Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'उनाड'

अ — अज्ञात, Sat, 12/26/2015 - 13:36
एका मित्राशी व्हाट्सएप्प वर चॅट करत होतो, सांगत होता गेले काही महिने जाम बिझी आहे, पण आज मात्र अक्खा दिवस 'उनाड' पणा केलाय, तेवढा मी लकी आहे! त्यानी 'उनाड' पणा केलाय, आता माझी जळजळ! क्षणात आयुष्यभरातले काही 'उनाड'क्षण वहीची पानं अंगठ्यानी सोडल्या सारखे सपासप सुटले, अश्या ह्या उनाड पानांच्या वह्या... काहींच्या बोटांनी मोजता येतील इतक्याच तर काहींच्या शंभर पानी काहींच्या दोनशे! काहींच्या तीनशे पानी!! ही त्यांचीच कहाणी.. अशी पानं आयुष्यात लहानपणी जास्त येतात, मग तेव्हा त्या पानांची होते रद्दी, आणि कालांतराने वय, जावाबदारी जस जशी वाढत जाते, तस तशी विकत घ्यावी लागते तीच रद्दी. मे महिना, दिवाळी, गणपती, कधी विकेन्डला चिकटलेल्या सुट्ट्या, कधी कंटाळा आलाय म्हणून मारलेली दांडी, कधी एखादी व्यक्ती खूप वर्षांनी भेटली की येणारा आठवणींचा पूर, त्यात गप्पाटप्पा, खाओ पियो, ऐश, मजा... कधी मंदिराची पायरी कधी किल्ल्याचा बुरुज, कधी वन-टू वन-टू कधी टांगा कधी सायकल कधी टमटम कधी बस, कधी एकटाच असला की फुल्ल, कोणी सोबतीला असला की वन बाय टू, कधी जुना वाडा कधी घरीच वेडा, कधी दूर तर कधी शेजाऱ्यांच्यातच हरवलेला! आपल्या विश्वात रंगलेला, तो 'उनाड' दिवस!... करता येईल का हो काही जुगाड!? अहो करता येईल का हो काही जुगाड!? कारण 'उनाड' दिवसाचे करता येत नाही हो 'रिजर्वशन', तो भेटतो चोरून कुठेही केव्हाही ठरलेलं नसतं 'डेस्टीनशन' आता घ्यावी लागते ना प्रत्येक गोष्टीची 'परमिशन' प्रत्येक गोष्टी खाली असते 'कंडिशन' #सशूश्रीके | २६ डिसेम्बर २०१५

प्रतिक्रिया द्या
1292 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
पद्मावति Sat, 12/26/2015 - 14:11 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Sat, 12/26/2015 - 15:05 नवीन
खर आहे भौ. सहमत. आवड्यास.
  • Log in or register to post comments
E
Ea imputo praemitto Sat, 12/26/2015 - 18:05 नवीन
अजु ही पुढे लिहिलेले... पण कुथे थाम्बवावं ह्याचा विचार कर भाउ असा आवाज आला (सेकंड ट्रैक म्हणतात ना तोच तो आवाज... मनातला आवाज) मग जिथुन भरकटायला सुरुवात झाली त्या प्यारा आधीचं इथे ओतलं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
म
मयुरMK Sat, 12/26/2015 - 15:12 नवीन
तुमच्या कवितेतल्या मित्रा एवढा आहे नशीबवान मी.हे माझ नशीबच
  • Log in or register to post comments
E
Ea imputo praemitto Sat, 12/26/2015 - 18:02 नवीन
क्या बात है! ... नजर ना लगे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरMK
ए
एक एकटा एकटाच Sat, 12/26/2015 - 16:17 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
E
Ea imputo praemitto Sat, 12/26/2015 - 18:03 नवीन
धेन्यु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच
च
चांदणे संदीप Sat, 12/26/2015 - 18:22 नवीन
काय एकेक आठवणी काढाव्या तेवढ्या कमीच! खोल पाहत बसणं आणि खुदकन हसणंही उगीच! छान लिहीलय! "एक उनाड दिवस" हा चित्रपट आठवला यावरून. नक्की बघा! Sandy
  • Log in or register to post comments
E
Ea imputo praemitto Sat, 12/26/2015 - 20:52 नवीन
हो हो पहायचाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा