Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खंत वेड्या मनाची (गझल)

श — शार्दुल_हातोळकर, Fri, 12/25/2015 - 17:32
मुकी जाहली आज सारीच झाडे, जणु जाहल्या सुन्न या रानवेली जिथे भेटलो बोललो रोज होतो, रया तेथली आज सारीच गेली कधी पाखरे गायली रोज होती, तुझ्या स्वागताची किती गोड गाणी आता पाखरांचा कुठे न सुगावा, कशाने अशी पाखरे पांगलेली असे साचली या जगतात साऱ्या, तुझी आठवण अती रम्य वेडी हवी वाटते जी मनाला तरीही, उगा अंतरी या कुठे बोचलेली कधी झेलुनी चांदणे ओंजळीत, सडा शिंपला तू इथे काळजात जणु जाहलो मी छटा अंबराची, तुझ्या चांदण्यांनी जी तेजाळलेली मला सापडेना मुळी तोच धागा, सुटे काळजाची जिथे प्रश्नमाला कसा श्रावणाचा उन्हाळाच झाला, किती घालमेल मनी चाललेली आता सोबती त्या रिकाम्याच वाटा, जिथे ना निवारा नसे गारवाही दिलासा मनाला असे एक मात्र, स्मृती आपुली ती तिथे दाटलेली उडे आसमंती उगा धुळमाती, ऋतु कोणता हा मनाला कळेणा किती आज ओढ आकाशी ढगांना, कुठे जावयाची असे लागलेली कसा हा अवेळी असा ग्रीष्म आला, मनी अंगणी ऊन तापुन गेले तुझी आणि माझी किती रम्य स्वप्ने, कुठे आज शोधु कुठे लोपलेली अजुनी या वेड्या मनी खंत माझ्या, तुझी शेवटी भेट झालीच नाही तुझ्या पावलांचे ठसे शोधताना, कडा लोचनांची ही पाणावलेली -शार्दुल हातोळकर

प्रतिक्रिया द्या
3645 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ए
एक एकटा एकटाच Fri, 12/25/2015 - 18:28 नवीन
वाह!!!!!!!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 12/27/2015 - 03:32 नवीन
__/\__ क्या बात है, आज मिपावर मेघदूत वाचण्याचा योग आला. रातराणीच्या अघळपघळ मध्ये ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला हे रुपक कधी झेलुनी चांदणे ओंजळीत, सडा शिंपला तू इथे काळजात जणु जाहलो मी छटा अंबराची, तुझ्या चांदण्यांनी जी तेजाळलेली या ओळीतून नव्या उंचीवर पोहोचल्यासारखे वाटले. ...वाह क्या बात है! अजून येऊ द्यात
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Mon, 12/28/2015 - 10:19 नवीन
असा दिलखुलास प्रतिसाद असल्यावर आम्हालाही लिहायला हुरुप येतो !! ☺
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
च
चांदणे संदीप Mon, 12/28/2015 - 14:48 नवीन
मस्तच! आवडली गजल! जरा चालीत म्हणायला गेलो तर आपल्या मराठी "माउली-माउली" या गाण्याच्या चालीशी जवळीक वाटली! बघा, अजून कुणाला तसे वाटतेय का? Sandy
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Wed, 12/30/2015 - 18:22 नवीन
मी या गझलला एक वेगळी चाल लावली आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
म
मयुरMK Wed, 12/30/2015 - 08:50 नवीन
छान केलीय गझल
  • Log in or register to post comments
द
देशप्रेमी Fri, 01/13/2017 - 14:06 नवीन
अतिशय उत्कृष्ट आशय. या गझलेचा भावार्थ खरा रसिकच जाणु शकतो!! माहितगार यांच्या प्रतिसादाशी प्रचंड सहमत. तुमच्या इतरही कविता वाचल्या, खुप छान लिहिताय!!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Fri, 01/13/2017 - 19:24 नवीन
__/\__ माझ्या सर्व गझलांपैकी ही गझल सर्वाधिक आवडती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशप्रेमी
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 01/14/2017 - 06:53 नवीन
काल दिवस भर सुरेश भटांच्या या ओळी मनात घर करुन बसल्या होत्या मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे? दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही आता आजचा दिवस या ओळींचा कसा हा अवेळी असा ग्रीष्म आला, मनी अंगणी ऊन तापुन गेले तुझी आणि माझी किती रम्य स्वप्ने, कुठे आज शोधु कुठे लोपलेली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 01/15/2017 - 07:53 नवीन
या सर्व ओळींनी मनात कायमस्वरुपी घर केले आहे. शांत निवांत क्षणी या ओळी मनाच्या अंगणात हळुवार पावलांनी चालत येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ग
गौरी कुलकर्णी २३ Sat, 01/14/2017 - 12:10 नवीन
ह्रदयाला भिडणारी भावस्पर्शी गझल...! खुप छान लयीमध्ये शब्दबद्ध केली आहे !!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 01/15/2017 - 08:58 नवीन
सुरेख... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukrey
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 01/23/2017 - 08:30 नवीन
छानच झालीय ही गझल!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Mon, 01/23/2017 - 14:42 नवीन
धन्यवाद गौरी, मदनबाण, प्रसाद. __/\__
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा