Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राणीच्या बागेत - झाडांच्या सावलीत

क
कंजूस
Mon, 01/04/2016 - 09:43
💬 24
(फोटो नोकिया ६३० मोबाइलचे.) १) पत्रक

२ ) वेगळ्या कोनातून मनोरा

३ ) जमलेले इच्छुक गाइड उषाकडून माहिती ऐकताना-

४) जमलेले इच्छुक रिनी व्यास'कडून माहिती ऐकताना-

५ ) कैलास्पतीचे फळ

६) चेंडुसारखं फूल

७) एक फूल

८) याच झाडाचं फूल आफ्रिकेतल्या महाकाय झाडाचा हा छोटा अवतार.

९) अशोकाच्या जातीतले झाड ऊर्वशी आणि त्याचा गुच्छ.झाड हरिणांच्या कुंपणाच्या आत असल्याने जवळ जाता नाही आलं नियमाने.

१०) पर्जन्य वृक्ष-याने खूप जागा व्यापली आहे.

११) शिवणचे फूल

१२) एक फुलपाखरू

फुलांच्या प्रदर्शनाचा शोध घेताना एक बातमी दिसली - राणीचा बाग भायखळा येथे तीन तारखेस रविवार सकाळी नेचर वॅाक होणार आहे.दुसरं काहीच काम नसल्याने साडे आठलाच हजर झालो.दिलेल्या वेळेवर नऊला चाळीसजण जमले आणि Tree Appreciation Walk या ग्रुपतर्फे उषा यांनी तीन तास पंचवीस एक वृक्षांची माहिती दिली.इथली बरीच झाडे आफ्रिका/द अमेरिकेतली आहेत.झाडे आणली पण फुलांच्या परागीभवनातून फळ बनायला लागणारे खास कीटक नसल्यामुळे काहींना फक्त फुलेच येतात.फळ नाही धरत.उंबर जातीच्या प्रत्येक झाडासाठी वेगळा कीटक लागतो त्याबद्दलच्या लेखाबद्दल सांगितलं जगदीश याने असे काही कार्यक्रम आपणही करुया अथवा अथवा असं करणारे आपल्या भागातले शहरातले गट असतील तर त्यात जमून काम करुया.थोडाफार विरंगुळा आणि सामाजिक दायित्व दोन्ही साध्य होईल नाही का? संदर्भ १ ) सहा वर्षांपुर्वी महानगरपालिकेने इथली झाडे तोडून ती जागा "विकसित" करण्याचा आराखडा आणला होता त्याला विरोध करण्यात यश मिळवले त्या ग्रुपबद्दल इथे- http://saveranibagh.org/ourStruggle.php २ ) नेचर वॅाक करणारा ग्रुपचे फेसबुक ग्रुप पेज TAWMumbai ३) अंजीर,वड ,पिंपळ इत्यादी focus पद्धतींच्या झाडांचे फळ तयार होण्यासाठी फुलांचे परागीभवन वेगवेगळे कीटक करतात.त्याविषयी लेख रविवार ३ जानेवारीच्या Indian Express पेपरात आला होता-- http://epaper.indianexpress.com/682553/Indian-Express-Mumbai/03-January-2016#page/1/1

प्रतिक्रिया द्या
16140 वाचन

💬 प्रतिसाद (24)
क
कंजूस Mon, 01/04/2016 - 09:55 नवीन
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 01/04/2016 - 10:04 नवीन
हा कूटसंदेश आहे का? की मलाच पडद्यावर काही दिसत नाहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सतिश पाटील Mon, 01/04/2016 - 10:09 नवीन
काही दिसत नाही ब्वा
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 01/04/2016 - 10:17 नवीन
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 01/04/2016 - 10:18 नवीन
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 01/04/2016 - 10:19 नवीन
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 01/04/2016 - 10:29 नवीन
कळलं. पुढे काय? ;)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 01/04/2016 - 10:33 नवीन
सॅारी माझा लेख (राणीच्या बागेत---) फक्त नाव नोंदले गेले आहे पण लेख अपलोड होत नाहीये error- website encountered unexpected वगैरे.नंतर करून पहातो
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 01/04/2016 - 14:00 नवीन
काहीही दिसत नाहीये
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 01/05/2016 - 05:11 नवीन
सर्व फोटो आवडले. पण फक्त ९च फोटो का बारा अपलोडवले? राणीच्या बागेत बरीच वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. या निमित्ताने नुलकरकाकांनी काही दिवसांपूर्वी राणीच्या बागेतल्या विविध प्रकारच्या झाडांवर लिहिलेला लेख आठवला. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर Tue, 01/05/2016 - 05:39 नवीन
जिजामाता उद्यान कट्ट्याचा दुवा टाकल्याबद्दल.. (इथे सविस्तर लिहायचे कष्ट वाचवलेत, म्हणून) @कंजूस : फोटो आवडले. आता उद्यानाला लवकरच भेट देणं आलंच..! कदाचित येत्या रविवारी (१० तारखेला) कुणी तयार आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अजया Tue, 01/05/2016 - 14:23 नवीन
जाणे नक्की होत असेल तर मी येते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर
न
नाखु Tue, 01/05/2016 - 05:23 नवीन
फोटु दिसेना ,धागा कळेना नाखु खंत करी,जेपी काही केल्या बोलेना.... बाकी नाम माखु
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 01/05/2016 - 06:05 नवीन
राणी बागेचं आताचं पुर्वीचं प्राणि संग्रहालय हे महत्त्व जाऊन फक्त वनस्पती उद्यान राहिलं आहे.फोटो आणखी बरेच टाकता येतील परंतू इतरांनाही काही काम हवं ना?पंधराच्या वर फोटो गेले की मोबाइलवाले ओरडतात धागा उघडत नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 01/05/2016 - 06:12 नवीन
पुढच्या महिन्यात BMC FRUIT FLOWER TREE SHOW असणार आहे ( बहुतेक १४-१६ फेब्रु) तेव्हा जाणार आहे.त्यावेळी मिपाकर ठरवून आले तर कट्टा + प्रदर्शन दोन्ही कामं होतील.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 01/05/2016 - 06:19 नवीन
नेचर वॅाक + Tree Appreciation Walk शहरातले गट असतील तर त्यात जमून काम करुया.थोडाफार विरंगुळा आणि सामाजिक दायित्व
कल्पना मस्तच आहे, वनस्पतींबद्द्ल फारशी माहिती नसलेली पण औत्सुक्य असलेली बरीच मंडळी असतील, अर्थात फुकट करावयाचे म्हटले की केव्हातरी उत्साह मावळण्याची शक्यता असते, या विषयातील जाणकारांनी 'नेचर गाईड' सारखा व्यवसाय म्हणूनही सुरु करण्यास हरकत नसावी. शाळा महाविद्यालयांचा विद्यार्थीवर्गही कदाचित ग्राहक म्हणून उपलब्ध होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 01/05/2016 - 07:53 नवीन
लेखात संदर्भ वाढवला आहे.उदा० सेव रानीबाग साइट आणि नेचर वॅाक करणारा ग्रुप /फेसबुक पेज.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 01/05/2016 - 09:59 नवीन
नेहमीप्रमाणेच फोटो दिसत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 01/05/2016 - 14:14 नवीन
विशेषत मनोर्‍याचे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 01/05/2016 - 14:23 नवीन
सुंदरच. अशी अजस्त्र झाडे भीमाशंकरच्या जंगलात पाहिली आहेत. असाच एक कुठला तरी अतीप्रचंड वृक्ष मेणवलीच्या नाना फडणवीसांच्या वाड्याच्या पुढ्यात आहे. मनोर्‍याचं प्रवेशद्वार बघताना का कोण जाणे पण चैत्यकमान आणि गवाक्षांचा भास होतोय.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 01/05/2016 - 17:31 नवीन
सुंदर फोटो. मनोरा सकाळच्या उन्हात फारच छान दिसतोय.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 01/05/2016 - 23:41 नवीन
फोटो आवडले. कल्पना छान आहे ही, एकदा जायला हवं.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 01/07/2016 - 15:42 नवीन
मस्त फोटो. अजून सविस्तर वर्णनही आवडले असते.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 01/12/2016 - 13:39 नवीन
झकास फोटो! ही झाडे पाडून कसला विकास करणार होते ते कर्माचा?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा