Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुंपणापलीकडली हुरहूर

प — पालीचा खंडोबा १, Fri, 01/15/2016 - 06:58
माझ्या अंतर्मनावर ओरखडे ठेवून तू क्षितिजापार गेलीस मावळत्या संध्येसारखी, क्षितीजाचं रसरसलेपण तसचं ओरखड्यात ताजं अन् ती कातरवेळेची हुरहूर मला मावळत असते. मुठ्मातीनंतर मी कितीदा ठरवलं, तुझ्या "त्या" चीरशांतीच्या विश्रामस्थळास भेट देईन का कुणास ठाऊक ? फाटकाच्या आत पाउल कधी पडलचं नाही मात्र गंजलेल फाटक कुरकुरत असताना मी तुझं ते पांढरं आच्छादन न्यहाळत असतो, पुसट होत जाणारं वाढत्या रात्रीबरोबर कमी होत जाणा-या हुरहुरीसारखं . हळूहळू सगळच पांढूरकं होत जात अन् तुला शोधणं मुश्कील होतं तू लहानपणी दडवलेला तो लाकडी रंगीत घोडाही सापडत नाही कुठतरी हरवलायं रंग हरवल्यासारखा. गोठल्या जानेवारीत एकदा म्हणे वासे फिरल्या घरात लाकडे नव्हती बंबात घालायला, आईने ग्रामोफोनसहीत बरीच लाकडे त्यात घातली त्या ज्वाळेच्या रंगात त्या रंगीत घोड्याचे रंगही वितळले असतील, तुझ्याबरोबर बघितलेल्या स्वप्नांसारखे. तू मागे ठेवून गेलेली पातळे एकालाही अंग न लावलेली, न्यहाळत बसायचीस खांद्यावर बाळगून आरश्यासमोर, ते रंग आता आरश्यात उतरलेत अन् भकास आरसा शून्यात बघत असतो. तिन्हीसांजेला हळदीकुंकू वाहताना मी आईच्या डोळ्यात बघू शकत नाही, पाणावल्या डोळ्यांनी ती तुझं मस्तक धुंडाळत असते कधी समोर न येणारं, हवेत हळदीकुंकू झाडून आई कपाळाला लावते, माझे डोळे पाणावतात हळदीकुंकू डोळ्यात गेलयं असा भ्रम निर्माण करून ती शांतपणे हसते. त्या शांत डोळ्यात मी कुंपणापलीकडचं पांढरेपण बघतो अन् फाटकासारखं माझं गंजलं मन करकरू लागतं बेसावध क्षणी तिचा पदर डोळ्याकडे जाताच माझं मन मी उशीत रिकामं करतो अन् सारं घर चैत्रगौरीतल्या सजावटीतल्या चुन्याच्या भिंतीसारखं पांढरफटक पडतं. विजयकुमार......... २५.११.२००९, मुंबई

प्रतिक्रिया द्या
1317 वाचन

💬 प्रतिसाद (5)
र
राघव Fri, 01/15/2016 - 17:07 नवीन
व्यथा चांगली माडलेली आहे. रचना आवडली. धन्यवाद. राघव
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Fri, 01/15/2016 - 17:12 नवीन
आभार राघव
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 01/15/2016 - 17:58 नवीन
:(
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 01/15/2016 - 18:30 नवीन
अशक्य लिहितो हा माणूस!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 01/15/2016 - 18:32 नवीन
:(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा