Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही शब्द अनाथ बालकांसाठी

म
माहीराज
Sat, 01/02/2016 - 06:46
🗣 2 प्रतिसाद
कोण पालक या अजाण बालकांचा  .. या दिनकराच्या लख्ख प्रकाशाने उजळलेल्या अथांग सभागृहात अचानक कुट्ट काळोख पडावा असा अंधकार या निरागस जीवाच्या नशीबी का यावा? काय चुक आहे यांची? हे ईश्वरा, परमेश्वरा, ही सारी तुझीच लेकरं तरी एकाच्या मुखात तुप रोटी आणि दुसरा उपाशी पोटी असा भेदभाव का ? आणि कशासाठी? एखाद्या बीजाला अंकुर फूटतो तसा एखादा निरागस जीव जन्माला येतो.पण डोळ्यांना स्वप्न दिसण्याआधीच त्याला कुठल्या तरी कचऱ्याच्या डब्यात किंवा उकिरड्यावर फेकलं जातं, का? आपल्या नाजुक पायावर उभं राहण्याआधीच त्याच्या पायात या फुटक्या नशिबाच्या बेड्या का घातल्या जातात? जन्म आणि मरण यांच्यातला प्रवास म्हणजे जीवन.. पण यांनी हे जीवन कसं जगावं?  कोणाकडे पाहून जगावं? कोणाला माऊली म्हणावं? कोणाच्या कुशीत शिरून रडावं हसावं? कोणाकडे हट्ट करावा आणि कोणाला सांगावं की भुक लागली आहे,जेवायला दे! आज काळाने मानवतेवर असे काही घाव घातलेय की प्रत्यक्ष स्वर्गासारख्या वाटणार्‍या या दुनियेत या अजाण बालकांना आपलं म्हणणार कुणीच उरलं नाही ? एक कळकळीची विनंती आहे तुला की देवा,परमेश्वरा,करूणाकरा जरी मला स्वार्थाचा ध्यास असला तरी आधी त्यांना सुखाचा घास दे .. माझी झोळी रिकामी राहीली तरी चालेल पण त्या जीवाला दोन वेळची पोळी दे.. जसा माझ्या मनात तुझा आदर तसा त्या जीवाला तुझ्या मायेचा पदर दे..
वर्गीकरण
विचार

प्रतिक्रिया द्या
1135 वाचन

💬 प्रतिसाद (2)
म
माहीराज Sat, 01/02/2016 - 06:49 नवीन
जे वाटले ते निखळ मनाने लिहीले .. आशा आहे की किमान या बालकांना आपला आशिर्वाद मिळावा.
  • Log in or register to post comments
ल
लीना घोसाळ्कर Wed, 01/06/2016 - 11:44 नवीन
माहीराज..... कोणाकडे पाहून जगावं? कोणाला माऊली म्हणावं? कोणाच्या कुशीत शिरून रडावं हसावं? कोणाकडे हट्ट करावा आणि कोणाला सांगावं की भुक लागली आहे,जेवायला दे!... Jenva jenva hya vishayacha vichar karte tenvha tenvha hech sagle prashna manaat yetat.....
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा