Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोमांस

प — पालीचा खंडोबा १, Tue, 01/12/2016 - 07:16
सगळं सगळं ओरबडुन घेऊन रात्र कणाकणाने वाढते जोश, उर्मी......नष्ट करून ! चूरगळलेले भडक ओठ आक्रसलेला पावडरच्या पुटांचा चेहरा... ओळख नसलेला...निनावी.... परतीच्या वाटेला लागतो परतण्यासाठी मेलेल्या शरीराला वेसण घालून मन ओढत नेते जगण्याच्या शर्यतीतील भाग म्हणून ! गुरकावलेल्या अंडील पाड्यानी कुस्करलेले शरीर प्रेताप्रमाणे चालायला लागते...... लाल दिवेही शरमेने काळे पडतात आधीच काळी असलेली निर्लज्ज रात्र भेसूर हसते रोजची मरणे बघून..... कळापातून सुटलेल्या गाया कसाईखान्यातून बाहेर पडतात जिथे त्यांची रोज कत्तल होते......... सगळेच बाटगे गोमास भक्षण करतात आणि सकाळी धर्म पाळतात..... गाया मात्र रात्री परत वळतात कसाईखान्याकडे रोजच्या कत्तलीसाठी ! विजयकुमार कणसे........ १७.०७.२००८

प्रतिक्रिया द्या
1450 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मोगा Tue, 01/12/2016 - 13:43 नवीन
वा ! आपल्यासमोर हिंदु धर्माने नाचवलेल्या एखाद्या मुरळीची ही व्यथा का रे खंडूराया ? बरे झालेस तू तुझे डोळे उघडलेस ते.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 01/12/2016 - 14:44 नवीन
Asha goshtinaa dharm asato?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
ग
गामा पैलवान Tue, 01/12/2016 - 14:58 नवीन
मोगाश्री, ही तर कराचीतल्या लालबत्ती एरियाची व्यथा आहे! तसंही पाहता गोमांस हे भारतातील मिष्टान्न नसून पाकिस्तानातील पक्वान्न आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
म
मयुरMK Wed, 01/13/2016 - 08:23 नवीन

नवलेखकांना प्रोत्साहन

भाते - Tue, 12/01/2016 - 10:11 नवीन

कालच्या मटामध्ये हि बातमी वाचली.
त्यात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नवलेखक प्रोत्साहनार्थ योजनेची माहिती दिली आहे. सविस्तर माहिती इथे मिळेल.
इच्छुकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

  • प्रतिसाद द्या
तुम्ही हि लाभ घ्या विजू भाऊ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा