Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आजच्या काळात 'रम्भा - शुक संवाद' कसा लिहिला जाईल ?

म
माहितगार
गुरुवार, 01/28/2016 - 10:42
🗣 7 प्रतिसाद
मराठी विकिस्रोत प्रकल्पात शुक-रंभा संवादाचा संस्कृत पाठ मराठी अनुवादा सहीत उपलब्ध आहे. (अनुवाद मराठी विकिपीडियासदस्य व्ही.व्ही.परब यांनी उपलब्ध केला आहे) त्यातील एक परिच्छेद उदाहरणा दाखल देत आहे. उर्वरीत पाठ मराठी विकिस्रोत प्रकल्पात शुक-रंभा संवाद येथे वाचावा. चर्चेसाठी आवशकते प्रमाणे प्रतिसादातून उधृत करू शकता. विकिस्रोत प्रकल्पातील अनुवादात सुधारणा सुचवण्यास स्वागतच असेल. रम्भा : चलत्कटी नूपुरमञ्जुघोषा नासाग्रमुक्ता नयनभिरामा । न सेविता येन भुजंगवेणी वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१४॥ नाजूक कमर असलेल्या, नुपूरांद्वारे मंजुळ घोष करणाऱ्या, नाकात मोती जडवणाऱ्या, सुंदर नेत्र असणाऱ्या आणि सर्पाप्रमाणे अंबाडा धारण केलेल्या सुंदरीचे ज्याने सेवन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१४॥ शुक : विश्वम्भरो ज्ञानमयः परेशो जगन्मयोऽनन्तगुणप्रकाशी । आराधितो नाऽपि धृतो न योगे वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१५॥ विश्व चालवणाऱ्या, ज्ञानपूर्ण, परमात्मा, संसार स्वरूप, अनंत गुणांना प्रकट करणाऱ्या भगवंताची ज्याने आराधना केली नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले. ॥१५॥ चर्चेचा विषय काय ? १) रंभा-शुक संवादातील कोणता भाग आजच्या काळास अनुसरून नाही असे वाटते का तसे वाटत असेल तर का ? २) आजच्या काळात रंभा-शुक संवाद लिहावयाचा झाल्यास तो कसा लिहिला जाईल ?
वर्गीकरण
संस्कृत
अनुवाद
शुक
रंभा

प्रतिक्रिया द्या
4223 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पैसा गुरुवार, 01/28/2016 - 12:55 नवीन
बहुतेक आता रंभेचा संवाद शुक म्हणेल आणि शुकाने दिलेले उत्तर रंभा देईल. किंवा कदाचित "काहीही हं शुका," म्हणेल. सुंदर्‍यांचे वर्णन केलंय ते काही फार बदलले नाही, भुजंगवेणी फारच कमी प्रमाणात असते. आणि शुकाने वर्णन केलेल्या प्रकारात भगवंताची आराधना आता कोणी करत नाहीत.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 01/28/2016 - 13:33 नवीन
ब्याटमनुष्यास आमंत्रण.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/28/2016 - 13:53 नवीन
"अंबाडा धारण केलेल्या सुंदरीचे ज्याने सेवन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले." याचा अनुवाद... "अंबाडा धारण केलेल्या सुंदरीचा आस्वाद ज्याने घेतला नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय / असेल" असा जास्त चांगला होईल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/28/2016 - 14:00 नवीन
आजच्या जमान्यात शुक व रंभा दोघेही रंभेचे संवाद कोरसमध्ये म्हणतील व शुकाचे संवाद वाचून डोळे मिचकावून खदखदा हसतील अशीच जास्त शक्यता आहे. :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 01/28/2016 - 14:02 नवीन
गाधवाचं लग्नमधला 'रंभेचा अंबाडाsssssss' असं म्हणणारा मकरंद अनासपुरे डोळ्यांसमोर आला.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 01/28/2016 - 14:03 नवीन
'गाढवाचं' असं वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 01/28/2016 - 14:03 नवीन
'गाढवाचं' असं वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा