Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रचना कशी असावी...?

र — राघव, Sat, 01/02/2016 - 22:01
नुसतेच शब्द सारे.. गाभा मुळी कळेना.. स्वतःस प्रश्न केला.. रचना कशी असावी? होता जरी जरासा.. अर्थ, अडकलेला.. तरीही मनांत म्हटले.. रचना अशी असावी? मजला तरी कळावी, मम भावना मनीची.. आशय जिथे गमेना.. रचना तशी नसावी.. सहज-सुगम्य भाषा.. विषया धरून यावी.. बोजड कशास व्हावे.. रचना तशी असावी.. फुलती सहज जैसे ऋतुरंग आसमंती.. अर्थास शब्द यावे.. रचना तशीच व्हावी.. आशय थेट यावा अन् अंतरी भिडावा.. जन्मून सार्थ व्हावी.. रचना तशी असावी. राघव

प्रतिक्रिया द्या
2295 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्रचेतस Sun, 01/03/2016 - 03:14 नवीन
सुरेख रचना.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 01/03/2016 - 06:33 नवीन
काव्य कसे असावे याचा धडाच जणु.....
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 01/03/2016 - 07:44 नवीन
सुरेख कविता!
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 01/03/2016 - 22:23 नवीन
तुमचे प्रतिसाद बघून आनंद झाला.. धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 01/04/2016 - 00:11 नवीन
@आशय थेट यावा अन् अंतरी भिडावा.. जन्मून सार्थ व्हावी.. रचना तशी असावी ! :- अप्रतिम.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 01/04/2016 - 01:08 नवीन
रचना आवडली.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 01/04/2016 - 08:12 नवीन
Mast
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 01/04/2016 - 11:21 नवीन
वाह, मस्तच ! वस्तुपाठच घालून दिलात .
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 01/04/2016 - 11:25 नवीन
रचना कशी असावी...?
वि.ठा. यांना विचारा
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 01/04/2016 - 17:59 नवीन
पुनःश्च आभार! अर्थात् मला हे फक्त कवितेसाठी म्हणून नव्हते म्हणायचे. :-)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 01/04/2016 - 18:03 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा