Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संक्रांत

स — सुधीर वैद्य, Fri, 01/15/2016 - 04:57
संक्रांत आणखीन एक वर्ष सरले. थंडी घेऊनच नवीन वर्ष अवतरले. गार हवेची शाल लपेटून माणसाचे मन सुखावले. गार झुळकेने पतंग प्रेमी आनंदले. तीळ - गुळाच्या गोड वासानी पोटच भरले. संक्रांतीचे दागिने घडले. नवीन नवरीला त्याचेच अप्रूप झाले. जावईबुवा हलव्याचा हार आणि नारळ मिळणार म्हणून खुश झाले. फोटो काढले , आधी हलव्याच्या दागिन्यांचे आणि मग मुलगी -जावयाचे. आणखीन एक सण पार पडला म्हणून सासूबाईनी हुश्य म्हटले. संक्रांतीचा सण आला आणि गेला. दरवर्षीच येतो आणि जातो. पतंग उडवले जातात आणि कापले पण जातात. पतंग कधी कागदाचे असतात तर कधी स्वप्नांचे . कधी तरी माणसावर संक्रांत कोसळते. तुमच्या स्वप्नांचा चक्काचूर करते. माणूस परत उभा राहतो नाहीतर पतंगासारखा भरकटतो. पतंग उडवताना पतंगा बरोबर चांगला मांजा, छान हवा - वारा हवा आणि पतंग उडविण्याचे कसब हवे. तसेच स्वप्नांच्या पतंगासाठी चांगले ध्येय, परिश्रम आणि हवेसारखे थोडे नशीब हवे. मग तुमचा पतंग आकाशात अशी भरारी घेईल कि सगळ्यांच्या माना वरच होतील. संक्रांत संपत्तीवर येते , संक्रांत शिक्षणावर येते. संक्रांत सत्तेला ग्रासते , संक्रांत नाव-लौकिकाला वेढते. अशी संक्रांत येऊ नये व पतंग कापला जाऊ नये म्हणून मित्रा, कर्मकांडात अडकू नकोस. उगाच वेळ फुकट घालवू नकोस. स्वधर्म सोडू नकोस. ज्योतिषाच्या मागे लागू नकोस. अंध श्रध्येचा बळी होऊ नकोस. विज्ञानाची कास धर. स्वत:चा उद्धार कर. Sankrant

प्रतिक्रिया द्या
838 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा