विरहाची कास
देह फुलवात
सांजेची ज्योत
त्यागते कात
नागिणीची माया !
अत्तराचे बंध
वाहती सुगंध
कपाळी गंध
ओल्या चंदनाचा !
वाहता पान्हा
कोरडा कान्हा
जाहला गुन्हा
देह बळजोरीचा !
अंतरात काटा
फुटती लाटा
जोगीयाच्या बटा
कश्या विखुरल्या !
राऊळी नगारा
राखेचा ढिगारा
मोराचा पिसारा
रानात गळाला !
सांगा साजणीस
मनातले क्लेष
उरात विष
साठून ठेवले !
कुवार गर्भास
पिशवीची आस
विरहाची कास
धरू नये !
सजली शेज
वेगळाच बाज
समुद्राची गाज
ऐकू नये !
विजयकुमार.........
07 . 01 . 2010 , मुंबई
💬 प्रतिसाद
(2)
श
शार्दुल_हातोळकर
गुरुवार, 12/31/2015 - 18:07
नवीन
मस्त!! जोरदार !!
- Log in or register to post comments
न
नितिन नितिन
Fri, 01/01/2016 - 08:54
नवीन
सुरेख लिखान
- Log in or register to post comments