Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमात हे असेच घडते....

म — माहीराज, Tue, 12/29/2015 - 17:26
हे मन का अधीर होते स्पर्शाने मोहून जाते.. कधी पावलात अडखळते कधी चांदण्यात उलघडते प्रेमात हे असेच घडते प्रेमात हे असेच घडते .....।। हे स्वप्न असे की भास असे तुझी आस लागे मनाला स्वच्छंद नवा सहवास तुझा मग वेड लावी जीवाला असे मन हे माझे भुलते अन् पाखरू होऊन उडते स्वप्नात तुझ्या हे वेडे दूर आभाळाला भिडते.... प्रेमात हे असेच घडते प्रेमात हे असेच घडते .....।। हा दिवस असो वा रात्र असो मी मात्र तुझ्या भोवताली स्वप्नात तुझ्या बैभान असा मी जाण न उरते काही असे रोजच का हे घडते मन तडफडते धडपडते अन् ओल्या याच क्षणाला मन तुझ्याचसाठी झुरते. . प्रेमात हे असेच घडते प्रेमात हे असेच घडते .....।।

प्रतिक्रिया द्या
1612 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/29/2015 - 17:49 नवीन
अजून चांगलं प्रेम करा. आणि अनुभव जरा जबरा येऊ द्या. धडधडणे, झुरणे, रडणे, पडणे, इ.इ. सर्व प्रेमात होतं. पण, अनुभव कसा थेट भिडला पाहिजे. कविता भिडत नै. आज फिर बैठे है एक हिचकी के इंतजार मे पता तो चले वो कब हमे याद करते है -दिलीप बिरुटे (उचकीची वाट पाहणारा)
  • Log in or register to post comments
म
माहीराज Wed, 12/30/2015 - 18:06 नवीन
वाह ।।
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Wed, 12/30/2015 - 18:25 नवीन
छान लिहिले आहे.... वेडं प्रेम....
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 12/30/2015 - 18:31 नवीन
चार दिन की चांदनी. बहुधा प्रेमकथांचा शेवट लग्नात होतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा