देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा कोणाचा, महात्मा गांधींचा कि नेताजी सुभाषचंद्र बोसांचा
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात असंख्य लोकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत, सहभाग आहे हे निर्विवाद सत्य आहे. पण आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून ढोबळमानाने हेच सांगितले जात आहे कि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधींचा सिहांचा वाटा आहे. हि गोष्ट मलाही मान्य होती आणि आहे. पण २७ जानेवारीच्या (२०१६) NDTV, International Agenda (8.30pm) च्या कार्यक्रमात अजून एक नवीन पण महत्वाची गोष्ट समजली आणि जी मला तुम्हा सर्वां बरोबर share (मराठी शब्द सापडत नाही क्षमस्व) करायला आवडेल आणि त्यावर तुम्हा सर्वांचे विचार वाचायला पण आवडेल. मी यावर जालावर शोधाशोध केल्यावर मला "http://indiatoday.intoday.in/story/who-freed-india-gandhi-or-bose/1/579840.html" हा दुवा मिळाला. आणि हे सर्व वाचल्यावर आता असे वाटू लागले आहे कि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजी सुभाषचंद्र बोसांचा खूपच मोठा वाटा आहे आणी त्याप्रमाणात त्याची योग्य नोंद न घेवून इतिहास लिहिणार्यांनी त्यांच्यावर थोडाफार जास्तच अन्याय केला आहे.
NDTV च्या International Agenda कार्यक्रमात एक गोष्ट कळली, कि ज्या ब्रिटीश पंतप्रधानांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासंधर्भात कागदावर सही केली त्यांना ह्या निर्णयावर यायला नेताजीच्या "आजाद हिंद सेनेनी, त्यांच्या सैनिकांनी आणी इग्रज अधिपत्याखालील त्यांच्या सैनिक-बंधूनी " भाग पाडले होते. आणी हे सर्व स्वतः ब्रिटीश पंतप्रधानांनी मान्य केले होते. परिस्थिती अशी झाली होती कि जर त्यावेळी इग्रजानि स्वात्यंत्र दिले नसते तर खूप मोठा सैनिकी उठाव झाला असता आणि तो १८५७ पेक्षा मोठा आणि जास्त शिस्थबद्ध झाला असता आणि त्या वेळी इग्रज सैन्य अजून एक गृह-युद्ध टाळू इच्छित होते. बाकी सर्व वरील दुव्यावर जास्त विस्ताराने दिले आहे म्हणून मी ते सर्व परत लिहित बसत नाही. पण मला मिसळ पाव या संकेत स्थळावरील दिग्गज लोकांचे विचार/मते वाचायला आवडेल.
💬 प्रतिसाद
(82)
भ
भंकस बाबा
Sat, 01/30/2016 - 07:38
नवीन
फाळणी होणार ही काळ्या दगड़ावरची रेघ होती. स्थलांतरित लोकांना सुखरूप बाहेर काढणे ही त्या वेळच्या सरकारची जबाबदारी होती. पाकिस्तानी सरकारवर फाजिल विश्वास ठेऊन ह्या लोकांना स्थलांतरित होउ दिले. परिणाम हजारो लोक मारले गेले. हजारो स्त्रियांवर बलात्कार झाले. गांधीजींच्या बाजूने बोलणाऱ्या लोकांनी स्वताला या परिस्थितीत कल्पुन बघावे मग याची भीषणता लक्षात येईल. एका रात्रित तुमचे सर्वस्व जाते वर भर म्हणुन तुमच्च्या ईज्जतीचे धिंडवड़े देखिल निघतात. ही सर्वस्व गमावली गेलेली माणसे जेव्हा दिल्लीत आलि तेव्हा त्यांनी अनेक मंदिरातून , मशिदीतून आश्रय घेतला तेव्हा ऐन थंडीत त्यांना मुस्लमानाच्या भावना दुखावतात म्हणुन बाहेर काढण्यात आले व हे गांधीजींच्या आदेशानुसार झाले.
महात्मा बनण्यासाठी गांधीजीनि फार मोठी किमंत देशाला मोजायला लावली आहे. या गोष्टीचा अनेक वेळा उहापोह झालेला आहे. मी काही वेगळे सांगत नाही आहे.
- Log in or register to post comments
म
मोगा
Sat, 01/30/2016 - 08:04
नवीन
त्यावेळचं सरकार म्हणजे नेमकं कोणतं ? इंग्रज , की काँग्रेस ?
फाळणी झाली भारताची वाटणी भारताला आली , पाकिस्तानची त्याना गेली... मग पाकिस्तानच्या हद्दीतील लोकांना भारतातले सरकार नेमकी कशी मदत करणार होते ? भारताच्या हद्दीत आल्यावर भारत सरकारची जबाबदारी सुरु होणार ना ?
त्यावेळी पाकिस्तान हद्दीत संघाच्या शाखा नव्हत्या का ? ते काय करत होते ?
पाकिस्तानच्या हद्दीत दंगल होउन लोक मेले तरी काँग्रेस व गांधीजी जबाबदार ! मग काश्मीर दंगलीला जबाबदार कोण ? काश्मीरचा राजा - रामसिंग की कोण , तो काय ?
- Log in or register to post comments
म
मोगा
Sat, 01/30/2016 - 06:42
नवीन
भगतसिंग, सावरकर तसेच इतर असंख्य क्रांतिकारक ज्याच्याविषयी गांधीजीनि आकस दाखवला ते मला नेहमीच परके वाटतील
....
नेमका काय आकस दाखवला म्हणे ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 01/30/2016 - 07:08
नवीन
गांधीवादी जे सांगतात ते व्यक्तिपुजेशी संबंधीत आहे, व्यक्तीपुजा भारतात फार कॉमन आहे. जे गांधींचा द्वेष करतात तेही कुठल्यातरी व्यक्तीचे पूजक आहेतच. उदा: सावरकरवादी, गोडसेवादी, हिटलरवादी, बोसवादी, आंबेडकरवादी, इत्यादी. कुणाच्या काही म्हटल्याने गुणगान केल्याने 'आजच्या परिस्थितीत' काय फरक पडतो? असे गुणगान गल्लोगल्लीच्या देवदेवतांबद्दलही, नेत्या-पुढार्यांबद्दल केले जाते. त्याबद्दल असे तीव्र आक्षेप कधीच येत नाहीत. गांधींबद्दल विचार करतांनाच पराकोटीची घृणा का दिसत असावी?
परत तेच. काँग्रेस उदोउदो करणारच. तो एक पक्ष आहे. प्रत्येक पक्ष आपल्या नेत्याच्या योगदानाबद्दल उदो उदो करतो व इतरांचे योगदान विसरले गेले पाहिजे असे प्रयत्न करतो. जसे आत्ता भाजप + संबंधित पक्ष, संस्था करत आहे. त्यात काँग्रेसला विलन ठरवणे संयुक्तिक वाटत नाही.
ज्या अधिकाराने आपण कॉंगेसला गाढव म्हणताय त्याच अधिकाराने त्यांना सावरकरांना देशभक्त न मानण्याची सवलत आहे. ज्याप्रकारे आपण सावरकरांचे चाहते आहात तसे ते विरोधक असू शकतात, त्याबद्दल आक्षेप एक भारतीय म्हणून का असावा?
प्रत्येकाचा आपला प्रोपगंडा असतो. विचार असतो, मत असते. आपल्याला पटते ते मत आपल्याला सत्य वाटते. तुमच्याच लॉजिकने सावरकरवादी गांधीवाद्यांना अनाडी वाटू शकतात.
स्वातंत्र्यासाठी जर गांधी एकमेव जबाबदार नाहीत तर फाळणीसाठी कसे जबाबदार धरल्या जातात? म्हणजे जे चांगले झाले त्यात गांधींना सामील करण्यात आक्षेप, जे वाईट झाले त्यास सर्वस्वी गांधी जबाबदार हा कोणता न्याय?
गांधीहत्या ही चूक की बरोबर याबद्दल आपले वैयक्तिक मत काय? जशी गुजरात दंगल ही गोध्राची उस्फूर्त व विचारहीन प्रतिक्रिया म्हणून मानले जाते, त्याच प्रमाणे हे घरे जाळणे प्रकरण समजावे काय?
भारताला स्वातंत्र्य मिळण्यात एकटे कुणीच जबाबदार नाही, बदलती जागतिक परिस्थिती ही जास्त जबाबदार होती. अन्यथा दक्षिण आफ्रिकेस स्वातंत्र्य मिळण्यास १९९४ उजाडले नसते.
गांधींजींबद्दल जो द्वेष आहेत त्याचे मूळ भलतीकडेच आहे, भगतसिंग, सावरकर वैगरे कारणे वरवरची आहेत.
- Log in or register to post comments
र
राँर्बट
Sat, 01/30/2016 - 16:33
नवीन
दक्षिण आफ्रीकेला स्वातंत्र्य १९९४ मध्ये?
दक्षिण आफ्रीका कितीतरी आधीपासून स्वतंत्र देशच होता. तिथल्या वर्णद्वेषी धोरणाला मूठमाती देण्यात आली असं म्हणा हवंतर. आणि ते सुद्धा १९९० मध्ये.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 01/30/2016 - 16:50
नवीन
सॉरी, काही गडबड झाली का? तो कधी स्वतंत्र झाला व कुणापासून?
- Log in or register to post comments
म
मोगा
Sun, 01/31/2016 - 03:06
नवीन
शालेय इतिहासात स्वातंत्र्याची चार कारणे दिली आहेत.
१. मवाळ , गांधी काँग्रेस इ नी केलेली आंदोलने
२. जहालांकडुन झालेला विरोध
३. महयुद्धामुळे इंग्रज खिळखिळे झाले.
४. सैन्याचे बंड.
फक्त गांधीजींमुळे स्वातंत्र्य मिळाले , असे कुठेही शिकवले जात नाही.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sat, 01/30/2016 - 07:50
नवीन
आमचे अंतुशेठ सांगतात "स्वराज्याचा संबंध गांधिंशीही नाही टिळकांशीही नाही आणि सावरकरांशीही नाही. इंग्रज गेला तो कंटाळुन. आहो लुटण्यासारखं काय शिल्लक का होता इथे? धंदा बुडीत खाती जायला लागला म्हणून फुकलन दिवाळं. कुंभार मडकी घेउन गेला तुम्ही फुंका उकिरडा, हे सगळे चक्रनेमिक्रमेण होते. सत्ता इंग्रजाचीही नाही, नेहरुचीही नाही आणि जनतेचेही नाही. सत्ता आहे विश्वेश्वराची. "
पुलंचा पंखा
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 01/30/2016 - 08:11
नवीन
येकच नंबर... अंतुशेठ जिन्दाबाद!
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sat, 01/30/2016 - 08:26
नवीन
साल्या ह्या इतिहासाच्या पुस्तकानि शाळंत जीव नकुसा केला व्हता.
ते वर मोगा संघाच्या नावाने बोम्बलतंय,
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 01/30/2016 - 08:47
नवीन
+ १...
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 01/30/2016 - 18:35
नवीन
बाडीस,
- Log in or register to post comments
म
मोगा
Sun, 01/31/2016 - 03:10
नवीन
अंतुशेटचे बोलवते धनी देशपांडे होते.
देशपांडे गेले आणि अंतुच्या हाकाही बंद पडल्या.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 01/30/2016 - 08:41
नवीन
इंग्रजांच्या साम्राज्याचा सूर्य मावळायला लागला तो...हिटलरमुळे...स्वतःच्या घराला सावरायला म्हणून इंग्रजांनी, आपली माणसे परत नेली आणि भारताला वार्यावर सोडले....
एक काडी अज्जुन टाकतो.....
...हिटलरचा विजय झाला असता तर भारतावर जर्मनीचे किंवा जपानचे राज्य आले असते आणि ते तर जास्तच घातक ठरले असते...
बाकी चालू द्यात.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 01/30/2016 - 08:50
नवीन
तसे जर झाले असते तर आज करवादणार्या पिढीने काय केले असते ह्याचा विचार करतोय. =))
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Sat, 01/30/2016 - 16:53
नवीन
अहिंसक आंदोलन वगैरे ला कुणी हिंग लाऊन विचारले नसते ...
शुध्द हुकुमशाहीची चव घेता आली असती ...
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 01/30/2016 - 17:18
नवीन
+ १
आजतरी कोण विचारतो? ट्रकभर पुरावे देणारे खैरनार गेले, अण्णा हजारे यांची आंदोलने थंडावली, सलमान खानच्या अंगरक्षकाचे नामोनिशाण उरले नाही.एखाद्या जिल्हाधिकार्याने लोकसेवेचे व्रत कठोरपणे राबवायला सुरुवात केली की त्याची बदली ठरलेलीच.
---------------------------------
"शुध्द हुकुमशाहीची चव घेता आली असती ..."
शक्यच नाही....
कारण आम्ही जन्माला पण नसतो आलो.ज्यू लोकांनंतर इतर धर्मीयांचा नंबर होताच.स्वस्तिक उलटा असला तरी, हिटलरचे आणि त्याच्या नंतर येणार्या गेस्टापोंचे धोरण, इतर धर्मीयांचा नायनाट, असेच असते.
फरक इतकाच की युरोपपेक्षा भारतात गॅस चेंबरची संख्या सगळ्यात जास्त असती.
स्वगत मोड ऑन--------
परत एकदा हॅरी पॉटर मधले वाक्य आठवले, आधी मगलू, मग रक्ताचा घात करणारी, शेवटी उरतील ती फक्त पाणभक्षी मंडळी.हिटलरही टॉम रीडलपेक्षा वेगळा न्हवता.हॅरीला मदत करण्यासाठी इतर मित्र मंडळी तरी होती.भारताच्या बाबतीत ती पण गोष्ट कठीणच.अद्याप आपल्याला उत्तम शेजार पण मिळाला नाही, परदेशांची तर गोष्टच सोडा.
हिंदू धर्मीय नेपाळ असो, किंवा बौद्ध धर्मीय श्रीलंका असो.
नेभळट आणि दुर्बळ राष्ट्राला मित्र नसतात, इति कौटिल्य.
---------
स्वगत मोड ऑफ.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 01/30/2016 - 18:34
नवीन
.....आणीबाणी बरी होती की मग?
- Log in or register to post comments
म
मोगा
Sun, 01/31/2016 - 03:12
नवीन
मोघलाना संताजी धनाजी दिसायचे दिवसरात्र .
तसे हिंदुत्ववाद्याना अजुनही - पूर्ण बहुमतात मोदी येऊनही - नेहरु व गांधी दिसत रहातात
- Log in or register to post comments
अ
अन्नू
Mon, 02/01/2016 - 18:40
नवीन
जाने कितने झूले थे फाँसी पर, कितनो ने
गोली खाई थी |
क्यो झूठ बोलते हो साहब, कि चरखे से
आजादी आई थी ||
चरखा हरदम खामोश रहा, और अंत देश
को बांट दिया |
लाखों बेघर,लाखो मर गए, जब गाँधी ने
बंदरबाँट किया ||
जिन्ना के हिस्से पाक गया , नेहरू को
हिन्दुस्तान मिला |
जो जान लुटा गए भारत पर, उन्हे ढंग
का न सम्मान मिला ||
इन्ही सियासी लोगों ने, शेखर को भी
आतंकी बतलाया था |
रोया अलफ्रेड पार्क था उस दिन, एक
एक पत्ता थर्राया था ||
जो देश के लिए जिये मरे और फाँसी के
फंदे पर झूल गए |
हमें कजरे गजरे तो याद रहे, पर अमर
पुरोधा हम भूल गए ||
- Log in or register to post comments
म
मोगा
Tue, 02/02/2016 - 04:48
नवीन
गांधीजींचा जयजयकार मान्य नसेल तर उत्तर ध्रुवावर जाऊन रहावे.
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Tue, 02/02/2016 - 06:53
नवीन
वाचा (सर्व पटलं पाहिजे असं नाही)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/02/2016 - 08:15
नवीन
आमच्या लेखी
दोघांचाही वाटा समसमान आहे!
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 02/02/2016 - 08:28
नवीन
याच्या इतका निर्बुद्ध प्रश्न ऐकला नाही.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 02/02/2016 - 08:44
नवीन
मलातरी इंग्रजांचा वाटतो. अहो त्यांनी भारताला पारतंत्र्यात टाकल म्हणून तर आपलं स्वातंत्र्य मिळवता आलं न?
:D
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Tue, 02/02/2016 - 09:09
नवीन
मला वाटतं भारतीयांच्या इंग्रजीचा मोठा वाटा आहे - भारतीय लोक चुकिचं इंग्रजी बोलायला लागले आणि गोर्या साहेबाचं कन्फ्यूजन झालं - ह्यांचं बरोबर की आपलं? त्याच रागा-वैतागात गोरा साहेब पळून गेला. what is and what is not? (हाकानाका).
मोठमोठ्या पोस्टरांवरचे हिंदी मालिकांचे / पिच्चरांचे शीर्षक इंग्रजीतून वाचतांना साहेबाच्या आजच्या पिढीतला माणूस पण वाचता-वाचता पडायचा तिच्यायला -
Maine Pyaar Kiya
Hum Aapake Dil Mein Rahete Hain
Saans Bhee Kabhee Bahu Thee
Darr
Mann
हे कसं वाचत असतील इंग्रज भारतात आल्या नंतर :)
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Tue, 02/02/2016 - 10:00
नवीन
'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' आठवला :)
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 02/02/2016 - 10:07
नवीन
माईने प्यार किया
हुम आपाके डिल मेइन रहेते हाईन
सान्स भी काभी बाहु थीऽ
दार्र
मन्न
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 02/02/2016 - 09:59
नवीन
हत्तीचा वाटा , वाघाचा वाटा यांवर देखील धागा येउ द्या
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Tue, 02/02/2016 - 10:16
नवीन
आपण काहि दिग्गज नाय बॉ त्यामळे ह्या विषयावर आपला पास्...तरि पण आलोय तर हि एक आवडति जुनि जाहिरात :)
पोरी ये पोरी, पाव्हणं आलं बघ.... खरतर माह्या घरची लक्षमी व्हायची , पण मी हिला सून म्हणून आणली, हि साधी लक्षमी न्हाही , वनलक्षमी हाये वनलक्षमी !! गुरांना चारा, जळणाला लाकूड, गाठीला पैका घरच्या घरी.. सामाजिक वनीकरण येता दारी !
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Tue, 02/02/2016 - 10:33
नवीन
अर्रर्र... मी पण "दिग्गज" नाही हे लिहायला विसरलोच होतो माझ्या प्रतिसादात. तसा डिस्क्लेमर आहे असं समजा मंडळी :)
होबासराव, तुमचा प्रतिसाद वाचून बरं झालं लक्षात आलं, नाहीतर लोक मला "दिग्गज" समजायला लागले असते तर? काय इमेज झाली असती माझी चार लोकांत :):):)
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Tue, 02/02/2016 - 10:36
नवीन
इथे डकवली राव्...एक दोन शब्द एक सामान्य दर्शक म्हणुन मांडा कि ?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2