शब्द का नाहीसे होतात
गाभा
माझा एक मित्र डेहराडूनचा आहे, हिंदी साहीत्य वगेरे वाचनाऱ्यांपैकी आहे. पार्टीमधे त्याच्या तोंडून कवि निरज किंवा कवि प्रदीप यांच्या कविता ऐकने म्हणजे एक मेजवाणीच असते. एकदा सहज गप्पा मारीत असताना तो म्हणाला “हमारे भैय्या डेहराडूनमे अध्यापक है.” त्यातला अध्यापक हा शब्द चांगलाच लक्षात राहीला कारण हल्ली हा शब्द कोणी वापरीत नाही. हल्लीच्या टीचर, प्रोफसर च्या जमान्यात कुणी अध्यापक असे म्हणतच नाही. हाच नाही तर असे कितीतरी शब्द जे एकेकाळी वापरात होते ते आज नाहीसे झाले. एका मुलाखतीत प्रसून जोशीने म्हटले की हल्लीच्या वाचकांची शब्दसंपदा कमी झाली आहे. कदाचीत खरे असेल किंवा त्यात इतर भाषेतले शब्द आले असतील. तसाच एक शब्द त्याने पुनर्जीवित केला तो म्हणजे पाठशाला. गेले कित्येक वर्षे हा शब्द वापरात नव्हता तो वापरात आला तो मस्ती की पाठशाला या गाण्यामुळेच.
मागे एका कार्यक्रमात संदीप खरे कविता वाचत असताना गवाक्ष हा शब्द आला. त्याने थांबून गवाक्ष म्हणजे खिडकी असे समजावून सांगितले. आज गवाक्षचा अर्थ सांगावा लागतो. माझ्या माहीतीप्रमाणे हा शब्द बोलीभाषेत फारसा नव्हता परंतु पूर्वीच्या कवितांमधे मात्र हा शब्द बऱ्याचदा असायचा. कदाचित वृत्तबंध कवितांमधे मात्रा वगेरेसाठी उपयोगी पडत असावा. आज मात्र त्या शब्दाचा साहीत्यातला वापर कमी झाला आहे. मुक्तछंद कवितांमधे खिडकी हा शब्द वापरणे जास्त सोयीस्कर वाटत असेल किंवा मीटरमधे बसवताना कडकीला खिडकीच जोडने योग्य वाटत असेल. माझी आज ‘कवाड लाव’ म्हणायची. लहाणपणी आम्ही तिच्या कवाड या शब्दाला हसायचो. मोठे झाल्यावर कळले मनाची कवाडे उघडे ठेवा हे म्हणणे कसे काव्यात्मक असते ते. आज मात्र कवाड हा शब्द गावाकडे पण फारसा वापरला जात नाही सारेच दार हाच शब्द वापरतात. आमच्या सारख्या अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांनी टोकून टोकून लोकांना दार असे म्हणायला भाग पाडले असेल. आजीचा आणखीन एक शब्द म्हणजे कडत. गरम पाण्याला कडत पाणी म्हणायची. आज हा शब्दही लुप्त झाल्यासारखाच आहे.
हे फक्त मराठी हिंदीततच होते असे नाही तर इंग्रजीत सुद्धा असे घडते. ‘Thou too Brutus’ असे आजही जरे म्हटले जात असले तरी व्यवहारी असो किंवा साहीत्यिक इंग्रजी दोन्ही मधून ‘Thou’ हा शब्द केंव्हाच लुप्त झालेला आहे. आजच्या कॉर्पोरेट क्षेत्रात वापरल्या जानाऱ्या इंग्रजीवर अमेरीकन भाषेचा इतका प्रभाव आहे की त्यामुळे आज कॉर्पोरेट जगतातून ‘Gentlemen ’ हा शब्दही नाहीसा होतो की काय अशी भिती वाटते. जो तो ‘Guys, Folks’ करीत असतो.
शब्द लुप्त का होतात? किंवा विस्मृतीत का जातात? इतर भाषेतले शब्द घेउन भाषा समृद्ध होत जाते किंवा कालाय तस्मै नमः ही जरी ढोबळ कारणे असली तरी मला वाटते प्रत्येक शब्द वापरातून नाहीसा होण्यामागे त्या शब्दाशी संबंधित काही खास कारणे असावीत. जसा प्रत्येक शब्दाच्या उत्पत्तीची काही खास कारणे असतात तशीच त्याच्या नाहीसे होण्यामागेही असावीत. तेंव्हा जाणकारांनी शब्द वापरातून का नाहीसे होतात? खरच काही खास कारणे असतात का? शब्दाचे संदर्भ संपतात का? यावर प्रकाश टाकावा. तसेच अशा विस्मृतीत गेलेल्या किंवा विस्मृतीत जाऊ शकनाऱ्या इतर अनेक शब्दांची उदाहरणे दिली तर उत्तमच.
मित्रहो
https://mitraho.wordpress.com
💬 प्रतिसाद
(68)
ध
धनावडे
Mon, 01/11/2016 - 16:05
नवीन
आमच्या गावाकडे गोठ्याला वाडा अस म्हणतात
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 01/11/2016 - 07:34
नवीन
"अंमळ " हा असाच एक शब्द तो हल्ली कोणाला माहितही नसतो. छापील भाषेतूनही तो हद्दपार झालाय
"व" हा "आणि" या अर्थाने वापरला जाणारा शब्द फक्त लिखित स्वरुपात येतो. तो बोली भाषेतून कधीच गायब झालाय.
हिंडालियम हा पूर्वी बोहारणी अॅल्यूमिनियम च्या भांड्यांसाठी वापरायच्या हिंद अॅल्यूमिनियम चा अपभ्रंष हिंडालियम आहे हे समजल्यावर गम्मत वाटली.
बोहारीण हा देखील शब्द आता ऐकू येत नाही. कल्हई , झीलई हे शब्द ऐकून बरीच वर्षे झाली.
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Mon, 01/11/2016 - 10:38
नवीन
एका भाषा प्रेमी ने अंमळ शब्द पुनरुज्ज्वीत केला आणि तो आंतरजालावर रूढ झाला असे नमूद करू इच्छीतो.
अंमळ ह्या शब्दाचा पहिला जागतीक आंतरजीलीय वापर "तो अंमळ येडXX आहे" ह्या वाक्प्रचारात आला. नंतर लोकं अंमळ हळवा झालो, अंमळ जाऊन आलो, इत्यादि अनेक प्रकारे वापरू लागली. संध्या अंमळ पूर्वीपेक्षा अंमळ जास्त वापरात आला आहे.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Mon, 01/11/2016 - 16:51
नवीन
हिंडालियम हे एका मिश्र धातूचे नाव आहे (अॅलॉय). हिन्दुस्तान अल्युमिनम ह्या कंपनीने ते बनवले आहे म्हणून त्याचे नाव तसे आहे. तो अपभ्रंश नाही.
- Log in or register to post comments
भ
भिंगरी
Tue, 01/12/2016 - 10:18
नवीन
हिंडालियम हा पूर्वी बोहारणी अॅल्यूमिनियम च्या भांड्यांसाठी वापरायच्या हिंद अॅल्यूमिनियम चा अपभ्रंष हिंडालियम आहे हे समजल्यावर गम्मत वाटली.
हिंडालियमचा हा उगम माहित नव्हता. मला तर तो मूळ शब्दच वाटत होता.
- Log in or register to post comments
अ
अनिता ठाकूर
Mon, 01/11/2016 - 09:35
नवीन
असे शब्द विस्मृतीत जाऊ नयेत म्हणून त्यांचा व्यवहारात आवर्जून वापर करायला हवा. असे आणखी काही शब्द म्हणजे जाजम, निथळणे, (कपड्याचा) पोत, स्वयंपाक, खल-बत्ता, (पदार्थ किंवा डोळे) निवणे, (नाकीडोळी) नीटस इत्यादि.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 01/11/2016 - 12:29
नवीन
विषय आवडला. असे अनेक शब्द आहेत जे आम्ही लहानपनी वाचले-ऐकले असतील म्हणुन अर्थ माहिती तरी आहे. वापरात तर अनेक शब्द आताशा नसतातच. मी कधी कधी संपुर्ण वाक्य एकाच भाषेत बोलायचं असं ठरवुन बोलायचे प्रयत्न करते तेव्हा "वास्तविक पहाता" , "स्वाभाविकपणे" किंवा "त्या अनुषंगाने" असे शब्द आले की अनेकांना ते समजतही नाहीत. Obviously कळतं पण स्वाभाविकपणे नाही. हळुहळू हे ही शब्द गायब होतील असं वाटतं.
माझ्यापुरतं मी तरी १००% मराठी बोलणे / लिहीणे, इंग्रजी शब्दांचा वापर टाळणे इ. करुन नवनवे शब्द वापरात येतील असे पहाते. माझ्या मुलाला रोज रात्री मराठीतुन गोष्ट सांगतानाही हे केल्याने त्याचे मराठी चांगलेच सुधारले आहे. टपटप पावसाचे थेंब पडले.. किंवा मग एक आक्राळविक्राळ राक्षस आला वगैरे शब्दप्रयोग केले की मुलांना आपोआप नव शब्दही समजतो आणि त्याचा अर्थही..
वापरत राहिलो तर शब्द गायब होणार नाहीत.. वापरायला हवेतच..त्याने आपल्या भाषेला एक वेगळाच बाज येतो..
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 01/11/2016 - 15:17
नवीन
माझ्यापुरतं मी तरी १००% मराठी बोलणे / लिहीणे, इंग्रजी शब्दांचा वापर टाळणे इ. करुन नवनवे शब्द वापरात येतील असे पहाते.
पिलीयन रायडर
पिलीयन रायडर
मला तुमचा १०० % मराठी चा १००० % प्राउड वाटते.
तुमच्यामुळेच पिलीयन रायडर मधला पिलीयन हा सुंदर मराठी शब्द टीकुन राहीला
नाहीतर काही इंग्राजळलेले कवी
गोरृया मुलीसाठी आला काळा घोडेस्वार असल काय काय लिहीतात बघा
तुमच्या हाती मराठीची हॉर्सदौड अशीच होवो
लाइटलीच घ्याल हे डिफ्रंटली सांगणे नलगे
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 01/11/2016 - 15:18
नवीन
माझ्यापुरतं मी तरी १००% मराठी बोलणे / लिहीणे, इंग्रजी शब्दांचा वापर टाळणे इ. करुन नवनवे शब्द वापरात येतील असे पहाते.
पिलीयन रायडर
पिलीयन रायडर
मला तुमचा १०० % मराठी चा १००० % प्राउड वाटते.
तुमच्यामुळेच पिलीयन रायडर मधला पिलीयन हा सुंदर मराठी शब्द टीकुन राहीला
नाहीतर काही इंग्राजळलेले कवी
गोरृया मुलीसाठी आला काळा घोडेस्वार असल काय काय लिहीतात बघा
तुमच्या हाती मराठीची हॉर्सदौड अशीच होवो
लाइटलीच घ्याल हे डिफ्रंटली सांगणे नलगे
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 01/12/2016 - 06:50
नवीन
मारवा आजोबा...
शक्यतो "लाईटली" सुद्धा माझ्या प्रतिसादांवर उपप्रतिसाद नाही दिलेत तर बरं होईल.
मला फार वेळ "लाईटली" घेता येत नाही.
बाकी माझे सदस्यनाव "पिलीयन रायडर" का हे तुम्हाला सांगण्या इतपत आपली ओळख नाही.
हे सगळं तुम्ही "सिरीयसली"च घ्या.. हे डिफ्रंटली सांगणे नलगे!
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 01/12/2016 - 10:06
नवीन
सदस्यनाव की सदस्यनाम..?
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 01/12/2016 - 10:16
नवीन
कुणाला कशाचं आणि मोदकाला सुद्धलेखनाचं !
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 01/12/2016 - 10:22
नवीन
इथे सदस्यनाम हा शब्द वापरतात पण सदस्य"नाव" सुद्धा बरोबरच आहे कि ओ मोदकराव.. सदस्याचे नाव = सदस्यनाव..!
हाकानाका!!
- Log in or register to post comments
अ
असंका
Mon, 01/11/2016 - 12:48
नवीन
जुने जाउ द्या मरणालागुनी....
- Log in or register to post comments
द
दिवाकर कुलकर्णी
Mon, 01/11/2016 - 19:32
नवीन
सर्वच प्रतिक्रिया सुंदर आहेत़
प्रतिक्रियातून आलेले ९९.९९ प्रतिशत (पूर्वीचे शब्द टक्के,शेकडा) शब्द मला गेलेले आहेत.
शेर , सव्वा शेराचा एकानी उल्लेख केला आहे, त्याबद्दल थोडेसे.
शेर वजनी ,मापी दोन्ही असायचे .
मापी मापे - परिमाणे अशी असायची,निळवं,कोळंव,शेर,अडिसरी,पायली,मण,खंडी
मोठ्या आकारा(व्हॉल्युम)च्या मोजमापासाठी अडिसरी चे माप वापरले जायचे.
साधारण ८ते ९इंच व्यास व सव्वा फूट लांबीचे दंडगोला च्या आकाराचे ते असे.
व्यापारी धान्य मोजताना सुरवात एक अशी न करता लाभ, २,३ ४ अशी करायचे .
आमच्याकडे (मी अपवाद नाही) वस्तु दुकानदाराकडे मागताना ( उदा. चुरमुरे, दूध, चहा पूड, साखर)
आजहि शेर ,अर्धा शेर मागीतली जाते.दुकानदार किलो, लिटर ओळखतो.
पुर्वी शेतकर्यांच्या तोंडी असणारे आदितवार(आदित्य वार-रविवार),बेस्तरवार(ब्रुहस्पती वार -गुरुवार) शब्द
आता लुप्त झाले आहेत.
मांडे हा शब्द लुप्त झालेला नाही. बेळगांवी मांडे खूप प्रसिद्ध आहेत.
एकूण फारच चांगला विषय ,धागा चर्चिला जात आहे.
- Log in or register to post comments
स
सर्वसामान्य
Tue, 01/12/2016 - 03:38
नवीन
न्याहरी हा शब्द पण कोणी फारसा वापरत नाही हल्ली. सगळीकडे ब्रेकफास्ट नाहीतर नाश्टा वापरताना दिसतात...
- Log in or register to post comments
म
मित्रहो
Tue, 01/12/2016 - 06:02
नवीन
हल्ली घराच्या संकल्पना या बेडरुमभोवतीच फिरतात, एक बेडरुम, दोन बेडरुम असे त्यामुळे तळघर, माजघर, छपरी, पडवी, अडगळीची खोली, माडी या संकल्पना आणि ते शब्द व्यवाहारातून बाद होताहेत. न्हाणीघर, स्वयंपाक घर याची जागा इंग्रजी शब्दांनी घेतलीय. तसेच जोते गेले आणि पिल्लर आले त्यामुळे जोता हा शब्द ही वापरातून कमी झााला. ओटा, आटाळ, फडताळ हेही शब्द गेले. आधीच्या कौलारु घरांच्या छपरांना आधार द्यायला मयाली होत्या. आज कवेलु, मयाली, फरशी या साऱ्यांचा वापर शहरातून जवळजवळ बंदच झाला. गावात पण फारसा नाही. त्याचबरोबर हे शब्दही संपले. मराठी कौलांच्या घरांचा फार मोठा त्रास म्हणजे घर गळने, उन्हाळ्यात ते कवेलु ओळीने लावायचा कार्यक्रम असायचा त्याला 'घर फेरणे' असे म्हणत होतो.
गावात गाय, गोऱ्हा, कालवड, खट्या (बिनकामाचा बैल), गोठा, दावे, कासरे हे शब्द आजही वापरात आहेत. काही पद्धती बदलल्या. मळणी, उफणणी हे तसेही पुस्तकी शब्द होते. व्यवहारात त्याला फार सोपे शब्द होते धान्य उडवणे वगेरे. आज या पद्धति संपल्या हे शब्द ही संपले. त्यामुळे 'मुसक्या' बांधने म्हणजे नक्की काय हे पुढच्या पिढीला कळनार नाही. आज हळूहळू वखर, नांगर हेही हद्दपार होताहेत तेंव्हा हे शब्दही हद्दपार होतील. पेरण्याच्या पद्धती बदल्यामुळे काळ्या मातीत 'तिफन' चालते वगेरे म्हणायची गरज उरलेली नाही. सबकुछ ट्रॅक्टर.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 01/12/2016 - 07:34
नवीन
गावकूस, पेव, बळद, परडे, मधघर, चिमणी (रॉकेलवर लागणारा पत्र्याचा दिवा), पसा, पायली, चिपटे, मापटे, खिट्टी हेही शब्द कुठे भेटेनात अलिकडे.
आजोळच्या घराला एक परडे, आणि एक अंधारे मधघर होते. चिपटे भरून पीठ मापून दिले जाई. जात्याला 'खिट्टी' असे.
तसेच तिपेडी, पाचपेडी वेण्या, खोपा, अंबाडा हेही लुप्त झालेत.
असो.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2