फ़ॆंटसी
माझी तुझ्यासोबतची फ़ॆंटसी
एकदम साधी आहे…..
एक पावसाळी दिवस….
एक भिजलेला रस्ता….
एक एकली छत्री…….
त्यात मला बिलगलेली तु
अन तुझ्यासोबत शहारणारा मी………
एक गुलाबी थंडी….
एक धुक्याची चादर….
एक उबदार मिठी….
त्यात मला गवसलेली तु
अन तुझ्यामध्ये हरवलेला मी………
एक उतरणारी संध्याकाळ
एक हवाहवासा एकांत
एक बोलका स्पर्श
त्यात मला उमगलेली तु
अन तुला कळलेला मी…..
एक चमचमणारी आरास
एक मधहोशलेली रातराणी
एक मिलनोस्तुक रात्र
त्यात माझ्यासाठी सजलेली तु
अन फ़क्त तुझ्यासाठी आसुलेला मी……
असचं काहीसं……….
आवडली तर सांग...
नाही आवडली तरी सांग……...
💬 प्रतिसाद
(3)
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 01/14/2016 - 15:05
नवीन
सर्व १३३ वाचकांचे आभार......
:-)
पुढल्या वेळेस काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करीन
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 02/04/2016 - 06:43
नवीन
अप्रतिम अमोल...
अगदी उत्तम....
सुंदर सूचक मादक भावनांनी विणलेली...
अप्रतिम शृंगाररसाने सजलेली असून दुर्लक्षित का राहिली हे कळत नाही...
कदाचित नेहमीप्रमाणे काथ्याकुटी धुरळा चालू असेल...
असो आज परत मेन बोर्डावर आणतो...
- Log in or register to post comments
प
पद्मावति
गुरुवार, 02/04/2016 - 07:41
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments