"तू"
मी कितीही विखुरलो
छिन्न भिन्न जाहलो
तू मला गोळा करतेस
लहान मुलाने चित्रकोडे
एकत्र करावे तसे ......................!
मी इतुका अवघडलेला
तु मला सहज मोकळा करतेस !
सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ?
मी नेहमीच फाटलेल्या
वस्त्रासारखा अलगथलग
तु सगळा मला जोडुन
आईच्या मायेने,
माझ्या फाटलेल्या वस्त्रांची गोधडी करतेस
उबदार, आश्वस्त...................
सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ?
थंडी इतुकी कडाक्याची
झाडांचे ही खराटे होतात
गिळुनी सगळा उबदारपणा
रात्रीही गारठ्तात
तु मात्र............
मला बाहुपाशात घेऊन
विश्वाची उब माझ्या शरीरात भरतेस !
सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ?
तुझ्या स्तनातून वाहणारे दूध
नाकारून
तु तुझ्या विसर्ग झालेल्या गर्भाला
विसरलीस माझ्यासाठी !
सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ?
मी मात्र
पुन्हा पुन्हा उबीसाठी
तुझ्या शरीराला झोंबतो
अन्
तु तरीही माझ्यासाठी मोकळी होतेस
हरेक रात्रीस !
सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ?
विजयकुमार
१४/०५/०८
💬 प्रतिसाद
(7)
श
शार्दुल_हातोळकर
Mon, 01/04/2016 - 13:07
नवीन
मस्त.... जोरदार लिहिले आहे!!
- Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १
Wed, 01/06/2016 - 16:21
नवीन
हे पण छान आहे हो वाचा ना क्रुपा करुन
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/07/2016 - 05:06
नवीन
आवडली ..
- Log in or register to post comments
प
पर्ण
गुरुवार, 01/07/2016 - 14:08
नवीन
कधी तू चम चम करणारी चांदण्यात....
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/07/2016 - 15:59
नवीन
आवड्ली कविता. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Fri, 01/08/2016 - 13:20
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 01/08/2016 - 13:36
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments