Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुलई

स — सुमेध रानडे, Wed, 01/20/2016 - 11:15

एक दुलई ठेवलीये जपून थंडीच्या कपड्यांच्या बोळक्यात,
येते तिची आठवण मधनंच साऱ्या आठवणींच्या घोळक्यात.

त्या दुलईच्या मायेतंच मला झोप गवसली होती,
गाढ झोपेतून उठून लहानपणी मी तिला लाळही पुसली होती.

मऊशार उबदार मखमली तिचा स्पर्श,
तिने अगदी सहज टिपलय माझ्या वाढत्या वयाचं वर्ष!

माझ्यासवे ऐकल्यायेत तिने कितीतरी गोष्टी आणि,
कितीदातरी लपवलंय माझ्या डोळ्यातलं पाणी!

सकाळ झाली की गुंडाळून फेकून द्यायचो कोपऱ्यात,
आणि रात्री मात्र त्याच कोपऱ्यातून काढायचो तिला तोऱ्यात.

खुपसलं असेल, लाथाडलं असेल नको असेल तशी,
पण माझ्या कित्येक आठवणींना दिली तिने कुशी!

परवाच आई म्हणाली तू पांघर तीच दुलई,
शोध शोध शोधली पण मिळाली नाही कुठेही.

झालो थोडा कासावीस पोटात काहीशी ढवळाढवळ,
घरभर शोधलं आणि सापडली माझ्याच उशीजवळ.

माझ्या अश्रूंच्या खुणांना तिने अजूनही जपलंय,
माझ्या लहानपणीचे मूल तिच्यात आजही लपलंय!

निरागस स्वप्न मनाला तिच्याखालीच पडलंय,
आणि त्या स्वप्नात रंगतानाचं हास्यही तिथेच दडलंय!

ती थंडी, ती रात्र, ते हास्य, ते स्वप्न,
या एकाच दुलईत गुंडाळण्याचा माझा भाबडा प्रयत्न...

या दुलईत डोळेही आपोआप मिटू लागतात,
आणि माझ्या हाताशीच असतात आईबाबांचे हात!


प्रतिक्रिया द्या
2516 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पैसा Wed, 01/20/2016 - 11:35 नवीन
छान आहे कविता
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Wed, 01/20/2016 - 11:40 नवीन
सुंदर लिहिलेय.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 01/20/2016 - 11:50 नवीन
अप्रतिम ! :)
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Wed, 01/20/2016 - 11:56 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Wed, 01/20/2016 - 14:19 नवीन
छा न आहे रचना
  • Log in or register to post comments
स
सटक Wed, 01/20/2016 - 15:14 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे गुरुवार, 01/21/2016 - 17:42 नवीन
दोन दिवस झाले थंडीच्या नं दुलई च्या भाईरच निंगालो नाई त्याच्च्यानं काई बोल्याले चान्संच भेटला नाई. बाकी दुलईनं मस्तं गरमी आनली सुमेधभाऊ.बढिया
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 01/21/2016 - 18:01 नवीन
किती गोड लिहिलंय!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 01/21/2016 - 19:25 नवीन
गोड आहे कविता. आजीच्या साडीची शिवलेली चौघडी आठवली.
  • Log in or register to post comments
स
सुमेध रानडे Fri, 01/22/2016 - 09:41 नवीन
सर्वान्ना खूप खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 01/22/2016 - 18:31 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा