सिंहलव्दीपाची सहल : १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================आजच्या सहलीच्या पहिल्या भागात रावणाने सीतामाईला जेथे बंदी करून ठेवले होते त्या अशोकवनातून प्रवास करायचा होता.
आजच्या पाचव्या दिवसाचा कार्यक्रम असा होता...
सिंहलव्दीपाची सहल : पाचवा दिवस : नुवारा एलिया --> सीता एलिया --> रावण एल्ला --> एल्ला गॅप
--> याला राष्ट्रीय उद्यान --> कातारागामा (वस्ती) (मूळ नकाशा जालावरून साभार)
***************
सीता अम्मान कोविल (सीतामातेचे मंदिर)
नुवारा एलियापासून पाच किलोमीटरवर रस्त्याला लागून एका जलप्रवाहाच्या आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या जागेत आधुनिक कालात बांधलेले दक्षिण भारतीय शैलीतले एक मंदिर लागते. हेच सीता एलिया (सीता पठार) नावाच्या गावात असलेले सीता अम्मान कोवील किंवा सीतामातेचे मंदिर. नाव सीतामंदिर असले तरी मंदिरात सर्वसाधारण राममंदिराप्रमाणे राम, सीता आणि लक्ष्मण या तिघांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या शेजारी एक आधुनिक कालात बांधलेले हनुमान मंदिर आहे. या मंदिराजवळ शेजारच्या ओढ्याकाठी असलेल्या अजून एका छोट्या मंदिरात एक शतकापूर्वी सापडलेल्या तीन मूर्ती आहेत व त्यातील एक सीतेची आहे असे म्हणतात. स्थानिक लोकांच्या मते त्या मूर्ती येथे अनेक शतकांपासून पुजल्या जात आहेत. मंदिराला लागून एक झरा वाहतो, त्याला सीता झरना असे म्हणतात. त्याच्या मंदिराशेजारच्या भागाला सीता पोकुना (सीता स्नानकुंड) असे म्हणतात. बंदिवासात असताना सीता येथे स्नानाकरिता येत असे व झर्याच्या मंदिरापलीकडील काठावर असलेल्या एका कातळावर बसून ध्यानधारणा करीत असे असे म्हणतात. झर्यातल्या व काठावरच्या कातळांत गोलाकार खड्डे आहेत. काहींच्या मते ते रावणाच्या हत्तींच्या पायाचे ठसे आहेत, तर काहींच्या मते ते हनुमानाच्या पायांचे ठसे आहे. खरे खोटे राम जाणे. स्थानिक दंतकथेप्रमाणे, या परिसरातले हाक्काला वनस्पतिशास्त्र उद्यान (Hakgala Botanical Garden) या नावाने ओळखले जाणारे जंगल हेच, जेथे सीतेला रावणाने बंदी करून ठेवले होते ते, अशोकवन आहे. त्या जंगलात खरोखरच अनेक अशोकवृक्ष आहेत. अशोकवनातील सीतेच्या बंदिवासाची जागा समजल्या जाण्यार्या स्थानावरही एक सीतामंदिर बांधावे अशी या मंदिराच्या विश्वस्तांच्या इच्छा आहे. त्या स्थानाच्या पर्यटनस्थळ म्हणून असलेल्या मोठ्या महत्वामुळे, तेथे मंदिर व तीर्थक्षेत्राची विकासकामे करण्यासाठी श्रीलंकेच्या पर्यटन मंत्रालयाने १२.८ हेक्टर जागेची निश्चितीही केली होती. मात्र, काही बौद्ध संस्था आणि पर्यावरणवादी संघटनांच्या विरोधामुळे तो प्रकल्प स्थगित केला गेला आहे. धर्मकारण आणि धर्माआडून राजकारण खेळले जाणे वैश्विक वस्तूस्थिती आहे ! रस्त्याला खेटून आणि रस्त्यापेक्षा बर्याच खाली असलेल्या चिंचोळ्या जागेवर असल्याने या मंदिराचे फोटो काढणे थोडेसे जिकिरीचेच काम आहे. त्यातही वरूणराज मधूनच अचानक आपली हजेरी लावून आमची तारांबळ उडवीत होतेच ! हे त्या मंदिराचे काही फोटो...
सीतामंदिर ०१ : समोरून
सीतामंदिर ०२ : एका बाजूने
सीतामंदिर ०३ : कलश
सीतामंदिर ०४ : कलशपट्टीकेमधला एक मूर्तीगट
सीतामंदिर ०५ : मंदिराच्या सभामंडपातून दिसणारे गर्भागार
सीतामंदिर ०६ : गर्भागारातल्या मूर्तीचा जवळून घेतलेला फोटो
सीतामंदिर ०७ : सीताकुंड आणि तेथील कातळावरचे "रावणाच्या हत्तींच्या / हनुमानाच्या पायांचे ठसे"
सीतामंदिर ०८ : हनुमान मंदिर
सीतामंदिर ०९ : प्राचीन मूर्तीं ठेवलेले मंदिर
सीतामंदिर १० : मंदिराजवळून दिसणारा अशोकवनाचा एक भाग
सीता एलिया ते एल्ला गॅप मार्गावर ०१
सीता एलिया ते एल्ला गॅप मार्गावर ०२
सीता एलिया ते एल्ला गॅप मार्गावर ०३
एल्ला गॅप (एल्ला दरी)
सीतामंदिरापासून तासा-दीड तासाने येणार्या एल्ला गॅप नावाच्या ठिकाणी थांबलो. हे खास थांबून सृष्टीसौंदर्य पाहण्याचे ठिकाण आहे असे प्रवासी कंपनीने माहितीपत्रकात लिहिले होते. मला तसे काही विशेष सृष्टीसौंदर्य दिसले नाही...
एल्ला गॅप
रावण एल्ला (रावण गुहा)
एल्ला गॅपपासून साधारण १०-१५ मिनिटात रावण एल्ला (रावण गुहा) असा फाटा येतो. गुहा मुख्य रस्त्यापासून पायवाटेने एक किलोमीटर आत जंगलात आहे. या जंगलात बोगद्यांचे एक जाळे आहे व ते रावणाने बनवलेले गुप्त मार्ग आहेत असे समजले जाते. रावणगुहेशेजारी कालुतरा नावाच्या ठिकाणी एक बुद्धमंदिर आहे. ही जागा रावणाच्या राजवाड्याची होती असे म्हणतात. एक दुर्लक्षित गुहा आणि त्यातल्या खास कोरीवकाम अथवा वैशिष्ठ्ये नसलेल्या मूर्ती असे त्या रावण गुहा मंदिराचे स्वरूप आहे असे मार्गदर्शकाकडून समजले. तेथे असलेल्या माहिती देणार्या पाट्यांवरूनही पावसात भिजत एक किमी दूर पायवाटेने जाण्याइतपत काही असेल असे वाटले नाही. तेव्हा पाट्यांवरच्या फोटो व माहितीवरच समाधान मानले...
रावण एल्ला (रावण गुहा) ०१
रावण एल्ला (रावण गुहा) ०२
रावणगुहा ते याला रस्त्यावरचा एक धबधबा
Book traversal links for सिंहलव्दीपाची सहल : १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments