Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पॉर्न आणि आपण - सर्वेक्षण

३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 01/20/2016 - 21:21
🗣 105 प्रतिसाद
काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदी लागू होण्याआधीच हा निर्णय मागे घेतला. त्या निमित्ताने पॉर्नबद्दल सर्वसामान्यांची आणि अभ्यासकांची, पॉर्नच्या बाजूने आणि विरोधात अशी सगळ्या प्रकारची मतं प्रदर्शित झाली. पॉर्न बघणं चांगलं का वाईट, योग्य का अयोग्य याबद्दल काहीही मत न बनवता लोकांना काय वाटतं याचा थोडा अभ्यास केला जावा; लोक पॉर्न बघतात का, बघतात तर किती प्रमाणात, किती नियमितपणे बघतात; बघत नसतील तर का बघत नाहीत; पॉर्न ही घृणास्पद गोष्ट आहे का अनावश्यक याबद्दल समाजाचं काय मत आहे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं. कारण समाजासाठी बनवलेले कायदे हे समाजाच्या मताकडे दुर्लक्षून बनवले जाऊ नयेत. आत्तापर्यंत अशा प्रकारची अनेक सर्वेक्षणं झालेली आहेत, पण ती पाश्चात्य समाजात झालेली आहेत. टीव्ही, सिनेमा, इंटरनेट या माध्यमांतून पाश्चात्य संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचत असली तरीही भारतीय समाजाची, भारतात अनेक वर्षं घालवलेल्या लोकांची मतं काही निराळी असू शकतात. त्याची चाचपणी करावी असा या प्रश्नमालिकेमागचा हेतू आहे. या सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या कोणाचीही व्यक्तिगत माहिती, ओळख आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. किंचित व्यक्तिगत माहिती हवी आहे ती वयोगट कोणता आणि स्त्री-पुरुषांच्या मतांमध्ये काही फरक आहे का असा अभ्यास करण्यासाठी. हे प्रश्न पूर्ण करण्यात तुमचा फार वेळ जाणार नाही. या प्रश्नांच्या उत्तरांमधून कोणाबद्दलही मतं बनवायची नाहीत, वा कोणालाही जोखायचं असा हेतू नाही. ही प्रश्नावली भरताना एक मिनीटापेक्षा जास्त वेळ जाऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपण समाज म्हणून कसा विचार करतो हे समजून घेण्यासाठी मदत करण्याबद्दल आभार. सर्वेक्षणाचे निकाल (बहुदा) मे महिन्यात इथेच जाहीर केले जातील. ३१ मार्चपर्यंत सर्वेक्षणात भाग घेता येईल. सर्वेक्षणात भाग घेताना गूगलमध्ये लॉगिन करण्याची गरज नाही. खाजगीपणा जपण्यासाठी प्रायव्हेट ब्राऊजिंगची सोय वापरून उत्तरं देऊ शकता; जेणेकरून मला आणि गूगललाही तुमची ओळख काय हे समजणार नाही. हा सर्वेक्षणाचा दुवा.
वर्गीकरण
सामाजिक

प्रतिक्रिया द्या
31687 वाचन

💬 प्रतिसाद (105)
व
विवेक ठाकूर Mon, 01/25/2016 - 07:20 नवीन
तुम्ही पटलं नाही म्हणालात म्हणून स्पष्टीकरण दिलं. पिक्चर पाहून काल्पनिक आनंद मिळतो पण खरा आनंद कृतीत असतो इतका उघड मुद्दा आहे. तस्मात, पिक्चर पाहू नये असं नाही, तो प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न व्यर्थ आहे, ते होणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रभाकर पेठकर Mon, 01/25/2016 - 07:20 नवीन
डॉक्टरसाहेब, 'प्रणय' आणि 'शरीरसंबंध' ह्या दोन वेगळ्याअवस्था आहेत. एक मानसिक आहे तर दुसरी शारीरीक आहे. दोघांच्याही इच्छेने, संमतीने ह्या दोन्हीं अवस्थांचा संगम घडून येतो तेंव्हा एक आनंददायी 'संभोग' घडून येतो. अन्यथा तो 'बलात्कार' असतो. संमतीच्या 'शारीरीक संबंधां'मध्ये, वयाचे बंधन नक्कीच असते. 'प्रणयामध्ये' वयाचे बंधन नसते. ७०+ वयातही, पतीने पत्नीसाठी वेणी/गजरा आणणे (जमत असल्यास माळणे) आणि पत्नीने पतीसाठी जेवायचे थांबणे, पतीच्या आवडीचे ४ पदार्थ मुद्दाम कष्ट करून स्वहस्ते बनविणे ह्यातुन 'प्रणय' आकार घेत असतो. हे निव्वळ एक उदाहरण आहे. अशा अनेक गोष्टी असतात प्रणय फुलविण्याच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
संदीप डांगे Mon, 01/25/2016 - 07:30 नवीन
अगदी अगदी. नेमक्या शब्दात पकडलं आहे. इथे बहुधा 'शरिरसंबंध' ह्या एकाच गोष्टीवर चर्चा चालू असण्याने विविध पैलुंची सरमिसळ होत आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/25/2016 - 01:08 नवीन
प्रणयाबद्दल हे सगळे रोमँटिक सिद्धांत मला अमान्य नाहीत. फक्त कधीकधी थिअरी आणि प्रॅक्टीस यांच्यात फरक असतो. तो फरक असण्याचं कारण मनुष्य म्हणजे यंत्र नाही; ठराविक सिद्धांत मांडला आणि तो उच्च आहे म्हणून आयुष्य तसंच चालतं असं नाही. बाकी ठीकच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Mon, 01/25/2016 - 05:34 नवीन
फक्त कधीकधी थिअरी आणि प्रॅक्टीस यांच्यात फरक असतो. तो फरक असण्याचं कारण मनुष्य म्हणजे यंत्र नाही; ठराविक सिद्धांत मांडला आणि तो उच्च आहे म्हणून आयुष्य तसंच चालतं असं नाही. प्रणयात थिअरी कमी आणि प्रॅक्टीस जास्त म्हत्त्वाची आहे. पॉर्नमुळे यंत्रवत (म्हणजे पाट्या टाकणार्‍या) युगुलाला शून्य फायदा आहे. कारण प्रॅक्टीसच जमत नाही त्यांना काल्पनिक मैथुनाचा काय उपयोग? सिद्धांत उच्च नाही, तो सोपा, वास्तविक आणि आचरणात आणून प्रणयाची खुमारी वाढवणारा आहे. माणूस यंत्र नाही म्हणूनच तर स्वतःच्या कल्पनेनं तो स्वतःचं प्रणय विश्व निर्माण करु शकतो. त्याला पॉर्न, म्हणजे दुसर्‍यानं दाखवलेलं काल्पनिक विश्व, काही कामाचं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रभाकर पेठकर Mon, 01/25/2016 - 07:24 नवीन
त्याला पॉर्न, म्हणजे दुसर्‍यानं दाखवलेलं काल्पनिक विश्व, काही कामाचं नाही. १०० % सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
सुबोध खरे Mon, 01/25/2016 - 09:01 नवीन
प्रतिसाद लांब लचक होत आहे. यास्तव एक वेगळा धागा काढत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विवेक ठाकूर Mon, 01/25/2016 - 09:51 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
A
Anand More Sat, 02/27/2016 - 08:30 नवीन
सहमत 100% सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
क
कवितानागेश Sat, 01/23/2016 - 10:18 नवीन
प्रतिसाद आवडला. वेळ मिळाला कि उत्तरे लिहीन तिथे जाऊन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ख
खटासि खट गुरुवार, 01/21/2016 - 19:56 नवीन
सर्व्हेचे निकाल बापट गुर्जींच्या हस्ते प्रकाशित होणार का ?
  • Log in or register to post comments
प
प्रणित Fri, 01/22/2016 - 02:16 नवीन
फॉर्म भरला
  • Log in or register to post comments
च
चिन्मना Fri, 01/22/2016 - 03:20 नवीन
फॉर्म भरला.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 01/22/2016 - 14:38 नवीन
फॉर्म भरला
  • Log in or register to post comments
प
प्रतिक कुलकर्णी Fri, 01/22/2016 - 19:00 नवीन
फॉर्म भरला.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Sat, 01/23/2016 - 09:07 नवीन
असा सर्व्हे होणं हे देखील पॉर्न पाहणे हे विशेष काही तरी आहे या समजुतीतून होतंय बहुधा. हे सुद्धा एक प्रकारचं मनोरंजन आहे हे एकदा मान्य झालं, त्याबद्दल खुलेपणा आला की पॉर्न पाहणे म्हणजे चोरी केली किंवा तत्सम काहीतरी ही भावना कमी झाली तर काय बरं काय वाईट याबद्दलची जागृती सुद्धा होईल. कुणाला काय आवडतं, कुणाची फँटसी काय आहे ही अगदी वैयक्तिक आहे. एखादी स्त्री पॉर्न पाहते म्हणजे ती फालतू असणार किंवा एखादा पुरूष सहकारी पॉर्न पाहतो म्हणजे तो बलात्कारी असू शकतो असली खुळचट मतं अजून आपल्याकडे आहेत. ज्याचा त्याचा वैयक्तिक चॉईस मान्य करण्याइतकी प्रगल्भता आपल्याकडे उजाडेल तो सुदिन. (बीफ खाण्याबद्दल नाही , पॉर्न बद्दल चाललंय ).
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 01/23/2016 - 10:20 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
श
शैलेन्द्र Sat, 01/23/2016 - 10:19 नवीन
मस्तय सगळंच
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 01/23/2016 - 10:42 नवीन
पोर्न एकदा उत्सुकता म्हणून पाहिल्यावर पुन्हा बघण्याची मला स्वतः ला गरज वाटली नाही. पण प्रत्येकाची लैंगिक गरज वेगळी असते , शिवाय ती काळाप्रमाणे बदलूही शकते. पण बर्याच लोकांची ती गरज जर पोर्न मुळे भागणार असेल तर लैंगिक शोषणाचे प्रमाण कमी व्हावे अशी अपेक्षा आहे. या सर्वेक्षणात, पॉर्नचा लैंगिक भूकेवर कसा परिणाम अनुभवता , उददीपित होते कि शमते, हा प्रश्न असावा असेसुचवते.
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Sat, 01/23/2016 - 16:26 नवीन
फॉर्म भरला.
  • Log in or register to post comments
स
साती Sat, 01/23/2016 - 17:47 नवीन
भाग घेतला. पण ३५-५४ वाल्यांना एकाच वयोगटात टाकणे पटले नाही. :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/24/2016 - 15:21 नवीन
असं म्हणणारी तू दुसरी. मला स्वतःला पोक्त म्हणवायचं होतं म्हणून ३५-५४ हा एकच गट केला. ;-) खरंतर पॉर्न बघणं आणि वय यांचा संबंध कसा असेल याबद्दल माझी काहीच थिअरी नाही; साधारणपणे तरुण लोक अधिक बघत असतील, मध्यमवयीन लोक जरा कमी, उतारवयाचे आणखी कमी असा अंदाज आहे. पण त्यात नक्की वयपरत्त्वे कसे तुकडे करावेत याबद्दल काहीच अंदाज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
ऋ
ऋत्विका Sat, 01/23/2016 - 20:29 नवीन
महत्वाच्या विषयावरील सर्वेक्षण आहे. कितीही मर्यादीत असलं तरीही. भाग घेतला.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 01/24/2016 - 04:26 नवीन
फोर्म भरला हो.
  • Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे Sun, 01/24/2016 - 15:32 नवीन
प्रत्यक्षात ज्या प्रकारचे लैंगिक व्यवहार करता तशाच प्रकारचं पॉर्न वाचता/बघता का? /Do you consume the same kind of porn that you practice in real life? *
हा प्रश्न उलटा हवा होता, ज्या प्रकारचे पोर्न प्रत्यक्ष बघता तश्या प्रकारच्या कामक्रिडा स्वतंच्या लैगिक जीवनात करता का? आमचा एक मित्र पॉर्नमधिल प्रकार प्रत्यक्ष सेक्स् लाईफमध्ये करायचा ,त्याची बायको या प्रकाराने घाबरली व त्याला सोडून आता माहेरी राहते.हा अँगलही प्रश्न मालिकेत असायला हवा होता.
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Sun, 01/24/2016 - 17:53 नवीन
पॉर्न आणि फँटसीज पाहून वैवाहिक जीवनाची वाट लागण्याची शक्यताच जास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
न
नया है वह Mon, 01/25/2016 - 11:36 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/25/2016 - 01:05 नवीन
इथे माझा बायस आड येतो. किंवा कोणतीही सज्ञान व्यक्ती आपापले निर्णय घ्यायला स्वतंत्र असते, हा विचार आड येतो. अमेरिकन स्त्रीवादी लेखनात ज्यांचा उल्लेख प्रो-सेक्स किंवा अँटी-अँटी-पॉर्न असा करतात; मी साधारण त्या विचारांची आहे. पॉर्न या प्रकारामुळे नुकसान होतं, व्यसन लागतं, अनिच्छेने पॉर्न बघायला लावलं जातं अशा प्रकारच्या बातम्या, समज-अपसमज, ओळखीतल्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी समजत असतात. पॉर्नमध्ये काम करणाऱ्या लोकांचं शोषण होतं, पॉर्न हा वेश्याव्यवसायच आहे, लहान मुलांना त्यात वापरलं जातं अशी शोषणाची निरनिराळी, सत्यासत्य परिमाणंही पॉर्नला आहेत. तरीही, बहुतांश लोक सभ्य, सज्जन असतात; समाजाचे नीतीनियम पाळणारे असतात; पॉर्न ही ननैतिक गोष्ट आहे तर लपूनछपून बघणारे असतात; असा माझा समज आहे. हा समज ग्राह्य आहे का नाही, हे तपासण्याच्या अनेक पद्धती असतील. मला फक्त पॉर्नचं व्यसन किती लोकांना लागतं, लोकांना जे बघायला हवं असतं ते मिळतं का असा मर्यादित आवाका सध्या तपासायचा आहे. या प्रश्नावलीचा उद्देश कोणालाही जोखणं असा नाही; त्यामुळे व्हीजाच्या फॉर्म्सवर असतात तशा प्रकारचे प्रश्न - तुम्ही दिवाणी/फौजदारी गुन्ह्यात सहभाग घेतला होता का? - या प्रश्नावलीत नाहीत. हे सर्वेक्षण परिपूर्ण नाही, त्याची कारणं काय आहेत याची मला काही-किंचित जाणीव आहे. करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी यात करता आल्या असत्या, ज्या विचार करताना मला सुचल्याही होत्या. पण सर्व्हेची लांबी, लोकांना त्यात किती वेळ घालवावा लागेल, त्यामुळे लोक उत्तरं देण्याचा कंटाळा करतील का, मला स्वतःला किती झेपेल असा विचार करता माझ्या मनात असलेल्या गोष्टीही मी सोडून दिल्या. पॉर्नबद्दल सगळी माहिती जमवायची असा उत्तम, उदात्त पण असाध्य हेतू या सर्वेक्षणामागे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
व
विवेक ठाकूर Mon, 01/25/2016 - 05:38 नवीन
मला फक्त पॉर्नचं व्यसन किती लोकांना लागतं, लोकांना जे बघायला हवं असतं ते मिळतं का असा मर्यादित आवाका सध्या तपासायचा आहे. पॉर्नचं व्यसन लागलेल्या व्यक्तीची, कल्पनेतच रमल्यामुळे, वास्तविकाशी फारकत होते आणि खर्‍या सेक्सलाइफची वाट लागते. तस्मात, पॉर्नच्या आहारी जाणं अयोग्य आहे. शिवाय `जे बघायला हवं असतं ते मिळतं का?' याचा विदा जमवून काय उपयोग ? कारण असा पुरवठा करणं एकतर बेकायदा आहे आणि दुसरं म्हणजे ते व्यक्तीला पॉर्न पाहायला उद्युक्त करणारं आहे त्यामुळे अयोग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रभाकर पेठकर Mon, 01/25/2016 - 07:41 नवीन
पॉर्न पाहण्याची इच्छा आणि व्यसन तारूण्यावस्थेत, लग्ना आधी जास्त असतं. मुख्य कारण शारीरिक गरजेची आक्रमकता हे असावं, असं मला वाटतं. लग्ना नंतर २-३ वर्षे सहचारीणीसमवेत पाहण्याची इच्छा 'एक वेगळा अनुभव' असतो म्हणून असू शकते. बाकी पुढे पॉर्नची गरज भासत नाही. वास्तवातच खरे सुख आहे हा विचार बळावलेला असतो. अपरिपक्व वयातून परिपक्व वयात पदार्पण वगैरे गोष्टींचा प्रभाव असतो. मध्यम वयात पॉर्न पाहण्याची इच्छाही मालवलेली असते तर थोड्याफार प्रमाणात त्या गोष्टीला (पॉर्न पाहणे) विकृत मानण्याकडे ओढा वळतो तर उतार वयात कित्येकांना, शरीर साथ देत नसल्याने, उद्दीपनासाठी पॉर्नचा आधार (एक औषध म्हणून) घ्यावा लागतो किंवा घ्यावासा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
ग
गामा पैलवान Tue, 01/26/2016 - 15:46 नवीन
विवेक ठाकूर, खऱ्या सेक्स लाईफचे वाट लागते या विधानाशी दणदणीत सहमती आहे. एक ज्वलंत उदाहरण म्हणजे जपान. तिथे तरुण लोकं एकतर लग्न करताच नाहीत. आणि दुसरं म्हणजे सेक्समधला रस झपाट्याने कमी होत चाललाय. पॉर्नच्या व्यसनामुळे जोडीदारासंगे आनंद अनुभवणे ही कल्पना कालबाह्य झाली आहे. एका लेखात नेमकी समस्या वर्णन करणारं एक वाक्य सापडलं : >> .... one man in his early 30s, a virgin, who can't get sexually aroused >> unless he watches female robots .... पॉर्नच्या अनिर्बंध व्यसनामुळे ही समस्या उत्पन्न झाली आहे. वरील उदाहरण प्रातिनिधिक आहे. परिस्थिती इतकी टोकास गेलीये की पुरूष पॉर्नस्टार लोकांना कामाचा अतिताण पडतोय. आता बोला! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
मारवा Mon, 01/25/2016 - 08:36 नवीन
वैराग्यपुर्ण आयुष्य हीच मोक्षाची गुरुकील्ली कामवासना हा रिपु आहे षडरिपुंपैकी एक आहे. शत्रु आहे. याचा नायनाट करण्याचे सामर्थ्य केवळ वैराग्यातच आहे. आणि काम मोठा बलवान रिपु आहे दर्शन मात्रे मन कामना "स्फुरती" असे कामाचे स्वरुप आहे. चर्चे मात्र मन कामना भडकती असे कामाचे स्वरुप आहे. मी वैराग्याचा मार्ग अंगिकारल्याने इथल्या चर्चेत प्रतिसाद देत नाही. कारण सतत प्रतिसाद देण सतत त्या "विषया" ची चर्चा करण्ं हे "विषयाधीन" होण्याच सुस्पष्ट लक्षण आहे. खरा वैराग्यपुर्ण "जितेंद्र" केवळ माझ्यासारखा एखादाच प्रतिसाद बुडती हे जन देखवे ना डोळा या आणि केवळ याच उदात्त भावनेतुन देत असतो. बाकीचे डुप्लीकेट वैरागी सतत सतत चर्चे कडे वळतात. आ.न.मा. कॉ.रा.गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 01/25/2016 - 08:49 नवीन
=)) =)) मेले मेले! फक्त त्या कॉ रा ची फोड काय आहे तेवढं सांगून जावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/25/2016 - 09:35 नवीन
कॉ.रा.गा.पै. = काँग्रेस, राजद... आसाच आसनार, पन ते गा. पै. जल्ला काय हाय तेची फोड करा पैल्याछूट ? ;) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Mon, 01/25/2016 - 10:46 नवीन
मी या धाग्यावर येणार नव्हतो मला अजिबात या वैषयीक चर्चेत रस नाही मला ही चर्चा मुळीच चिघळवायची नाही तरी गैरसमज नको उगाच म्हणुन कॉ. रा. गा. पै. म्हणजे कॉपी राइट गामा पैलवान असे वाचावे. मुळ "कल्पना" गा.पै. यांची आहे मी ती पळवली यावर खवळुन पैलवान मला एखाद "धोबीपछाड" देउन धुवुन काढु नये या भीतीने मी आदर पुर्वक त्यांच्या कॉपीराइट चा उल्लेख आवर्जुन केलेला आहे. आपला नम्र मारवा कॉपी राइट गामा पैलवान असे वाचावे जाता जाता द्वितीय प्रतिसादाप्रीत्यर्थ एक प्रायश्चिताची प्रार्थना म्हणुन जातो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो "विषय" सर्वथा नावडो जय गुरुदेव
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 01/25/2016 - 16:47 नवीन
मारवा,
>> मुळ "कल्पना" गा.पै. यांची आहे
काय सांगताय! कुठे सापडले हे अस्मादिकांचे वचनमौक्तिक? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Mon, 01/25/2016 - 18:03 नवीन
मी तुमची स्वाक्षरी ची मुळ कल्पना जी तुम्ही आ.न.गा.पै. नेहमी वापरता. वरील प्रतिसादात वापरली आ.न.मा. आपला नम्र मारवा अशी तर तुमची स्वाक्षरी कल्पना वापरली म्हणुन कॉपीराइट गामापैलवान चा शॉर्टकट पण जोडला कॉ.रा.गा.पै. इतकचं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 01/26/2016 - 08:05 नवीन
मारवा, फक्त स्वाक्षरीच वापरली होय. आ.न. हे तर पारंपारिक संबोधन आहे! तरीपण मला श्रेय दिल्याबद्दल धन्यवाद! फुकंटचें श्रेयं कुणांस नकों बरें? ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ए
एस Mon, 01/25/2016 - 10:58 नवीन
बादवे, तात्यांचा एक फार जुना धागा आठवला. रामदास यांनी लिहिलेली कथा तात्यांनी इथे टंकली होती (रामदासांच्या पूर्वपरवानगीनेच अर्थात). तिथेही असेच सर्वज्ञ प्रतिसाद आले होते. असो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 01/25/2016 - 11:02 नवीन
वळतं पण कळत नाही.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/25/2016 - 22:00 नवीन
विठामाऊली, तुम्ही सर्वज्ञ आहात याबद्दल मला काहीही शंका नाही. पण सेक्सॉलॉजी या विषयात मूलगामी संशोधन करणाऱ्या; सामान्य अमेरिकन जनतेला, प्रेम कसं करतात हे ज्यांनी शिकवलं असं म्हटलं जातं त्या, मास्टर्स आणि जॉन्सन यांच्यावर माझा अधिक विश्वास आहे. त्याबद्दल मला माफ करा. पुन्हा एकदा, मास्टर्स आणि जॉन्सन यांच्याच शब्दांत - "Sexual topics are often controversial and value-laden, but the controversy is often relative to time, place, and circumstance. What is labeled as "moral" or "right" varies from culture to culture, from century to century. Many of the moral issues pertaining to sex relate to certain religious traditions, but religion has no monopoly or morality. People who have no closely held religious creed are just as likely to be moral as those whose values are tied to a religious position. There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." From - Sex and Human Loving Authors - William H. Masters, Virginia E. Johnson, Robert C. Kolodny. Publishers - Little, Brown and Company. Page No 10. तिरपा ठसा मूळ लेखकांचाच.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 01/26/2016 - 11:21 नवीन
फॉर्म भरलेला आहे* *या वाक्याचा फक्त पहिलाच अर्थ इथे विचारात घेतला जावा :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 01/26/2016 - 16:06 नवीन
12 percent of all Internet websites are pornographic. 25 percent of all online search engine requests are related to sex. That’s about 68 million requests per day. 35 percent of all Internet downloads are pornographic. 40 million Americans are regular visitors (in their own estimation) to porn sites. 70 percent of men aged 18 to 24 visit a porn site at least once per month. The average age of first exposure to Internet porn is 11. The largest consumer group of Internet porn is men aged 35 to 49. One-third of all Internet porn users are female. The most popular day of the week for watching porn is Sunday. हि अमेरिकन सांख्यिकी आहे. परंतु भारतात इंटर नेट उपलब्ध असलेल्या लोकांमध्ये हीच सांख्यिकी थोड्याफार प्रमाणात सत्य असावी.
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Fri, 02/26/2016 - 19:10 नवीन
तरी काही फरक पडणार नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/26/2016 - 20:23 नवीन
तुमचा प्रतिसाद तुमच्यासाठी किती योग्य आहे हे मला शब्दांत सांगता येणार नाही, विठामाऊली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 02/25/2016 - 21:50 नवीन
धागा वर काढण्यासाठी प्रतिसाद. आत्तापर्यंत सर्वेक्षणात भाग घेतला नसल्यास जरूर भाग घ्यावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
ज
जातवेद Fri, 02/26/2016 - 10:25 नवीन
आम्हाला वाटलं निकाल आला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/26/2016 - 18:47 नवीन
त्यासाठी बहुदा मे महिना उजाडेल. ३१ मार्चपर्यंत फॉर्म भरता येईल. अॅडमिशन त्यानंतर. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/27/2016 - 08:24 नवीन
उगं हेलपाटा झाला मला. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
म
मुक्त विहारि Sat, 02/27/2016 - 09:39 नवीन
१००
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा