Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुंतवणूक कशी, कुठे

न
नीलमोहर
गुरुवार, 12/24/2015 - 07:53
🗣 54 प्रतिसाद
अन्न, वस्त्र, निवारा यांच्या बरोबरीने माणसासाठी अत्यंत गरजेची बनलेली गोष्ट म्हणजे आर्थिक गुंतवणूक. आपण पैसे कमावतो, खर्च करतो तसेच भविष्याची तरतूद म्हणून अनेक ठिकाणी गुंतवतो. मात्र ही गुंतवणूक कुठे, कशी, किती प्रमाणात करावी याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. सध्याचा महागाईचा वाढता आलेख पाहून भविष्यातील आर्थिक गणित कसे जुळवावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असतो. खर्च वाढते राहतात मात्र उत्पन्न त्या प्रमाणात वाढतेच असे नाही. त्यातून आमच्यासारखे खाजगी क्षेत्रांत नौकरी करणारे, ज्यांची मुळात नौकरी अस्थिर बेभरवशाची असते, ज्यांना नौकरी नंतर पेन्शन पीएफ इ.काहीच सुविधा नसतात, त्यांच्यासमोर तर आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्य कसे मिळवावे याबद्दल फार मोठे प्रश्नचिन्ह असते . नौकरी/व्यवसाय यातील उत्पन्न सोडून इतर कोणत्या मार्गाने उत्पन्न वाढवता आले तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही. जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर वेळोवेळी चांगला परतावा मिळू शकेल आणि पुढील खर्चांचे थोडेफार अंदाज घेऊन त्याप्रमाणे भविष्याचे नियोजनही करता येईल. माहितीतील सर्वसधारण गुंतवणूक पर्याय म्हणजे बँक/पोस्टातील मुदत ठेवी, शेअर्स/ म्युच्युअल फंड/ बाँड्स, पीपीएफ, कंपन्यांतील मुदत ठेवी, इन्शुरंस पॉलिसीज, स्थावर मालमत्ता इ. सध्या बँकेतील ठेवींचे व्याजदर झपाट्याने कमी होत आहेत, साधारण २-३ वर्षांपूर्वी जे व्याजदर ९-१० % होते ते आता ६-७ % एवढ्यावर आले आहेत. त्यामुळे या ठेवींवरील गुंतवणूक फारशी फायदेशीर ठरणार नाही, फक्त पैसे सुरक्षित राहतील एवढेच. मात्र पोस्टातील अनेक ठेवी/स्कीम्स स्थिर आणि खात्रीशीर परतावा देतात. सोने/ चांदी यातील गुंतवणूक फारच बेभरवशाची असते. माझ्याकडे साधारण ५ ग्रॅम सोने आणि पाव किलो चांदीचा एक ठोकळा अशी जबर मालमत्ता आहे. २-३ वर्षांपूर्वी कधी नव्हे ते बुध्दि झाली आणि १३ हजार दराने ती चांदी घेतली, आज तीच चांदी ७-८ हजारच्या आसपास मिळतांना पाहून आहे तीही दान करावीशी वाटते. तेव्हाच भावाच्या लग्नातील दागिन्यांसाठी घरच्यांनी ३५ हजार दराने सोने घेतले ते आज २५ हजारच्या आसपास आहे. असं नेहमी आपल्याबाबतीत होतांना पाहून नशीब नामक गोष्ट अस्तित्वात असते यावर पक्का विश्वास बसलाय. अशा अस्थिरतेमुळे सोने/ चांदी मध्ये पैसे घालायची इच्छा होत नाही. मी बॅंकेतील मुदत ठेवी, पीपीएफ, पोस्टातील NSC,MIS इ. मध्ये वेळोवेळी गुंतवणूक करत असते पण भविष्याच्या दृष्टीने हे पुरेसे नाही याची कल्पना आहे त्यामुळे इतरही सुरक्षित आणि विश्वसनीय पर्याय शोधत आहे. असे खात्रीशीर गुंतवणूकीचे मार्ग कोणाला माहीत असतील त्यांनी कृपया इथे शेअर करावे. पुढील १०-१५ वर्षांचा विचार करता कोणते शेअर्स/ म्युच्युअल फंड/ बाँड्स यामध्ये गुंतवणूक करावी याबद्दल माहिती देता येईल, अशी माहिती देणारे इतर स्त्रोत असतील तर तेही इथे सांगावेत. माझ्याप्रमाणेच अनेकांना आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक हा विषय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा असेल, मात्र ते प्रभावीपणे कसे करावे याबद्दल व्यवस्थित माहिती नसेल, त्यांना यातून काही उपयुक्त मार्गदर्शन मिळाले तर फारच उत्तम.
वर्गीकरण
गुंतवणूक
शेअर्स
आर्थिक स्थैर्य
उत्पन्न वाढ

प्रतिक्रिया द्या
20444 वाचन

💬 प्रतिसाद (54)
क
कंजूस Mon, 12/28/2015 - 05:14 नवीन
मला यातलं कळत नाही { यावर अगोदरच बरेचवेळा शिक्कमोर्तब झालं आहे} फक्त आजच्या लोकसत्ताची लेखाची लिंक द्यावीशी वाटली म्हणून .बय्राच जणांना हे अगोदरच माहित असेलच- करप्रणाली बदल/लोकसत्ता प्राप्तिकर प्रणालीतील वर्षांतील ठळक बदल मागील वर्षांत महत्त्वाच्या घडामोडी
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Mon, 12/28/2015 - 07:25 नवीन
माहितीपर आणि उपयुक्त प्रतिसादांसाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार. इथे शेअर्स्/म्युच्युअल फंड्समध्ये कोणी गुंतवणूक करत असतील त्यांनी याबद्दल काही माहिती दिली तर फार उपयोग होईल, उदा. साधारण रू.५०,०००-१ लाख या दोन्हींत विभागून गुंतवायचे असतील तर कुठे गुंतवावेत. शेअर्स मध्ये खरेदी/विक्री जास्त न करता फक्त दीर्घ काळासाठी (५-१० वर्षे) घेऊन ठेवायचे असतील तर साधारणतः कोणत्या कंपनीज मध्ये गुंतवावेत ? तसेच कोणत्या म्युच्युअल फंड्स, (sip) मध्ये गुंतवणूक करावी ? यासाठी मार्केट्चा अभ्यास करणे अर्थात गरजेचे आहे पण तेही लगेच समजणार नाही, त्याला तसा वेळ द्यावा लागेल. कृपया याविषयी अधिक माहिती द्यावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 12/28/2015 - 07:33 नवीन
३ सर्वोत्तम म्युच्युअल फंड्सइकोनॉमीक टाईम्सच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रातील http://economictimes.indiatimes.com/marketstats/pid-131,pageno-1,sortby-r1week,sortorder-desc,period-r1week,fundtypeid-1.cms आणी मनी कंट्रोलच्या सल्ल्यानुसार सर्वोत्तम http://www.moneycontrol.com/mutual-funds/top-rated-funds
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 12/28/2015 - 07:35 नवीन
सर्वोत्तम समभाग http://profit.ndtv.com/news/market/article-clsa-bets-on-long-term-india-story-here-are-top-stock-picks-1216491
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा