बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें
माननिय गुर्जी यास,
प्रेर्ना
बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें,
तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें !
काय म्हणता ?
'बायको' हे प्रकरण नक्की कांय असतें ?
अहो दशरथ असो वा राघोबा, असो परवाचा आमिर,
युगानुयुगे हे कोणालाही न कळले दिसतें,
पन तरिही तुमचं वा त्यांचे अगदी 'सेमचं' असतें !
रुसली तर रुसू दे, भडकली तर भडकू दे !
तरीसुद्धा तरीसुद्धा, तुम्हाला म्हणुन सान्गतो
बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें,
तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें !
एखाद्याची वेळ भरता, मनी लग्नाचे धुमारे उमलू लगतात
संसाराच्या हळदीची पुटं त्याच्या मेंदूवर साचू लागतात ।
आठवतं ना ?
तुमची लग्न घटिका जेव्हा, भरली होती,
"सावधान" म्हणून भटाने
खरंच लाश्ट वॉर्निंग दिली होती !
पण तरीही आंतरपाटामधून बेभान होऊन
तुम्ही काहीतरी शोधत होता,
चौड्यावर उभे राहील्याने
पडता पडता वाचला होता !
कोणालाच तेव्हा कळत नसतं,
आम्हालासुद्धा कळलं नव्हतं !
बेसावध क्षणी हळुवारपणे 'ती' आयुष्यात उतरू लागते,
'व्यापारी म्हणून आले अन राज्यकर्ते झाले'
पुस्तकाबाहेरचा धडा लाइफ शिकवू लागते,
पण, 'तोफ बरसली कि खंदकात लपून वाचण्याची' प्राक्टीस आपण करायची असते,
आणी ती करता करता कधीही तोंड उघडायचे नसते,
त्यावेळी तसंही आपल्या हाती आणखी काय उरलेलं असते ?
कारण
बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें,
तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें !
💬 प्रतिसाद
(15)
प
पद्मावति
गुरुवार, 01/07/2016 - 07:52
नवीन
:)
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 01/07/2016 - 08:19
नवीन
भारी जमलंय.
तरुणपणी ( म्हणजे किती वर्ष नका विचारू ) बायकोचं ऐकाल तर म्हातारपणी ती तुमचं ऐकेल.
- Log in or register to post comments
अ
अबोली२१५
गुरुवार, 01/07/2016 - 08:44
नवीन
मिपा वर आजचा दिवस " बायको डे " म्हणून साजरा करू या….
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 01/07/2016 - 11:35
नवीन
हहहहाहहा
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 01/07/2016 - 13:09
नवीन
अरे देवा, बायको पुराण!!
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 01/07/2016 - 13:39
नवीन
नवरारडे आपलं नवरा डे कधी?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 01/07/2016 - 13:49
नवीन
काही ठिकाणी नवरा डे ला,
'बैलपोळा' असेही म्हणतात.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 01/07/2016 - 15:29
नवीन
:)
- Log in or register to post comments
स
स्रुजा
गुरुवार, 01/07/2016 - 15:47
नवीन
:)
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 01/08/2016 - 03:35
नवीन
खिक्क!
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 01/07/2016 - 19:34
नवीन
म्हणूनच सांगतो, लग्न करू नका. उगीच कटकट हो! ;-)
- Log in or register to post comments
प
प्रसाद को
Tue, 02/02/2016 - 10:09
नवीन
कविता खुप आवडली.
प्र को.
- Log in or register to post comments
म
मारवा
Tue, 02/02/2016 - 13:58
नवीन
अगदी तुमच्या नावासारखी
मस्तय
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 02/02/2016 - 15:12
नवीन
@ >>> छान ! फाडा आता आमच्या नावावर तिकिट! :-/ दुत्त दुत्त! :-/
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 02/02/2016 - 17:18
नवीन
तुमच्या घटी़का भरल्यावर तुम्हाला नाही मिळाली लाश्ट वॉर्निंग गुरुजी?
कुनी दिली?
- Log in or register to post comments