Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाघोबा at ताडोबा भाग - २

अ
अभिदेश
Sun, 12/27/2015 - 02:24
💬 7
भाग -१ सहा महिन्यापूर्वी साधारण मे महिन्यात माझी पुण्याला चक्कर झाली होती तेव्हा मी एक नवीन प्रकार बघितला . माझ्या घराजवळ zoomcar असं लिहिलेल्या काही गाड्या बघितल्या . माझी उत्सुकता चाळवली , थोडा अधिक शोध घेता कळले कि हि एक Car Rental site आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे Self Drive . At Last ... भारतामध्ये Self Drive कार सुरु झाल्या . पण त्यावेळेस मला जास्त वेळ नसल्यामुळे मी फार काही पुढे बघितले नाही . पण आता अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला Why not drive to Tadoba ? पटकन अंतर चेक केलं . पुणे - ताडोबा साधारण ७५० किमी . Not Bad , manageable. विकांताला बाईसाहेबांशी बोलताना प्रस्ताव मांडला . पहिली प्रतिक्रिया " वेडा आहेस का? " पहिला धक्का ओसरल्यावर पुढचे प्रश्न "इतक्या लांब Drive ? जमणार आहे का ? मुलं आहेत बरोबर , त्यांना जमणार आहे का? कंटाळतील ती . आई बाबा आहेत . बाबांच्या गुडघ्यांना त्रास होईल इतका वेळ बसून . " झालं … आमच्या फुग्याला टाचणी बसली . मी एवढ्या Bouncers ची अपेक्षा केली नव्हती . बरेच दिवस लांब राहत असल्यामुळे अश्या bouncy / उसळत्या खेळपट्टी वर खेळण्याचा सराव गेला होता . अश्या वेळेस जे होते तेच झाले . शरणागती . "ठीक आहे . जाऊ बसनेच ." मी विषय संपवला . पण डोक्यातून काही जात नव्हते . मला स्वत:ला driving ची भयंकर आवड आहे , त्यातून अशी संधी मी सहजासहजी हातातून घालवणार नव्हतो . मी पुणे चंद्रपूर routes तपासणे चालूच ठेवले होते , रस्ते कसे आहेत , काय पर्याय आहेत हे बघणे चालूच होते. Then suddenly it hit me !!! YES !!! दुसर्या दिवशी आईसाहेबांशी बोलत होतो . नेहेमीचे इकडच तिकडच बोलुन झाल्यावर मी हळूच विषय काढला . मी , "बर्याच दिवसांत शेगांवला जाणं झालं नाहीये ." आई ," हो ना . तू आता तिकडे आहेस , इकडे आलास तरी गडबडीत असतो , कसं काय जमणार ?" मी ह्याच क्षणाची वाट बघत होतो . "ह्यावेळेस जाऊ शकतो . आपण आता ताडोबाला जातोच आहोत तर तसं वाटेवरच आहे. " "हो. पण कसं जाणार ? रेल्वे असती तर जमलं असतं . एक दिवस थांबुन पुढे गेलो असतो . " "अजूनही जमेल . गाडी घेऊन गेलो तर जमेल. " मी म्हटले . दोन तीन क्षण शांतता . "ठीक आहे . चल ठेवतो आता फोन . मिटींगला ला जातोय ." एक दोन दिवसांनी भावाचा मेसेज "Busy आहेस का ?" फोन केला . भाऊ , "आई म्हणतीये शेगांव जमेल का ह्या trip मध्ये ." YES … मी माझा आवाज शक्य तितका नॉर्मल ठेऊन म्हणालो "असं म्हणतीय का आई ? हम्म … कसं काय जमेल बरं ?" "आई म्हणतीये गाडी घेऊन जायचं का " भाऊ . अवघड असतो हो आवाज नॉर्मल ठेवणे . "हो का ? जमेल की . " मी म्हटले . "पण आपण already नऊ जण आहोत , त्यातून भाड्याची गाडी घेतली तर Driver ची एक seat जाईल . " मी हळूहळू माझ्या मुद्द्यावर येत होतो . "Self Drive कार घ्यायची का ? ZoomCar ची ? मी बघितालीये site . तू सुध्दा बघ वाटल्यास एकदा . " भावाला हे अपेक्षित नसावे बहुदा . तो पण गडबडला . पण त्याला समजावले कि सहज जमेल . आपण दोघ आहोत आणि ब्रेक घेत घेत चालवू . मोठी गाडी (SUV )घेतली की गाडी चालवताना Fatigue येणार नाही आणि प्रवास सुद्धा आरामात होईल . ठीक आहे . चालेल म्हणाला . लगेचच ही खुशखबर बाई साहेबांना सांगितली . तिला समजले की मी आई-अस्त्र वापरुन तिला निष्प्रभ केलंय . थोडा फार गोळीबार केला पण ह्यावेळेस मी चिलखत घालून तयार असल्यामुळे फार काही नुकसान न होता मी ही लढाई जिंकली . मला hatchback गाडी चालवायचा अनुभव , पण अधुनमधून मित्राची Innova चालवली होती त्यामुळे मला काही problem नव्हता . पण भावाला मोठ्या गाडीचा काही अनुभव नव्हता . त्यामुळे त्याने एक दिवस गाडी rent करून चालवून बघितली . खुश झाला . दरम्यान मी route planning सुरु केलं . TEAM-BHP चा नियमित वाचक असल्यामुळे तिकडूनच सुरुवात केली . पुणे -नागपुर -चंद्रपूर route बद्दल वाचायला सुरुवात केली . मग लक्षात आले की चंद्रपूर साठी नागपूर मार्गे जायची गरज नाही , तसेही आम्हाला शेगांव मार्गे जायचे होते . त्यादृष्टीने नियोजन करायला सुरुवात केली . आता आमचा आधीचा plan बदलावा लागणार होता . आधी आम्ही १५ तारखेला पोहोचून दुपारच्या सफारीला जाणार होतो . पण आता गाडी असल्यामुळे रात्रीचे driving जमणार नव्हते , तेव्हा पूर्ण plan च बदलला. असा . १३ नोव्हें - सकाळी ६. ३० पुण्याहून प्रयाण . संध्याकाळी ५. ३० - ६. ०० पर्यंत शेगांव पोहोचणे . रात्री श्री . गजानन महाराज दर्शन . आनंद निवास मुक्काम . १४ नोव्हें - सकाळी ९. ०० प्रयाण . संध्याकाळी ५. ३० पर्यंत ताडोबा पोहोचणे . १५ , १६ नोव्हें - ताडोबा . दर दिवशी २ (सकाळ / दुपार ) ह्या प्रमाणे ४ सफारी . १७ नोव्हें - ताडोबाहून सकाळी ९. ०० प्रयाण . संध्याकाळी ७. ३० - ८. ०० पर्यंत औरंगाबाद पोहोचणे . रात्री औरंगाबाद मुक्काम . १८ नोव्हें - औरंगाबादहून सकाळी १०. ०० प्रयाण . थोडेफार औरंगाबाद दर्शन (बीबी का मकबरा वगैरे ). अहमदनगर मार्गे पुणे रात्री ८. ०० पर्यंत . जमल्यास नगरला Cavalry Tank Museum ला भेट . रात्री गाडी चालवायची नाही आणि दर २ तासाने एक break असं नियोजन केलं . ह्यामुळे एक दिवस अधिक झाला होता , पण जास्त stress न घेत गाडी चालवणे ठरवलं असल्यामुळे इलाज नव्हता . पण ह्या नवीन plan मुळे एक नवीनच संकट उत्पन्न झालं होतं . ते म्हणजे सफारीचे (१५ सकाळ) आणि Resort (१४ रात्र) बुकिंग. पुन्हा एकदा बाई साहेबांची मनधरणी सुरु केली . पण ह्या वेळेस मामला कठीण होता , नाही म्हटले तरी मागच्या वेळेचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता . त्यामुळे ह्यावेळेस तोफगोळ्यांना वाटाघाटीनी उत्तर द्यायचे ठरवले . दिवाळीचा पाडवा जवळ आलाय अशी आठवण करुन दिली , मग काय …. झाला मूड ठीक . "उद्या जाते आणि बघते काही होतंय का " असा वायदा मिळवला . एका आठवड्यात कन्फर्मेशन आले . सगळ्या सफारी आणि resort बुकिंग झालंय . हुश्श … चला सगळं काही जमलं . दरम्यान भावाने गाडी बुक करून ठेवली होती . Everything is set … कोणी विचारले तर आम्ही आता आत्मविश्वसानाने सांगू शकत होतो , अगदि पु. ल. style , " १३ नोव्हेंबर ला !!!!" क्रमश : जाता जाता - १. ह्या भागात सुद्धा फोटो नाही टाकले , कारण पहिल्या दोन्ही भागात मी trip च्या पूर्वतयारी विषयी लिहिले आहे , त्यामुळे फोटो टाकणे संयुक्तिक नाही वाटले . भरपूर फोटो आहेत जे पुढच्या भागात प्रकाशित करेनच . २. माझे आणि zoomcar चे कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत .

Book traversal links for वाघोबा at ताडोबा भाग - २

  • ‹ वाघोबा at ताडोबा भाग - १
  • Up
  • वाघोबा at ताडोबा भाग - ३ ›

प्रतिक्रिया द्या
4351 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ए
एक एकटा एकटाच Sun, 12/27/2015 - 05:19 नवीन
मजा येतेय वाचायला...... पुढिल भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 12/27/2015 - 07:01 नवीन
वाखुसाआ.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sun, 12/27/2015 - 07:05 नवीन
आता ताडोब्यात वाघ दिसला की नाही ही उत्सुकता लागून राहिलेय.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 12/27/2015 - 07:22 नवीन
वाचायला मज्जा येते आहे!
  • Log in or register to post comments
र
राजू Sun, 12/27/2015 - 08:05 नवीन
पुढचा भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sun, 12/27/2015 - 11:05 नवीन
वाचतोय..... पटापट टाका...
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 12/29/2015 - 12:36 नवीन
TEAM-BHP चा नियमित वाचक
मी पण ! मी पण !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा