Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रात्र

आ — आनंदमयी, Mon, 01/25/2016 - 23:03
दूरात चंद्रमाचा मधुरम्यसा महाल फिरती सभोवताली तारांगणे विशाल निष्पाप कोवळ्या ह्या गोष्टीत दंगलेली चैतन्य शैशवाचे उधळीत रात्र आली ... तो स्पर्श पावसाळी तो चिंब देह ओला तो केवडा सुगंधी केसात माळलेला तो मोरपीस वेडा भिरभीर होय गाली हळुवार मालवूनी नक्षत्र, रात्र आली ... स्वप्नील लोचनात साचून चंद्रतारे गगनात घे भरारी, जिंकून घे दिशा रे तारुण्य ध्येयवेडे लेवून आज भाळी वाटा नव्या यशाच्या शोधीत रात्र आली ... थकल्या सुन्या दिशा ह्या अन वाट संपलेली आता छटा सुखाची अंतात गुंफलेली अंकूरण्या नव्याने झडुदेत जीर्ण वेली चाहूल शेवटाची मिरवीत रात्र आली... © अदिती जोशी unaadpaus.blogspot.com

प्रतिक्रिया द्या
3634 वाचन

💬 प्रतिसाद (14)
च
चाणक्य Tue, 01/26/2016 - 06:59 नवीन
नेहमीप्रमाणे.....एकदम नादमय. आवडली.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 01/26/2016 - 07:42 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
आ
आनंदमयी Tue, 01/26/2016 - 09:26 नवीन
Lay bhari kas suchat tula ameya
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 01/26/2016 - 11:41 नवीन
व्हाटइसधिस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदमयी
प
पैसा Tue, 01/26/2016 - 11:43 नवीन
एस भाऊशी बाडिस. कविता सुंदर आहे. पण या प्रतिक्रियेचा अर्थ कळला नाही. आनंदमयी, दुसर्‍या कोणाच्या कविता इथे पोस्ट करत आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
आ
आनंदमयी गुरुवार, 01/28/2016 - 15:08 नवीन
माझ्या वडिलान्नी नुकतच अंतर्जाल वापरणे शिकण्यास सुरुवात केली आहे... डेस्कटॉप वर हे पेज उघडे असताना त्यान्नी ह्या कवितेवर स्वतःचं फेसबुक पेज समजून प्रतिक्रीया दिली.. मला हे लक्षात आलं असूनसुद्धा प्रतिक्रीया काढून टाकता येत नव्हती... कविता माझीच आहे.. :) आपल्या प्रतिक्रीयांसाठी धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदमयी
ए
एक एकटा एकटाच Tue, 01/26/2016 - 10:21 नवीन
वाह
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 01/26/2016 - 13:17 नवीन
अतिशय सुरेख!गुणगुणायला लावणारी कविता!
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 01/26/2016 - 13:40 नवीन
सगळ्या कडव्यांतील शेवटची ओळ सुंदर आहे.. अर्थात कविता नक्की कुणाची हा प्रश्न मलाही पडला आहे आता.. राघव
  • Log in or register to post comments
स
सुमेध रानडे Tue, 01/26/2016 - 16:40 नवीन
अप्रतीम!
  • Log in or register to post comments
स
सटक Tue, 01/26/2016 - 17:30 नवीन
सुंदर कविता! चार रात्रीत अख्खा जीवनपट उलगडला आहे!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 02/06/2016 - 17:03 नवीन
खुप आवडली कविता. या कवितेमध्ये प्रचंड सुंदर आशय भरलेला आहे आणि भाषेच्या सौंदर्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच. या अशा कविताच मराठी साहित्याला समृद्ध बनवित असतात आणि वेगळ्याच उंचीवर घेऊन जात असतात. पुढील लेखनासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
ए
एकप्रवासी गुरुवार, 02/11/2016 - 14:57 नवीन
सुरेख आहे! कवीतेत रात्र उतरली आहे...
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 02/12/2016 - 04:12 नवीन
Sundar aahe.. khupach aavadali..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा