Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आता घे आवरते सारे

प — पालीचा खंडोबा १, Wed, 01/13/2016 - 12:31
उघड्या घराचे कोंदट श्वास आता जाहलेत मोकळे लख्ख डोळ्यानी, निरख वाटा दिशा दाखवतील वादळवारे आता घे आवरते सारे || प्रत्येक जगण्याने साथ सोडली गवाक्षी उरलेत पक्ष्यांचे थवे किती डोळ्यांच्या वाटा करशील का वाहतोस आठवांचे भारे आता घे आवरते सारे || जनापवाद कुणा न टळला का बंद करतोस कवाडे ? मान मनाचे सामर्थ्य तुझीया अंधारातच तेवतात तारे आता घे आवरते सारे || वाहत्या आसवांनी कुणी का परतते ? सोडूनी वर्तमानास भविष्य येते कुरवाळुनी अवमानीत भुतकाळाला कुणी असे जगतात का रे ? आता घे आवरते सारे || बघ जगी , दुख राहीले भरून सुख मिळते का कधी मरुन ? परवेदनेस मानूनी आपले डोळे पुसण्यासाठी जग रे आता घे आवरते सारे || जगभरूनी वाहतात आसवे कुणी वाहते का त्यासवे ? पिऊनी सा-या यातनासागराला एकदा तरी अगस्ती बन रे आता घे आवरते सारे || विजयकुमार..................... 14 / 12 / 2008

प्रतिक्रिया द्या
2301 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
पालीचा खंडोबा १ गुरुवार, 01/14/2016 - 16:43 नवीन
आता असे वेगळे लिहिले तर कोणिच वाचत नाहि
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 01/14/2016 - 16:53 नवीन
ओ मालक... तुमची शप्पथ! आधीच वाचलेली. प्रतिसादच द्यायला आलो होतो, तोवर तुमचा प्रतिसाद हजर! कविता उत्तम जमली आहे! वेगळा प्रयत्न करताय याबद्दल अभिनंदन! संध्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
च
चांदणे संदीप गुरुवार, 01/14/2016 - 17:03 नवीन
माझ्या नावाचा नवा अवतार = संध्य = Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
प्राची अश्विनी Fri, 01/15/2016 - 03:04 नवीन
नेहमीप्रमाणेच कविता आवडली. पण तुम्ही असा प्रतिसादांचा जोगवा मागू नका हो, तुमचं लेखन त्याहून खूप वरच्या प्रतीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पालीचा खंडोबा १
च
चांदणे संदीप Fri, 01/15/2016 - 03:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/15/2016 - 05:14 नवीन
कविता वाचनीय असतात. प्रतिसादाची चिंता करू नका. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
प
पैसा गुरुवार, 01/14/2016 - 17:15 नवीन
सकारात्मक आहे खूप.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 01/14/2016 - 18:19 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/15/2016 - 04:02 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Fri, 01/15/2016 - 06:36 नवीन
प्रतिसादाची चिंता नाही हो. तो तर तुम्ही देताच परंतु माझ्या नेहमीच्या शैलीशी फारकत घेवून काही लिहिले तर ते माझ्या मित्र परिवाराने वाचावे हि माफक अपेक्षा
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 01/15/2016 - 06:39 नवीन
कविता आवडलीच.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 01/15/2016 - 06:46 नवीन
रंगीत शब्दांचे खडे बोचले नाहीत त्यामुळे आवडली.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Fri, 01/15/2016 - 06:59 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा