Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मराठीमधील आणि मिपावरील सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या

म — माहितगार, Mon, 01/11/2016 - 10:23
मराठी मधील सर्वोत्कृष्ट पुस्तकांची निवड करण्याचे प्रयत्न मागच्या काळात म.टा. आकाशवाणी, आंतर्नाद मासिक अशा माध्य्मातून केले गेल्याचे पाहण्यात होते तसे मराठीतील (अतीदीर्घ काव्ये सोडून) कवितांची अशी या पुर्वी कुणी निवड केली असल्यास माहिती वाचण्यास नक्कीच आवडेल. अर्थात या धागा लेखाचा मुख्य विषय मराठीमधील आणि/अथवा मिपावरील तुम्हाला आवडलेल्या सर्वोत्कृष्ट कविता कोणत्या ? सर्वोत्कृष्ट १००/५०/१०/५/१ साठी तुम्ही कोणत्या कविता निवडाल ? आपण निवडलेली कविता आपल्याला उत्कृष्ट का वाटते ? (कृपया शक्यतोवर स्वतःच्या कवितेची स्वतः नोंद करु नये हे.वे.सां.न.ल. :)) धागा लेखाचा एक अंतःस्थ हेतु हा की काही चांगल्या कविता आपल्या वाचनातून सुटल्या असू शकतात त्यांच्याशी परिचय व्हावा. या विषयात एक सर्वासामान्य वाचक म्हणून रुची असली तरीही मी 'जाणकार' या विषयास पात्र नाही त्यामुळे नोंदवलेल्या कवितातून अधिक सामायिक स्वरुपाची निवड मी स्वतः पात्र ठरत नसल्यामुळे करणार नाही, इतर काव्य रसिक/ जाणकार नोंदवल्या गेलेल्या कवितातून सर्वोत्कृष्ट कविता निवड करू इच्छित असल्यास आनंद होईल. कवितांचे दुवे आणि संदर्भ नमुद करावेत संपूर्ण कविता या कॉपीराइटेड असू शकतात. (ज्या कविंचा मृत्यू इ.स. १९५५ पुर्वी झाला आहे त्यांच्या कविता प्रताधिकार मुक्त असू शकतात तरीही कविचे नाव नमुद करणे अभिप्रेत असते) कवितेचे एखादे कडवे का आवडले ते सांगणे, रसग्रहण अथवा अगदी टिकाही कॉपीराइट कायद्यातून सुटका होण्याचे राजमार्ग असू शकतात, म्हणून नुसते कडवे कॉपी पेस्ट करण्या पेक्षा ते का आवडले हे सोबत लिहिणे प्रशस्त. लिहिण्यासाठी वेळ नसल्यास कविता-कवीचे नाव काव्य संग्रह अथवा ऑनलाईन दुवा एवढे जरी नमुद केले तरीही पुरेसे आहे. असा धागा मिपावर या पुर्वी झाला असल्यास त्याचाही दुवा द्यावा. सहभागासाठी आभार.

प्रतिक्रिया द्या
14920 वाचन

💬 प्रतिसाद (57)
म
मुक्त विहारि Wed, 01/13/2016 - 10:21 नवीन
१. वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा उडत चालले टणाटणा २. गणपत वाणी बिडी पितांना चावायचा नुसती काडी ३. देणार्‍याने घेत जावे, घेणार्‍याने घेत जावे. ४. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडूनी ५. येशील, येशील, येशील राणी पहाटे पहाटे येशील ६. किर्र रात्री सुन्न रात्री झर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंती, दार त्याचे हस्तिदंती. ७. ने मजसी ने परत मातृभूमीला ८. जयो स्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे | स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे ९. दिवस सुगीचे सुरु जाहले ... ओला चारा बैल माजले १०. श्रावण मासी हर्ष मानसी
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/13/2016 - 11:18 नवीन
(कृपया शक्यतोवर स्वतःच्या कवितेची स्वतः नोंद करु नये हे.वे.सां.न.ल. :)) ही (कंसातली) अट नस्ती तर माझीच्च्च कविता ब्येष्टेष्ट होती. पण आता जौंदे :)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Wed, 01/13/2016 - 11:27 नवीन
आपलंही तेच म्हणणं आहे, पण आता काय, नियम म्हणजे नियम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अजया Wed, 01/13/2016 - 11:53 नवीन
अरेरे:( आपल्याकडे डु आय डी नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/13/2016 - 18:28 नवीन
नै ना ! और हम पीएसपीओ भी नही जान्ते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
माहितगार Wed, 01/13/2016 - 19:27 नवीन
मंडळी विकिसंदर्भाने कॉपीराइट बद्दल लेखनात दोनचार दिवस इतरत्र व्यस्त असल्याने माझ्या प्रतिसादांना विलंब होईल. परंतु चर्चा चालू राहू द्यात, आपणा सर्वांच्या चर्चा सहभागासाठी आभारी आहे.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 01/13/2016 - 20:05 नवीन
आमच्या मिकाची ती खोली आणि बहुतेक सगळ्याच. अरूण म्हात्रेंची ते दिवस आता कुठे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा