Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाहीलं मी तुला

म — माहीराज, Mon, 01/18/2016 - 13:44
पाहीलं मी तुला माझ्यावर प्रेम करताना ते नाते अनामिक तु अनावर जपताना  ।। पाहीलं मी तुला तु एकांतात असताना, माझ्यासाठी झुरताना, तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात तुला माझं चित्र पाहताना ओढ्याकिनारी फुलपाखरांशी गप्पा मारताना माझे प्रतिबिंब समजून तूला स्वतःशीच बोलताना पाहीलं मी तुला माझ्यावर प्रेम करताना  ।। पाहीलं मी तुला खळखळून हसताना, भरभरून जगताना माझ्या दुःखाला कवटाळून तुला मुसमुसून रडताना, तू नशिबाशी लढताना प्रत्येक वेळी जिंकताना,  प्रेमासाठी माझ्या मात्र तुला वेळोवेळी हरताना पाहीलं मी तुला माझ्यावर प्रेम करताना  ।।

प्रतिक्रिया द्या
761 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा