कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी!
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं
हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं
ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं
आता फक्त ऑफिस की हो उरलं!
मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर.
कोण नाही पर्वा करायला
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला!
रात्रभर एकटा बसू कसा?
क्लायंटला अडचण सांगू कसा?
बाकीचे सारे, प्रोफेशनल खरे
जातात टायमात ते घरला!
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
जमेल तेवढं खेचून मी काम
नाही केला आजिबात आराम
सकाळचा नाष्टा, रात्रीचं जेवण
मिळेना आजकाल बघायला!
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
थंडीत मरणाचं गारठून
पावसात येतो मी भिजून
उन्हाच्या झळा, माझ्याच भाळा
जातोच सुट्टी मागायला
कुठं कुठं जाऊ मी सांगायला
- संदीप चांदणे
💬 प्रतिसाद
(5)
श
शार्दुल_हातोळकर
Mon, 01/04/2016 - 12:56
नवीन
क्या बात है!!
धमाल विडंबन!!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 01/04/2016 - 13:14
नवीन
हाहा =))
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 01/04/2016 - 14:42
नवीन
=)) =))
तेवढ जुन्या जाणत्यांनी "गरम पाण्याचे कुंड" आणि "कोडाईकनाल" या शब्दांमागचा खरा अर्थ सांगितला तर फार उपकार होतील! तेवढीच माझ्यासारख्या नवमिपाकरांच्या ज्ञानात वाढ होईल! :)
धन्यवाद,
Sandy
- Log in or register to post comments
र
रातराणी
Wed, 01/06/2016 - 00:18
नवीन
आवडले!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 01/06/2016 - 09:48
नवीन
:)
- Log in or register to post comments