Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पश्मीना

प — पालीचा खंडोबा १, Sat, 01/09/2016 - 12:20
नदीवाकल्या पाउसचिंब झाडाला वा-याने ढुशी द्यावी अन सारे तुषार पाण्यावर झंकारून तरंग उमटावे तसं काहीसं आठवणींच असतं, कुणीतरी समोरून जातं मग सारी आठवणींची वर्तुळं आयुष्य व्यापून टाकतात. सतत स्वप्नात दिसणारं कुणीतरी समोर दिसतं अवचित तसं ते तिथच असतं मग जाणवतं अरे हे तर तेच ! मग पानगळाल्या हिवाळ्यातल्या झाडावर साठलेल्या दवांसारखं उन्हात चमचमून सारं प्रकाशोत्सवासारखं होतं. अंग झोब-या गार वा-यात कुणीतरी समोर येतं, पश्मीना शालीसारखं मग काश्मीर झाली भावना विस्तवदुरडी होवून सारं जगणं उबदार बनवते, जेव्हा ते अकस्मात निघून जातं तेव्हा पश्मीना शालीसाठी मारली जाणारी हरणं आठवतात तडफडणारी. उन्हाळ्यात सुकवल्या तेंदूची गोठल्या हिवाळ्यात बिडी करावी, तसा तो सहवास सारा सुगंधीत तंबाखूचा धूर छाती भरून घेते, थरथरणारं शरीर गच्चगोठलं धुरांड होवून फक्त बघत राहतं. कधीतरी महाबळेश्वरच्या हिमपावसात भिजल्यावर ग्रेपवाईन मध्ये घेतलेला तो आश्वासक पेग अन मग सा-या थंडीचा केलेला विस्तव, समुद्रकाठावरच्या विषम शहरातसुध्दा चटके देत राहतो. चटक्यानंतर टम्म फुगलेल्या फोडातून लालसर पाणी वाहतं मग जाणवतं संपलेला तो सहवास, मस्तकात उरलेली ती थंडीची नशा, बारच्या वातानुकुलीतात फक्त भास होतात थंडपणाचे ! उष्णता तिथेच राहिली आहे ह्याचे प्रत्यंतर सतत येत रहाते कारण आता तू फोनसुध्दा उचलत नाहीस ! विजयकुमार......... ०८ . ०२. २०१०, मुंबई

प्रतिक्रिया द्या
2424 वाचन

💬 प्रतिसाद (11)
न
नितिन नितिन Sun, 01/10/2016 - 13:48 नवीन
खूप दुरावा जानव्तो . विजय कुमार अप्र्तिम कविता
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/10/2016 - 14:09 नवीन
शेवटच्या ओळी खासच आहेत. जी लोक सालं लै जीव तोडुन प्रेम करतात त्यांच्या वाटेला असा त्रास नक्की. काही लोकांची प्रेमाची ओढ आटली की ते प्रॅक्टीकल होतात आणि काही लोक पहिल्या क्षणाचीच भावना घेऊन तितकच प्रेम करत शेवटपर्यंत भावनिक होऊन जगतात. प्रेम भावना कठीणच असते, आम्हाला बोलायला काय लागतं. मिला था एक दिल जो दे दिया तुमको हजारो भी होते, तो तेरे लिये होते... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sun, 01/10/2016 - 14:41 नवीन
तडफड खोलवर उतरली आहे! (अवांतरः विस्तवदुरडी म्हणजे 'कांगडी' का? सुरेख शब्द आहे.)
  • Log in or register to post comments
स
साती Sun, 01/10/2016 - 14:53 नवीन
कविता आवडली. विस्तवदुरडी, समुद्राकाठचं विषम शहर, गच्चगोठलं धुरांड हे सारे शब्द आणि त्यांची प्रयोजने अगदी युनिक आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 01/11/2016 - 01:18 नवीन
+++१११ हेच म्हणतो! केवळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
प
पालीचा खंडोबा १ Sun, 01/10/2016 - 15:11 नवीन
बहु गुनि जि बरोबर कांगडीच
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 01/13/2016 - 15:20 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 01/13/2016 - 17:13 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 01/13/2016 - 18:00 नवीन
____/\____ Sandy
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 01/13/2016 - 20:08 नवीन
एक नंबर कविता! पह्यलं आणि शेवटचं कडवं खूप आवडलं.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 01/14/2016 - 06:33 नवीन
फारच सुंदर.. लिहीत रहा...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा