेली. मस्तच.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 01/03/2016 - 12:42 नवीन
खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 01/04/2016 - 11:22 नवीन
सुरेख...
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 01/11/2016 - 06:01 नवीन
धन्यवाद विशाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/12/2016 - 16:16 नवीन
आवडलीय कविता. शेवटच्या चार ओळी तर खासच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 01/16/2016 - 15:49 नवीन
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 01/17/2016 - 17:35 नवीन
तुम्ही दाद दिलीय असं समजूनच मी प्रवास चालू ठेवतो सर :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
म
मयुरMK Sun, 01/17/2016 - 06:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Sun, 01/17/2016 - 06:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 01/17/2016 - 16:00 नवीन
मस्त कविता कविराज ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा