साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
नमस्कार मंडळी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून म्हणजे दि.१५ जानेवारी २०१६ पासून सुरुवात होत आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीपासून माध्यमांना खाद्य मिळायला सुरुवात झालेली असते आणि पुढे जे काही सुरु झालेले असते, होत असते, ते आपण सर्वच वाचत असतो. डॉ. श्रीपाल सबनीस हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आता त्यांच्या निवडीला आव्हान देणे, नाराज साहित्यिकांनी निवडणूक कशी अवैध आहे वगैरेसाठी पोलीसात तक्रार देणे इथपर्यंत आपण सर्वांनी माध्यमातून वाचलं आहे. आता या सर्व गोष्टींच्या पुढे साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. आज दुपारी ग्रंथदिंडी निघाली होती, त्यास काही जाता आले नाही, नंतर ध्वजवंदन झाले व त्यापाठोपाठ ५ वाजण्याच्या सुमारास ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्याला मात्र वेळेत पोचलो. ग्रंथप्रदर्शन प्रचंड मोठे आहे. जवळपास ४०० स्टॉल्स आहेत.
नंतर एका मंडपात काही ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार मा. सुशिलकुमार शिंदे ह्यांच्या हस्ते झाला. मधु मंगेश कर्णिक, रा. ग. जाधव आदि साहित्यिकांना प्रत्यक्ष बघता आले. तिथे मात्र जास्त न थांबत ग्रंथप्रदर्शन बघण्यास प्राधान्य दिले.
आता उद्यापासून परिसंवाद, निमंत्रितांचे कवीसंमेलन, बहुभाषिक कविसंमेलन, मुलाखती, अभिजात कथावाचन, कथाकथन, असा भरगच्च कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे.
स्वागताध्यक्ष पी डी पाटील ह्यांनी प्रचंड खर्च केल्याचे जाणवते आहे. संमेलनस्थळाचे प्रवेशद्वार, मुख्यमंडप, उपमंडप, ग्रंथदालन, भोजनगृह सारेच काही नेत्रदीपक झाले आहे.
मराठी साहित्यप्रेमीसाठी हा एक मोठा सोहळा असतो. आता अनेकांना अशा सोहळ्याबद्दल आक्षेप असेलही तो आपण सोडून देऊ. मिपाकरांसाठी हा सोहळा तितकाच मोठा असेल असे मला वाटते. अनेक मिपाकर या साहित्य संमेलनाला हजेरी लावतील. अनेक कार्यक्रमाचा आस्वाद घेतील. दैनिकातून बर्याच गोष्टी वाचायला मिळतीलच परंतु थेट कार्यक्रमाला उपस्थित राहुन कोणता परिसंवाद चांगला झाला ? कोणाची कविता कशी होती ? मुलाखत कोणाची रंगली ? मराठी साहित्यातील विविध प्रवाहांची चर्चा कशी झडली ? अध्यक्षीय भाषण कसं होतं ? या आणि विविध साहित्यिक गोष्टींची चर्चा या निमित्ताने मिपावर व्हावी, श्रोता म्हणुन आपला अनुभव मिपाकर इथे लिहितील म्हणुन हा काथ्याकूट प्रपंच. तेव्हा उद्यापासून सुरु होणार्या सांस्कृतिक सोहळ्याबद्दल आपण या धाग्यावर लिहित राहू सर्वांना मकर संक्रातीच्या खुप खुप शुभेच्छा.
अ.भा.साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळावर कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे.
सोहळ्याची आज मी घेतलेली काही छायाचित्रे (भ्रमणध्वनीद्वारे घेतलेली असल्याने स्पष्टतेच्या मर्यादा आहेत)
१. संमेलनस्थळाचा प्रमुख मार्ग
२. रसिकजनांची गर्दी
३. ही दोन्ही ग्रंथदालने आहेत.
४. बोधचिन्ह
५. एक प्रतीकृती
६. ज्ञानबा
७. तुकाराम
८. माझी ग्रंथप्रदर्शनातली आजची किरकोळ खरेदी

२. रसिकजनांची गर्दी
३. ही दोन्ही ग्रंथदालने आहेत.
४. बोधचिन्ह
५. एक प्रतीकृती
६. ज्ञानबा
७. तुकाराम
८. माझी ग्रंथप्रदर्शनातली आजची किरकोळ खरेदी

समोरील बाजूने मंडपाचे आख्खे छतच वर वर उचलले जात असल्याचे दिसू लागले.म्हणजे नक्की काय झाले ?