Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लडाख....एक स्वप्न!

क
कबीरा
Wed, 01/06/2016 - 07:08
💬 34
जेव्हापासून दुचाकी वर भटकंती सुरु केली आणि लांबचे पल्ले गाठण्यास सुरुवात केली तेव्हापासून लोक्स अरे लडाखला जाऊन आलास का?, एवढा दुचाकी वर फिरतोस तर लडाख ला जाऊन ये असा सांगायला,सुचवायला लागले. तेव्हापासून सतत डोक्यात लडाख वारी चा विचार येत होता. भरपूर blogs वाचले, भरपूर माहिती मिळवली. त्या संदर्भातली भरपूर पुस्तक वाचली. असा म्हणा की गेले वर्षभर दहावीत असल्या सारखा अभ्यास चालू आहे लडाख वर.आता म्हणल बास जाऊन यायचंच ह्या वर्षी अन उचलला इडा लडाख चा बरोबर १ जानेवारी च्या उगवत्या सूर्याला साक्ष धरून. त्या दृष्टीनी लगेचच तयारी सुरु केली. फिटनेस साठी नियमित व्यायाम चालू केलाय, गाडीची साधारण दुरुस्ती यावी म्हणून यामाहा workshop मध्ये रोज अर्धा तास शिकायला जातोय. पैशांची बचत चालू केलीये :P कधी निघायचा हे अजून पक्क केलेलं नसल तरी तिकडच्या हवामानानुसार, रस्ता कधी खुला होईल हे सर्व बघून तारीख पक्की करीन. साधारण जुलै चा शेवटचा आठवडा पकडून चाललोय. पुणे-लडाख-पुणे circuit करणार असल्यामुळे २५ दिवसांचा कालावधी पकडून चाललोय. हे लिहिण्याचा मूळ उद्देश असा की भरपूर लोक्स हे स्वप्न उराशी बाळगून असतात, तर ज्यांना कोणाला हे वेडेपण करायची इच्छा असेल ह्या वर्षी तर आत्ता पासूनच एकत्र येउन नियोजन चालू करू. २-३ छोट्या- मोठ्या ट्रीप करता येतील एकत्र जेणेकरून sync व्हायला मदत होईल. शेवटी एकट्याने जाण्यापेक्षा टीम तयार झाली तर कामच छान होईल.!

प्रतिक्रिया द्या
7693 वाचन

💬 प्रतिसाद (34)
स
सतिश पाटील Wed, 01/06/2016 - 07:24 नवीन
प्रवासाला शुभेच्चा.... नक्की जाऊन या
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 01/06/2016 - 07:37 नवीन
लडाख जमणार नाहीये या वर्षी.. मात्र पुण्याजवळ ट्रीप असल्यास जरूर व्यनी करा. शक्य असेल तर नक्की येईन.
  • Log in or register to post comments
ग
गिरीश मांधळे Wed, 01/06/2016 - 07:41 नवीन
ट्रीप ठरवल्याबद्दल अभिनंदन आणि प्रवासासाठी शुभेच्छा! आमच्या(मी, "मार्गी" आणि अजून एक मित्र) ऑगस्ट २०११ ट्रीपची आठवण झाली. आधी बाईक्स घेऊन जायचे ठरवले होते पण प्रथम तो परिसर माहित करून घेऊ आणि नंतर पुढच्यावेळेस बाईकवर जाऊ असे ठरले. ते "पुढच्यावेळेस" अजून बाकी आहे! :) बघु कधी जमते. तुमची बाईक कोणती आहे यामाहाची?
  • Log in or register to post comments
व
विलासराव Wed, 01/06/2016 - 08:04 नवीन
मी १५ में ते १५ जुलैपर्यंत लेहलाच असणार आहे. संपर्क साधल्यास जरूर भेटू.
  • Log in or register to post comments
म
मनराव Wed, 01/06/2016 - 08:10 नवीन
आयुष्यभर लक्षात राहिल असा प्रवास आहे........ :)
  • Log in or register to post comments
र
राजकुमार१२३४५६ Mon, 01/11/2016 - 07:08 नवीन
आम्हि तयार आहोत.
  • Log in or register to post comments
आ
आरोह Mon, 01/11/2016 - 08:05 नवीन
माझा मित्र spity valey thru enfield bulet (१८ ते ९ ऑगस्ट २०१५) वरून लढखला गेला होता. काही मदत लागल्यास सांगा..
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Tue, 01/12/2016 - 12:32 नवीन
पुणे लेह पुणे करण्यापेक्षा पुणे ते जम्मू ट्रेन ने गाडीबरोबर आणि येतंना चंडिगड ते पुणे ट्रेन असा करावा, आणि लद्दाख - काश्मीर मधे जास्त वेळ द्यावा. मी २० दिवस होतो पण तेही मला कमी वाटले.
  • Log in or register to post comments
म
मनराव गुरुवार, 01/14/2016 - 09:57 नवीन
तिकडे मिळतील तितके दिवस कमीच पडणार.... पण पुणे-लेह-पुणे केवळ अप्रतीम.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव गुरुवार, 01/14/2016 - 12:25 नवीन
आपापल्या आवडी. जर वेळ कमी असेल, तो नेहमीच असतो, तर लेहला जाण्यासाठी भारतभ्रमणाची गरज नाही. या प्रवेसा जे थ्रिल आहे ते लेह सर्किट ( जम्मू-श्रीनगर- लेह-मनाली - चंडीगड 2/2500 किमी)मधे मिळते. त्यासाठी 4000 किमी पुणे-जायपुर- दिल्ली कशाला? अर्थात, गाडी चालवणे हे ध्येय असेल तर कन्याकुमारी मार्गे ही जाता येईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव
म
मनराव गुरुवार, 01/14/2016 - 13:17 नवीन
पुण्यातुन तिथे पर्यंत जाऊन परत येणे हा एक वेगळा अनुभव... लेह-लडाखला फक्त एकदाच जाऊन मन त्रुप्त होत नाही... वहाँ तो बार बार जाना चाहिए... परत जाताना तुम्हि म्हणालात तसे जाऊ.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
आ
आनंदराव Wed, 01/13/2016 - 07:27 नवीन
पुण्यातील म्हणजे पुण्याजवळच्या राईड असतील तर सांगा येऊ नक्की
  • Log in or register to post comments
क
कबीरा Wed, 01/13/2016 - 07:51 नवीन
आनंदराव, पुण्या जवळच्या ride ठरवू नक्कीच.काय म्हणता? बोला कधी करायची सुरुवात?
  • Log in or register to post comments
आ
आनंदराव गुरुवार, 01/14/2016 - 08:08 नवीन
ठरवा कधीपण ! मी ठरवली तर तुम्हाला सांगेनच. सग्ळ्यांची मोट जुळ्णे तसे अवघड असते. पण ट्राय तर करु ! येत्या रविवारी एक काम आहे. ते जर क्यान्सल झाले तर ताम्हीणी मार्गे लोणावळा करण्याचा बेत आहे. अजुन फिक्स नाही. बाय द वे, तुम्ही व्यायाम कोणता चालू केला आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कबीरा
क
कबीरा Wed, 01/13/2016 - 07:52 नवीन
राजकुमार भाऊ, तयार असाल तर जमवूच नक्की
  • Log in or register to post comments
र
राजकुमार१२३४५६ Wed, 01/13/2016 - 08:01 नवीन
आपल्याला व्यक्तिगत मेसेज पाठवला आहे. वाचा आणि परत पाठवा आपल्या मोबाईल नंबर सहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कबीरा
क
कपिलमुनी Wed, 01/13/2016 - 08:08 नवीन
ही बोलाची कढी बोलाच्या भातासोबत बर्‍याच वेळा खाल्ली आहे. बाकी त्या कचकड्याच्या यामाहाचे बरेच पार्ट सोबत न्या !कधीपण गंडते.
  • Log in or register to post comments
स
सतिश पाटील Wed, 01/13/2016 - 10:49 नवीन
यामाहा गाडी इकडे सोबत नाही नेलीत तर तुमची ट्रीप सुखाची होईल. बरेच यामाहा वाले हतबल होऊन गाडीला किका मारताना पाहिलेत लदाख मध्ये
  • Log in or register to post comments
र
राजकुमार१२३४५६ Wed, 01/13/2016 - 15:16 नवीन
जरा कारण पण सांगितले तर सोयीचे होईल पाटील साहेब आमची पण यामाहा ची फेझर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
स
सतिश पाटील गुरुवार, 01/14/2016 - 06:47 नवीन
जाताना असे वाचनात आले होते कि यामाहा तिकडे बंद पडते. तिकडे प्रत्यक्षात खूप ठिकाणी पहिले. FZ आणि फेझर गाड्या तिकडे मधेच बंद पडतात. चालूच होत नाहीत.त्या चालकांचे हताश चेहरे पाहून दया येत होती. ऑक्सिजन कमी असल्याने आणि ते वातावरण त्या गाडीच्या इंजिनाला ते कदाचित झेपत नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजकुमार१२३४५६
र
राजकुमार१२३४५६ गुरुवार, 01/14/2016 - 09:17 नवीन
आंतरजालावरती याचे कारण शोधले असता असे समजले कि, एर फिल्टर च्या बाबतीत modification करावे लागते. K&N 1100 universal air filter चा उपयोग केल्यास. carburator मध्ये जास्त हवा जाऊन power वाढते. आणि मायलेज मध्ये फक्त थोडा फार फरक पडतो. २ ते ४ kmpl ने कमी होतो. आणि गाडीच्या आवाजात पण बदल होतो. फक्त या एका फिल्टर वरती बहुतेक जणांनी कोणताही अडथला न येता संपूर्ण लदाख पार केला आहे. snapdeal वर याची किमत ३००० रुपये आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील
स
सतिश पाटील Fri, 01/15/2016 - 07:20 नवीन
पावर वाढत असेल, पण प्रश्न आहे गाडी का बंद पडते? याचा शोध घ्या आणि उपाय शोधून तुम्ही यामाहा घेऊन जाऊ शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजकुमार१२३४५६
क
कबीरा गुरुवार, 01/14/2016 - 07:20 नवीन
कपिलमुनी, बाकी तुमचा पाय बरा झाला कि बोलूच
  • Log in or register to post comments
क
कबीरा गुरुवार, 01/14/2016 - 12:36 नवीन
गाडीपेक्षा इच्छाशक्ती वर जास्त जोर द्यावा लागेल अशा खडतर मोहिमेत
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 01/14/2016 - 12:41 नवीन
मला देखील लेह लदाख कारने करायची इच्छा आहे. गेली ३ वर्षे प्लान तर केले पण दर वेळी कुणीतरी ऐनवेळी नाही बोलण्याने कॅन्सल झाले. कारने ह्यासाठी जावे लागेल कारण आम्ही ३ जन आहोत. मी, पत्नी आणी छोटा मुलगा. तेव्हा काही प्रश्न १) फोर्ड फिगो डीझेल ह्या कारने हा प्रवास केला जाऊ शकेल का? २) जर वरील गाडीने शक्य नसल्यास ४ व्हीलर कुठे भाड्याने मिळतील? ३) तिथे कार चालवण्यासाठी काही वेगळे परमिट लागते का? तिथले रस्ते डेंजर असल्याने लागते असे कुणीतरी एकदा मला बोलले होते. खरे खोटे माहित नाही. लागत असल्यास ते कुठे मिळते? ४) तिथल्या विरळ हवेचा लहान मुलांना खूप त्रास होऊ शकतो का? होत असल्यास तो होऊ नये किंवा कमी व्हावा ह्यासाठी काय करावे लागेल?
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव गुरुवार, 01/14/2016 - 12:55 नवीन
हो, अगदी व्यवस्तीत. लोक मारुती 800 नेही करतात. 2. सेल्फ ड्राइव गाड्यांना लेह मधे अडचणी येतात ( भाड्याने घेतलेल्या चार चाकी ) तशीही तुम्हाला गरज नाही. 3. गाडीचे एंजिन खाली जर कव्हरेड नसेल तर ते करून घ्या. 4. परमिट आधी लागायचे, आता नाही ( भारतियांसाठी ). 5. विरळ हवेसाठी एक गोळी आहे ( नाव विसरलो ). तसेच आक्लिमेटाइज़ेशन नीट झाले तर काहीही त्रास होत नाही. त्यासाठी श्रीनगर रस्ता चांगला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 01/14/2016 - 13:33 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव गुरुवार, 01/14/2016 - 13:36 नवीन
बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
स
सतिश पाटील Fri, 01/15/2016 - 07:43 नवीन
मनालीतून जाणार असाल तर आधी परमीत घ्यावे लागते मनाली मध्ये. फोटो ऑगस्ट २०१५ मधला आहे. Image removed. विरळ हवेसाठी डायमोक्स नावाची गोळी आहे डॉक्टर ला विचारून घ्या Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
य
यशोधरा Sun, 01/17/2016 - 08:05 नवीन
डायमॉक्स घ्यायलाच हवी असे नाही, त्रास झाला तरच घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव गुरुवार, 01/14/2016 - 12:44 नवीन
मी 100 सीसी गाडीने, 2 लोक ( बायको आणि मी ) आणि 20 दिवसाचे सामान असा हा प्रवास पूर्ण केला. गाडी पेक्षा गाडीवर बसलेले किती तयार आहेत हे महत्वाचे.
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज गुरुवार, 01/14/2016 - 13:19 नवीन
गाडी पेक्षा गाडीवर बसलेले किती तयार आहेत हे महत्वाचे. >>>> +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
म
मनराव गुरुवार, 01/14/2016 - 13:34 नवीन
हेच पुणे-लेह-पुणे ला पण लागू होते.......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
अ
अभिजीत अवलिया Sun, 01/17/2016 - 07:19 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. अजून एक दोन शंका. तिकडे गाडी चालवताना गाडीची काय काळजी घ्यावी लागते? प्रवासात चुकून बंद पडली तर कुत्रे देखील हाल खाणार नाही. गाडीला कोणत्या समस्या येऊ शकतात आणी त्यासाठी काय तयारी करून जावे. आणी 4 व्हीलर साठी जाण्याचा उत्तम काळ कोणता?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा