साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
नमस्कार मंडळी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून म्हणजे दि.१५ जानेवारी २०१६ पासून सुरुवात होत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीपासून माध्यमांना खाद्य मिळायला सुरुवात झालेली असते आणि पुढे जे काही सुरु झालेले असते, होत असते, ते आपण सर्वच वाचत असतो. डॉ. श्रीपाल सबनीस हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आता त्यांच्या निवडीला आव्हान देणे, नाराज साहित्यिकांनी निवडणूक कशी अवैध आहे वगैरेसाठी पोलीसात तक्रार देणे इथपर्यंत आपण सर्वांनी माध्यमातून वाचलं आहे. आता या सर्व गोष्टींच्या पुढे साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज दुपारी ग्रंथदिंडी निघाली होती, त्यास काही जाता आले नाही, नंतर ध्वजवंदन झाले व त्यापाठोपाठ ५ वाजण्याच्या सुमारास ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्याला मात्र वेळेत पोचलो. ग्रंथप्रदर्शन प्रचंड मोठे आहे. जवळपास ४०० स्टॉल्स आहेत.
नंतर एका मंडपात काही ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार मा. सुशिलकुमार शिंदे ह्यांच्या हस्ते झाला. मधु मंगेश कर्णिक, रा. ग. जाधव आदि साहित्यिकांना प्रत्यक्ष बघता आले. तिथे मात्र जास्त न थांबत ग्रंथप्रदर्शन बघण्यास प्राधान्य दिले.
आता उद्यापासून परिसंवाद, निमंत्रितांचे कवीसंमेलन, बहुभाषिक कविसंमेलन, मुलाखती, अभिजात कथावाचन, कथाकथन, असा भरगच्च कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे.
स्वागताध्यक्ष पी डी पाटील ह्यांनी प्रचंड खर्च केल्याचे जाणवते आहे. संमेलनस्थळाचे प्रवेशद्वार, मुख्यमंडप, उपमंडप, ग्रंथदालन, भोजनगृह सारेच काही नेत्रदीपक झाले आहे.
मराठी साहित्यप्रेमीसाठी हा एक मोठा सोहळा असतो. आता अनेकांना अशा सोहळ्याबद्दल आक्षेप असेलही तो आपण सोडून देऊ. मिपाकरांसाठी हा सोहळा तितकाच मोठा असेल असे मला वाटते. अनेक मिपाकर या साहित्य संमेलनाला हजेरी लावतील. अनेक कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. दैनिकातून बर्याच गोष्टी वाचायला मिळतीलच परंतु थेट कार्यक्रमाला उपस्थित राहुन कोणता परिसंवाद चांगला झाला ? कोणाची कविता कशी होती ? मुलाखत कोणाची रंगली ? मराठी साहित्यातील विविध प्रवाहांची चर्चा कशी झडली ? अध्यक्षीय भाषण कसं होतं ? या आणि विविध साहित्यिक गोष्टींची चर्चा या निमित्ताने मिपावर व्हावी, श्रोता म्हणुन आपला अनुभव मिपाकर इथे लिहितील म्हणुन हा काथ्याकूट प्रपंच. तेव्हा उद्यापासून सुरु होणार्या सांस्कृतिक सोहळ्याबद्दल आपण या धाग्यावर लिहित राहू सर्वांना मकर संक्रातीच्या खुप खुप शुभेच्छा.
अ.भा.साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळावर कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे.
सोहळ्याची आज मी घेतलेली काही छायाचित्रे (भ्रमणध्वनीद्वारे घेतलेली असल्याने स्पष्टतेच्या मर्यादा आहेत)
१. संमेलनस्थळाचा प्रमुख मार्ग
२. रसिकजनांची गर्दी
३. ही दोन्ही ग्रंथदालने आहेत.
४. बोधचिन्ह
५. एक प्रतीकृती
६. ज्ञानबा
७. तुकाराम
८. माझी ग्रंथप्रदर्शनातली आजची किरकोळ खरेदी

२. रसिकजनांची गर्दी
३. ही दोन्ही ग्रंथदालने आहेत.
४. बोधचिन्ह
५. एक प्रतीकृती
६. ज्ञानबा
७. तुकाराम
८. माझी ग्रंथप्रदर्शनातली आजची किरकोळ खरेदी

💬 प्रतिसाद
(95)
य
यशोधरा
Fri, 01/15/2016 - 17:34
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 01/15/2016 - 17:38
नवीन
जरा जळजळ होतेय वाचून.फार इच्छा होती एकदा तरी साहित्य संमेलन अनुभवावे .
पुस्तक प्रदर्शन कसे वाटले?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 01/15/2016 - 17:44
नवीन
खूपच छान आणि खूपच भव्य आहे.
कॉन्टिनेन्टल, मॅजेस्टिक, मेहता अशाविविध प्रकाशन संस्था, अक्षरधारा, साहित्यदर्शन, ज्ञानगंगा अशा प्रदर्शन संस्था, बुकगंगा, डेलीहंट असे ऑनलआईन पुस्तक विक्रेते, मराठवाडा, विदर्भ आदी साहित्य परिषदा, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ, नॅशनल बुक ट्रस्ट, महानुभव साहित्य मंडळ अशा संस्था आणि त्यांची दुर्मिळ पुस्तके अशा विविध संस्थांच्या दालनांनी सजलेले पुस्तकांचे सुमारे ४०० स्टॉल्स आहेत. एकाच फेरीत पाहए शक्य होणार नाही इतके प्रचंड आहे.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Fri, 01/15/2016 - 17:49
नवीन
अरे वा.. मी ९वीत की १० वीत असताना गेले होते साहित्य संमेलनाला. पुस्तक प्रदर्शन तेंव्हा ही भव्य च होतं. त्यानंतर आताच छायाचित्रं बघायला मिळतायेत. खरंच बराच खर्च केल्याचं जाणवतंय. छान समयोचित धागा, आता ३ दिवस निदान तुम्हा सर्वांतर्फे तरी हजेरी लावता येईल.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 01/15/2016 - 17:39
नवीन
आजकाल, साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणूकी मुळे गाजायला लागल्यामुळे, इथे जाणे नकोसे वाटते.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 01/15/2016 - 17:42
नवीन
कार्यक्रमांपेक्षा पुस्तक प्रदर्शनात जास्त इंटरेस्ट असतो. कितीही वेळ घालवता येईल तिथे!
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Fri, 01/15/2016 - 17:44
नवीन
मस्तं वृत्तांत.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Fri, 01/15/2016 - 17:48
नवीन
वाह , मस्त
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Fri, 01/15/2016 - 17:51
नवीन
मी १७ तारखेला कविकट्टा कार्यक्रमात इथे मिपावरच प्रकाशित केलेली "अंबाडा" ही कविता सादर करणार आहे.
सम्मेलनपूर्व सम्मेलनातही माझा सहभाग होता!
मिपाकरांपैकी कोणी तिथे असल्यास कळवा. भेटूयात.
@प्रचेतस: तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता आहे. शक्य असल्यास गरीबाला दर्शन द्या तिथे रविवारी!
धन्यवाद,
Sandy
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 01/15/2016 - 17:56
नवीन
ग्रेट.
रविवारी भेटूच. माझा भ्रमणध्वनी क्रमांक व्यनि करतोय.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/15/2016 - 18:01
नवीन
खुल्या कवी संमेलनात आहात की निमंत्रितांच्या ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sun, 01/17/2016 - 18:36
नवीन
तुम्ही सम्मेलनात सादर केलेली कविता इथे पण लिहाल का?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 01/18/2016 - 12:29
नवीन
अंबाडा
बहुधा हीच कविता
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 01/18/2016 - 12:41
नवीन
सही पकडे है!
Sandy
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/15/2016 - 17:59
नवीन
वल्ली सॉरी प्रेचेतस मस्त धागा. छायाचित्रही मस्तच. साहित्य संमेलन एक उत्सव असतो. गावाकडे जशा जत्रा भरतात त्या प्रमाणे मला हा उत्सव वाटतो. मला साहित्य संमेलनातल्या गोष्टी आवडतात त्या म्हणजे उद्घाटन आणि मान्यवरांची भाषणं. कवी संमेलन, त्या नंतर पुस्तक प्रदर्शन. खुप दुर्मीळ पुस्तकं घेता येतात. लेखकांच्या भेटी होतात त्यांना जवळुन पाहता येतं. पुणे विद्येचं माहेरघर तेव्हा येथील अनुभव वेगळा ठरावा असे वाटते. जवळपास पाचशे पानांचं अध्यक्षीय भाषण आणि गेल्या पन्नास वर्षात असं अध्यक्षीय भाषण झालं नसेल अशा बातम्यांनी माझी उत्सुकता वाढली आहे.
प्रचेतस मोठेपणा तुम्हाला नै सांगायचा तर कोणाला सांगायचा. साहित्य संमेलन अध्यक्ष निवड होते ना त्याचा मी मतदार आहे. आमच्या मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद या घटक संस्थेच्या कार्यकारणीचा मी सदस्य आणि मतदार आहे. डॉ. श्रीपाल सबनीसांनी मला फोनही केलेला आणि आम्ही बोललोही आहे. आता ते प्रत्यक्ष भेटीत ओळख देतील की माहिती नाही. पण साहित्य संमेलनाचा आपण एक घटक असतो तो आनंद वेगळा असतो. साहित्य संमेलनात मी हजेरी लावत असतो. पुण्यात मी जर हजेरी लावली तर काही मतं इथे धाग्यात लिहिनच. धन्स.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 01/15/2016 - 18:07
नवीन
काय सांगताय सर, जबरीच. संमेलनाध्यक्ष निवडणूकीतलं राजकारण तुम्ही जवळून पाहिलेलं असणार. ह्यावरही लिहा.
अगदी मोजक्या हजार बाराशे मतदारांपैकी तुम्ही एक आहात हे पाहून खरंच छान वाटलं.
बाकी सबनीसांचं लिखित भाषण ५०० नव्हे तर जवळपास पावणेदोनशे पानांचे आहे. ते फ़क्त छापील आवृत्तीतच मिळेल. उद्या उद्घाटन समारंभातील त्यांचे भाषण हे लिखित नसून ते वेगळे उत्स्फूर्त भाषण करणार आहेत असे समजते.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/15/2016 - 18:17
नवीन
>>> संमेलनाध्यक्ष निवडणूकीतलं राजकारण तुम्ही जवळून पाहिलेलं असणार. ह्यावरही लिहा.
नाय नाय. आत्ता आपण काय बोलायचं नाय. बघायचं, शिकायचं. आणि समजून घ्यायचं. मी नाय लिहिणार काही.
बाकी, डॉ. सबनीस तसे हुशार आहेत. साहित्यातील विविध प्रवाह, लेखकांकडून काही अपेक्षा, समाज आणि साहित्य यावर काय लिहितात त्यावर आपण इथे चर्चा करुच. बाकी, कालच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची त्यांच्या छापील भाषणाची तयारी चालु आहे असं वाचलं होतं. बाकी, ते उत्स्फुर्त भाषण करणार म्हणजे दैनिकांना काही तरी नवं खाद्य सनसनाटी बातमी पुरवणार यात काही शंकाच नाही. बाकी, धाग्यावर लिहित राहुच.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Fri, 01/15/2016 - 18:12
नवीन
वाह !! तुमचे मतदान पद्धती बद्दल आणि साहित्य संमेलनाच्या पडद्यामागच्या प्रचंड नियोजनाबद्दल अनुभव वाचायला आवडतील.
संदीप चांदणेंचं पण अभिनंदन !
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 01/15/2016 - 18:17
नवीन
+१
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 01/15/2016 - 18:16
नवीन
संदीप भौ अभिनंदन. रेकाॅर्ड करा कविता वाचन आणि इथे टाका जमलं तर.
पुस्तक प्रदर्शनाचे वर्णन वाचून फारच जळजळ वाढली :(
रविवारी चक्कर मारावी तर फार गर्दी असेल :(
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 01/15/2016 - 18:18
नवीन
पुस्तक प्रदर्शन हे एकमेव कारण आहे साहित्य संमेलनाला जायचं. मुंबईत झालेल्या संमेलनातली पुस्तकं अजून वाचतोय.
संदीपभौ, अभिनंदन. कविता जरुर मिपावर टाका!
प्रचेतसभौ, ते दिव्य कुरआन विनोबा भाव्यांचं आहे का?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 01/15/2016 - 18:25
नवीन
भाव्यांचं नाही. मला वाटते भाव्यांनी कुरआनचे भाषांतर केले नसून प्रेषितांवर आणि इस्लामवर काही लिखाण केले होते.
मी घेतलेले कुरआन इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टचे असून सय्यद अब्दुल मौदुदी ह्यांनी भाषांतरीत केलेले आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 01/15/2016 - 18:45
नवीन
हेच आत्ता सर्वोत्तम आहे,मराठी भाषान्तरितात! ग्रेट! उत्तम खरेदी.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 01/15/2016 - 18:41
नवीन
खूप इच्छा असूनही कुठेहि येता येणार नाहीये! :(
पण तरीही इथे बघून समाधान मिळणार आहे, म्हणूनच हा धागा काढल्या बद्दल आगोबा चे आभार!
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 01/16/2016 - 01:49
नवीन
नक्की कुठे आहे?पिंपरी/चिंचवड?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 01/16/2016 - 01:52
नवीन
पिंपरी.
एचए मैदान.
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 01/16/2016 - 08:41
नवीन
गुलजारसाहेबांचे भाषण सुरू आहे. त्यांनी विविध भाषांतील साहित्याच्या देवाणघेवाणीच्या आवश्यकतेवर भर दिलाय.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Sat, 01/16/2016 - 09:48
नवीन
आचार्य अत्रे नाट्यगृहात कथावाचन आहे अडीच वाजता.
- Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे
Sat, 01/16/2016 - 11:19
नवीन
श्रीपाल सबनीस यांच भाषण ऐकलं,छान बोलले ते.
संतांची जातीय विभागणी,उजवे-डावे,प्रतिगामी-पुरोगामी-विद्रोही वगैरे वगैरे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 01/16/2016 - 11:45
नवीन
आज नेमके ऑफिसमध्ये महत्वाचे काम असल्याने दुर्दैवाने अध्यक्षीय भाषण पाहता आले नाही.
आता निघालोच आहे तिथे जायला.
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 01/16/2016 - 11:37
नवीन
श्रीपाल सबनीस यांची साहित्यिक कामगिरी नक्की काय आहे? यापूर्वी कधीच त्यांचे नावही ऐकलेले नाही.
- Log in or register to post comments
म
मारवा
Sat, 01/16/2016 - 11:57
नवीन
संस्कृती समीक्षेची तिसरी भुमिका
फारस आवडल नसल्याने पुर्ण वाचुन संपवु शकलो नाही.
बाकी श्रावण मोडक यांच सबनीस नावाच व्यक्तीचित्रण तुम्ही वाचल असाव.
ते बाकी छान आहे.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sat, 01/16/2016 - 17:56
नवीन
http://www.aisiakshare.com/node/35
- Log in or register to post comments
भ
भीमराव
Sat, 01/16/2016 - 11:43
नवीन
भाषण भारी होते, पहिल्यांदाच साहित्य संमेलन अनुभवतो आहे. थोड्या फार रेकॉर्डींग सुद्धा केल्या आहेत
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sat, 01/16/2016 - 15:06
नवीन
पुणेकरांचा नेहमी हेवा वाटतो तो याचसाठी.
साहित्य आणि साहित्यिक यांच्या मांदियाळीत विहार करतात बेटे.
विशेष वृ मिपाकरांकडून ऐकण्यास उत्सुक
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 01/16/2016 - 15:27
नवीन
प्रचेतस सरांच्या धाग्याने पुस्तक प्रदर्शनाला जाण्यास प्रवृत्त केल्या गेले आहे!
उद्याच जाणार!
- Log in or register to post comments
त
तिमा
Sat, 01/16/2016 - 15:21
नवीन
घरबसल्या ताजा वृत्तांत वाचायला मिळणार, हे वाचून आनंद झाला. मुख्य म्हणजे तो वृत्तांत वर्तमानपत्रीय नसेल, तर अस्सल प्रचेतसी असेल.
- Log in or register to post comments
स
सचिन कुलकर्णी
Sat, 01/16/2016 - 16:02
नवीन
प्रचेतसचे नाव बघितले आणि मोठ्या अपेक्षेने धागा उघडला आणि (अर्थातच) अजिबात निराशा झाली नाही. घरबसल्या संमेलनाचा वृत्तांत मिळणार हे वाचून छान वाटले.
आजचे अध्यक्षीय भाषण दूरदर्शनवरून ऐकले आणि ते चक्क आवडले.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Sat, 01/16/2016 - 16:15
नवीन
साहित्य संमेलनाविषयी अजून वाचायला आवडेल .
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sat, 01/16/2016 - 18:00
नवीन
सकाळी साडेदहाला बायकोला 'डि-मार्ट ला थोडी खरेदी करून येऊया' असे म्हणून संमेलनाच्या ठिकाणी घेऊन गेलो. त्याशिवाय ती आलीच नसती! ;-) मग संमेलनच्या अमाप गर्दी असलेल्या मुख्य दरवाजावर जाऊन पोचलो आणि तिच्या लक्षात आले, पण तोपर्यंत उशीर झालेला! :) जीतम! जीतम! जीतम!
मग प्रचेतस यांनी इथे दिलेले सारे फोटो एक एक करुन प्रत्यक्ष पाहिले. माझा सहभाग असलेला कविकट्टा हा कार्यक्रम नेमका कुठे असणार ते शोधून काढले. तिथे जाऊन जरा चौकशी केली तर समजले की आंगतुकांना(नावनोंदणी न करता आलेले) आज आधी संधी दिलेली आहे, कविता वाचण्याकरिता! मग तिथेच बाहेर आजच्या नियोजीत कवींची आणि त्यांच्या वेळेची एक यादी लावण्यात आली. उद्याची यादी तिथे उद्या लागेल. ज्यात मला किती वाजताची वेळ दिली आहे ते समजेल.
दरम्यान, मुख्य मंडपात श्रीयुत शरदचंद्रजी पवार साहेबांचे उत्स्फूर्त नर्मविनोदी आणि खुसखुशीत(तसे ते बऱ्याचदा असतेच!) असे भाषण सुरू होते. पण मला त्यात रस आणि तिथे बसायला जागा नसल्याने आम्ही जोडीने ग्रंथप्रदर्शन पाहायला गेलो.
पण पहिल्या दुसऱ्याच स्टॉलवरच मी पुस्तकात गुंतून पडतोय असे दिसताच हिने पायांच्या संप आधिक पोटातल्या कावळ्यांची वाढती संख्या अशा कारणांना पुढे करून मला तिथून खाण्याच्या मंडपाकडे नेले.
हा विभागही बऱ्यापैकी विस्तृत आहे! मग तिथे असलेल्या बऱ्याच स्टॉलवाल्यांना हिने नाराज केले नाही आणि आम्ही यथेच्छ खादाडी केली! म्हणजे ते दृश्य असे होते की, जणू एखादी माहेरवाशीण बऱ्याच दिवसांनी सासरहून माहेराला आली आहे आणि गावतल्या प्रत्येक गल्लीतून तिला खुशाली विचारणारी एक हाक येतीये आणि ती त्या प्रत्येक उंबऱ्यावर घटकाभर थांबून गुजगोष्टी करीत घराकडे निघाली आहे!!
या सगळ्यात फ्रूट प्लेट, शेगांवची प्रसिद्ध(च्या नावाखाली!) कचोरी, महाराष्ट्र स्नॅक्स(असं लिहिलेल तिथे) थालीपीठ, खमंग भाजलेला आणि शेव भुरभुरवलेला हुर्डा आणि शेवटी एक ग्लास थंडगार ताक असे सारे जिन्नस पोटात ढकलून आम्ही उभयतांनी तिथून काढता पाय घेतला.
बायकोला घरी सोडून मी पुन्हा 'पडद्यांची' चौकशी करायच्या नावाखाली बाहेर पडलो आणि संमेलनाच्या ठिकाणी बरोबर साडेचारला पोचलो. आता इथे गुलजार यांची मुलाखत होती. पण माझ्या एका मित्राला शोधण्यात ती मुलाखत संपून गेली! :( पण नंतर त्यांच्या दोन-चार रचना अगदी पुढे बसून निवांत ऐकता आल्या! शेवटची त्यांची रचना एका नेत्याच्या जलशात आलेल्या गरीब माणसाची होती जी मी माझ्या मोबल्यावर व्यवस्थित रेकॉर्ड करून घेतली.
मग माझा मित्र आणि मी ग्रंथप्रदर्शनाच्या एका बाजूच्या मंडपात गेलो. बराच वेळ फिरूनही त्या अर्ध्या प्रदर्शनाच्या अर्ध्या भागासही आम्ही पूर्ण करू शकलो नाही! शिवाय, हवी असणारीच पुस्तके महाग असतात याचा पुन्हा प्रत्यय आला आणि आम्ही तिथून आज काहीही न घेता बाहेर पडलो. :(
गुलजार यांना याची डोळा भरून पाहून अन् ऐकून घेतले. भारलेल्या क्षणात होतो मी तेव्हा! शेवटी त्यांना रेंजरोव्हरमधून जाताना पाहिलं आणि मी माझ्या CD100 ला किक मारली.
इतिवृत्तांत!
आता उद्याच्या माझ्या काव्यवाचनाची तयारी करतो. धन्यवाद!
Sandy
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 01/16/2016 - 19:06
नवीन
मस्त वृत्तांत.
बाकी मी तुम्हाला सोलापूरहून येणारे आहात असे समजत होतो. तुम्ही तर चक्क चिंचवडकर निघालात की. उद्या साधारण दोनेक पर्यंत संमेलनस्थळी पोहोचतच आहे.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sat, 01/16/2016 - 19:29
नवीन
सोलापूरवरनं येऊन लय टाईम झालाय. म्हंजी बगा २३-२४ वर्स तरी झाल्येच! ;-)
Sandy
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 01/16/2016 - 19:10
नवीन
मस्त लिहिलाय वृ.
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 01/17/2016 - 05:22
नवीन
किती वाजता आहे तुमचे काव्यवाचन?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/16/2016 - 19:41
नवीन
सुंदर वृतांत ! अजून पुढचे भाग टाका आणि फोटो म्हणजे आम्हाला घरबसल्या त्यांचा आनंद घेता येईल.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 01/17/2016 - 01:38
नवीन
आज गर्दी फार होणार.कुंभमेळ्यासारखी.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 01/17/2016 - 01:42
नवीन
चंदने Sandy वृ मस्त.मी असल्या ठिकाणी शक्यतो एकटाच जातो.तिथे जे आनंदाने, वेळ काढून आले असतील त्यांच्याशी गप्पा करायच्या.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sun, 01/17/2016 - 02:51
नवीन
कंजूसकाका तुमचं बरोबर आहे. आवड आणि जाण असणाऱ्या लोकांसोबतच ठराविक गोष्टी केल्या की त्याचा आनंद आधिकच मिळतो. जसे की, एखादे पुस्तक शेअर करणे, एखादा क्लासिक सिनेमा पाहणे, गडकिल्ले किंवा प्राचीन स्थळांना भेट देणे इ.
हे पुढचे लक्ष्मीकांत बेर्डे स्टाईलने वाचा:
काय सांगू आता
तुम्हाला माझी व्यथा
बायको नावाची बेडी
सदा पाय ओढी
म्हणून तर डि-मार्ट आणि पडद्यांची चौकशी वगैरे क्लृप्त्या योजाव्या लागतात! ;-)
Sandy
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 01/17/2016 - 10:03
नवीन
लै डयांजर किस्सा झाला आत्ता. संध्याकाळी टंकतो.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/17/2016 - 11:15
नवीन
:/
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »