Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गजाननाचे वंदन गाऊ

स — सुमेध रानडे, Sat, 01/09/2016 - 16:50
**************************** मिसळपाव वर माझी ही पहिली कविता. म्हणूनंच, सुरुवात गणरायाच्या स्तवनाने. गजाननाचे वंदन, गजाननाला अर्पण! **************************** गजाननाचे वंदन गाऊ| रोज आधी हो त्यालाच पाहू|| हाच देवसे कला-बुद्धीचा, हाच कांत प्रिय रिध्दी-सिद्धीचा, आशीष हा साफल्य, वृद्धीचा, कृपा निरंतर मागत राहू| गजाननाचे वंदन गाऊ||१|| दुर्वांकुर नीरज जासवंद, केवड्याचा ये मंद सुगंध, मोदकाचा ही पुरवू छंद, शुभ्र कपाळी चंदन लाऊ| गजाननाचे वंदन गाऊ||२|| कार्याच्या शुभ आरंभाला, मिळून आळवू गणरायाला, विसरु नित संकट विघ्नाला, फूल भक्तीचे चरणी वाहू| गजाननाचे वंदन गाऊ||३||

प्रतिक्रिया द्या
2310 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/09/2016 - 17:09 नवीन
छान. गणेश पुजन झालं. आता चांगलं लिहा ब्वा काही तरी. तेच तेच मिपाकरांचे लेखन वाचुन कंटाळा आला. आता तुम्हीच काही तरी भारी लिहा. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 01/09/2016 - 17:52 नवीन
छान आहे कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा