सहज आणि सोपे फुड कार्व्हिंग - भाग २
Primary tabs
नमस्कार मंडळी,
आजच्या भागात आपण सफरचंदाचा फॅन किंवा स्वीर्ल पाहणार आहोत.
१. फॅन कितपत मोठा हवाय त्या नुसार सफरचंदा मधून एक भाग कापून घ्या. कापलेल्या भागाचे फार जाड नाहि आणि फार पातळ नाहि असे काप करुन घ्या.
२. सुरवातीचा आणि शेवटच्या भागातून एक-दोन स्लाईस काढा. आता शेवटच्या भागापासून जरा वरती टुथपीक आरपार खोचा. बेस साठि सफरचंदामधून एक छोटा तुकडा कापून घ्या
३. कापलेल्या तुकड्यावर टुथपीकचा एक भाग खोचा. आता टुथपीकचा वरचा उरलेला भाग बोटाने ताठ पकडून ताठ पकडून पाकळ्या अलगद चक्राकार फिरवत विलग करा. शेवटि वरच्या टुथपीकची जी जागा उरेल त्यात आधी वेगळे केलेले स्लाईस चक्राकार खोचा.
४. वेगवेगळ्या रंगीत सफरचंदाचे रंगीत फॅन/स्वीर्ल करुन डायनींग टेबलची शोभा वाढवा.
टीप: एक तर हा फॅन झटपट होतो पण आधीच करुन ठेवणार असाल तर तयार झाल्यावर अलगद लिंबूमिश्रित पाण्यात घालून ठेवा जेणेकरुन फॅन ऑक्सीडाईज होउन काळा पडणार नाहि.
हॅप्पी कार्व्हिंग.
झक्कास..
पुढच्या भागात आणखी एक दोन प्रकार द्या. हा भाग वाचायला सुरू करण्याआधीच संपला. ;)
किती सुरेख फॅन ! बघूनच गार झाल्या गेले.
हा भाग फारच छोटा आहे.
वाह ! सोपी आयडिया आणि मस्त आकार !!
फारच मस्तं आणि सोपी कल्पना.
मस्त दिसतय अगदि आणि सोप.
सफरचंदाचा फॅन!!!
छान आहे हे. सोपं आणि सुंदर!
पुढील कार्व्हिंगच्या प्रतिक्षेत...
वाचतिये हो दिपकराव.
सुंदर आहे ही कलाकृती.
मस्त दिसतंय आणि करणेबलही.
सहमत .
आमच्यासारख्या फारशी कलाकुसर न जमणार्यांसाठी हा धागा उपयुक्त आहे.
मस्त!
आणखी(सोप्पे)प्रकार येऊ द्या.
मस्त आहे!
दिसतयही छान!
वा वा वा दिसायलाही मस्त न खायलाही मस्त :)
मस्तच दिसतय एकदम....