Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ड्रींक्सचं प्रमाण किती असावं ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/30/2016 - 15:32
🗣 280 प्रतिसाद
नमस्कार मंड़ळी, मंडळी, आयुष्य मोठ्या गमतीदार गोष्टींनी खच्चून भरलेलं आहे. माणसाच्या आयुष्यात कोणती गोष्ट कधी येईल काही सांगता येत नाही. माणुस हा समाजशील प्राणी आहे. माणसात रमणे हा त्याचा स्वभाव आहे. ओळख, मैत्री, प्रेम, कुटुंब अशा अनेक गोष्टींमधे एकमेकांना चिकटून असतो. पण कधी कधी कोणाच्याही आधाराशिवाय माणसानं जगायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी कोणाचा आधार काढून तुम्हाला एकट्याला सोडुन स्वतः मजेत राहील याची काही गॅरंटी नाही. आणि मग एकटं वाटायला लागलं की आधारासाठी अनेक गोष्टींचा आयुष्यात प्रवास सुरु होतो. अशाच एका आयुष्यात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी मित्र म्हणतो 'घे रे कै होत नै' 'एक प्याक घे' 'बरं दोन थेंब घे' 'आनंदाचा प्रसंग आहे, नाही म्हणू नको यार' 'प्रमोशन झालंय तुझं बाकीच्यांचा डिसमुड करु नको' 'आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच प्यालाची' आयुष्यात सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा पेयपानाचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. व्यसनाधीन होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकुटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात म्हणजे ऑफीस, मित्र, वेगवेगळ्या पार्ट्या, यात एक ६० एम.एल. म्हणा किंवा वाईन म्हणा एखादा दोन पेग घेतला की पार्टी इंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात ड्रिंक्स आरोग्यासाठी चालु शकतं ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे ? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी घ्यावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण घेऊच नये ना ? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त आयुष्य, बैठे काम, आणि विविध आजार हे सोबत असतांना पेयाचं प्रमाण किती असलं पाहिजे ? वाईन घ्यावी की न घ्यावी ? व्हिस्की /रम ? अशा विविध ब्रँड आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणनं दोन चार दीर्घ प्रतिसादात विविध मुद्द्यांसहित आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांचा रतीब पाडण्यापेक्षा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण आलं तर भरल्या मैफिलीत कोणाचं तरी प्रबोधन करता आलं तर त्याचा फायदा अनेक मित्र मैत्रींनींना होईल म्हणुन हा काथ्याकुटाचा प्रपंच. ता.क. मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे. उगं माझ्याकडे संशयाने पाहु नये. धन्यवाद. खुलासा संपला.

प्रतिक्रिया द्या
77605 वाचन

💬 प्रतिसाद (280)
अ
अभ्या.. Sat, 01/30/2016 - 15:44 नवीन
मी पयला (तुम्ही बोलावलत तर) बाकी आठवड्यातून एकदा निवांत बसावं. ९० मिली रेड रम घ्यावी. (ओल्डमंकास पर्याय नको) सगळ्या डोक्याला तरास करणार्‍यांच्या नावाने एकच होलसेल शिमगा करावा. रमची चव पुसट होताहोता कचकून जेवण हानावं. सकाळी डोस्कं अन पोट सगळं साफ. :) येतेय का कोण आज? . . आमच्या अत्यंत प्रिय अन सदैव तत्वज्ञानाच्या नशेत टुल्ल असणार्‍या मित्राने दिलेले (वस्तुस्थितीदर्शक नसले तरी) बेवडा हे नामाभिधान आम्हास आवडले आहे. .
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Sat, 01/30/2016 - 16:26 नवीन
जबराच अन खतराच परतिसाद... कंदी येतो बोल अभ्या... तुमच्यासाटी काय पन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 01/30/2016 - 16:41 नवीन
बाकी ड्रायडेचा मुहूर्त साधून हां धागा टाकण्याच्या समयसूचकतेचे कौतुक. आज गांधीजी पुण्यतिथि.;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अद्द्या Sat, 01/30/2016 - 21:33 नवीन
अभ्या साल्या . . येतोय फेब्रुवारीत मी सोलापूरला . . तव बसू जरा म्हातारा सन्याशी घेऊन . ऑफिसातले साले पुळचट आहेत एक एक . बियर पाइण्ट मध्ये औट होतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सतिश गावडे Sun, 01/31/2016 - 04:25 नवीन
आमचा सोलापूरातील वार्ताहर कळवतो की मा. अभ्या डॉट डॉट यांनी यापुढे वृद्ध संन्याशाची भेट घेणार नाही असे जाहीर केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
अ
अभ्या.. Sun, 01/31/2016 - 08:17 नवीन
कोण गावड़े? कोण वार्ताहर? कोण अभ्या डॉट डॉट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sun, 01/31/2016 - 08:28 नवीन
कालच्या नाईंटीचा महिमा संपला नाही वाटतं अजून. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sun, 01/31/2016 - 08:31 नवीन
अरे ड्राय डे होता बे काल. तुला कुठे मिळाली ते सांग आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sun, 01/31/2016 - 08:42 नवीन
मी तीस डिसेंबरला एकदम आयुष्यभराचा स्टॉक आणून ठेवला आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sun, 01/31/2016 - 08:44 नवीन
अशा आशावाद्यामुळेच मल्ल्याच्या धंद्याला मरण नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sun, 01/31/2016 - 08:53 नवीन
Image removed. आम्हाला ही जर्मन कन्या भेटल्यावर मल्ल्याच्या पोरीला आम्ही टाटा बाय बाय केला होता. आता विरक्तीमुळे हिलाही निरोप दिला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सर्वसामान्य Sun, 01/31/2016 - 09:52 नवीन
डेन्मार्कची आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sun, 01/31/2016 - 13:30 नवीन
धन्यवाद. आम्ही आजवर जर्मनच समजत होतो. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसामान्य
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 01/31/2016 - 17:21 नवीन
हे आहेत जर्मन बियर ब्रँड्स... Oettinger Krombacher Bitburger Beck's 2.78 Warsteiner Hasseröder Veltins 2.72 Paulaner Radeberger Erdinger आणि हे डच... Image removed. यातली दोघींच्या डोक्यावर बसलेली आमची लाडकी आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
आ
आदूबाळ Sun, 01/31/2016 - 21:44 नवीन
काका, ला त्राप (la trappe) वगैरे बेल्जीयन बियरही चाखून पहा. नंबर एक असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मैत्र Tue, 02/02/2016 - 16:46 नवीन
बेल्जियन बिअर सर्वात उत्तम असतात हा नेदरलँड्स मध्ये शोध लागला होता. 1. Leffe 2. Duvel 3. Trappist 4. La Trappe 5. hoegaarden
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अभ्या.. Tue, 02/02/2016 - 16:49 नवीन
ऑनलाईन मागवता येतात का? इमानातून किती घेऊन (बॅगेत) येता येते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Tue, 02/02/2016 - 18:55 नवीन
होगार्डन परळच्या फीनिक्स मिलमध्ये असलेल्या "स्पोर्ट्स बार" मध्ये मिळते हे नक्की. ऑनलाईन मागवता येतात का ते माहीत नाही. इमानातून आणायला "माणशी दोन बाटल्या" हा नियम आहे वाटतं. मग तुम्ही हार्ड ड्रिंक आणा किंवा बियर. बाकी मैत्रभाऊ आणि मी दोघेही नेदरलँड्सच्या माहेरवाशिणी असल्यामुळे बेल्जियन बियरची आवड जुळली यात नवल नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sun, 01/31/2016 - 08:15 नवीन
बर्री सावकारु. मुत्त्यास्वामी इज वेटिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
स
सुबोध खरे Sat, 01/30/2016 - 15:48 नवीन
मागे यावर बराच काथ्याकुट झाला आहे. मी माझे मत दिले होते. लोकांनी बरीच टीका केली होती. आता टंकाळा आहे तेंव्हा कोणी त्या धाग्याचा दुवा शोधला तर बरे होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 01/30/2016 - 15:53 नवीन
काथ्या कूटतांना तुम्हीच उत्तर लिहावं अशाच अपेक्षेने हा प्रपंच केला आहे. कंटाळा करू नका. एकच प्रतिसाद लिहा पण भारी लिहा. प्रत्येकाला उत्तर लिहित बसू नका. सवडीने लिहा पण या धाग्यावर जरूर लिहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मन१ Sat, 01/30/2016 - 17:53 नवीन
http://www.misalpav.com/node/24149 हा धागा म्हणताय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
उ
उगा काहितरीच Sat, 01/30/2016 - 15:56 नवीन
माझे वैयक्तिक मत असे आहे की दारू ( किंवा कोणतेही व्यसन ) सोडण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे पहिल्या पेल्याच्या अगोदर. बस! बाकी धाग्यावर लक्ष ठेवून आहेच. - (आत्तापर्यंत तरी दारू, सिगारेट पासून कोसो दूर असलेला) उका.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 02/02/2016 - 07:23 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ग
गवि Sat, 01/30/2016 - 16:00 नवीन
मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे.
चार हात दुरुन ग्लास, बर्फ, खाद्य कसं मॅनेज करता याचं कौतुक आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 01/30/2016 - 18:52 नवीन
क्या तो केहते तो उनो गविमिया? साकीया क्या कुछ तो है ओ लफडा. वैसाच कुछ रह्येंगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ख
खटासि खट Sat, 01/30/2016 - 16:01 नवीन
जेव्हां ड्रिंक्सशिवाय हातपाय थरथरू लागतील तोपर्यंत घ्यायला हरकत नाही..
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 01/30/2016 - 16:03 नवीन
शिव ...शिव..शिव..;)
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 01/30/2016 - 16:06 नवीन
शिवास असं पूर्ण म्हणण्याच्या प्रयत्नात अडकून बसले आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
स्पा Sat, 01/30/2016 - 16:14 नवीन
दारु आली की गवि हटकून येतात :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Sat, 01/30/2016 - 16:24 नवीन
आलास मेल्या.? बस आता. सरकून घेतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/31/2016 - 14:56 नवीन
@दारु आली की गवि हटकून येतात :D >> आणि असा प्रतिसाद आला.., की पांडू! ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सतिश गावडे Sun, 01/31/2016 - 18:24 नवीन
आणि पांडू आला की बुवा येतात. आम्हाला वाटले आता तरी थांबेल ते. तर कसलं काय. जुन्या सवयी अशा सहजासहजी सुटतात होय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Sun, 01/31/2016 - 18:28 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
न
नाखु Mon, 02/01/2016 - 04:10 नवीन
ती ओवी सांगाना सटीप. पडीले वळण ..................... रसाळ व्याखानाचा श्रोता नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बॅटमॅन Tue, 02/02/2016 - 08:44 नवीन
ह्या ह्या ह्या ह्या, ही ह्ही, ही ह्ही, ही ह्ही, ही ह्ही =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 01/30/2016 - 16:22 नवीन
पार्टी ऑफिसर्स मेस ला असो वा एखाद्या मित्राची बॅचलर्स पार्टी असो कुठली ही असो आपले प्रमाण फिक्स आहे पिणार फ़क्त स्कॉच किंवा डार्क रम त्यातही स्कॉच ब्लेंड वगैरे पिणार नाही कधीच (वनवासाला सीताफळ न्यायाने एकेकाळी आम्ही सगळ्या देशी विदेशी एक्सपेरिमेंट केल्या आहेत) तर प्यायची असली तर फ़क्त स्कॉच ती सुद्धा फ़क्त ग्लेनफिड्डीच असली तरच मस्त एक लार्ज घ्यावा त्यात गारेगार २ स्कॉच स्टोन्स सोडावे मग खरपुस भाजलेली कोंबड़ीची टंगड़ी घेऊन कोपर्यात बसावे तोच पेग माइक्रो सिप घेत आजुबाजूची मंडळी त्यांची ढोसे पर्यंत चालवावा नंतर हलके फुलके काही खाऊन पड़ी मारावी रम असल्यास एक लार्ज + एक स्मॉल घ्यावा सोबत बॉयल्ड एग्स किंवा अंडा पकोड़ा असावा पण रम फ़क्त न फ़क्त ओल्ड मोंकच! बाकी अगदीच ओल्डमोंक नसल्यास कॉन्टेसा चालवुन घेतो पण ते मॅकडोवल वगैरे होमेओपेथिक औषधाच्या चवीचे लाल पाणी अजिबात नाही!!जेवण हलके घ्यावे अन मग पड़ी मारावी
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sat, 01/30/2016 - 16:58 नवीन
क्या बात है!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
शैलेन्द्र Sun, 01/31/2016 - 16:04 नवीन
Gotra same aahe aapale..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 02/02/2016 - 07:27 नवीन
कॉन्टेसा मिळतच नाहीये हो हल्ली! हळहळ. बाकी रमसोबत मुंग दाल + मिरची + टमाटे + चाट मसाला आदींचा मसाला अप्रतिम कोम्बो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 02/02/2016 - 07:29 नवीन
हाय कम्बख्त अनिरुद्ध भाऊ क्या याद निकाली है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 02/02/2016 - 08:31 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
य
यमगर्निकर Tue, 02/02/2016 - 08:25 नवीन
१ च नंबर :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अनंत छंदी Sat, 01/30/2016 - 16:27 नवीन
ते सोत्रि कुठे गेले? दारूच्या प्रकारांबरोबरच प्रमाणही माहीत असेल त्यांना. ;))
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 01/30/2016 - 16:35 नवीन
सोत्रि आमचे मद्य गुरु!! _____/\_____
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 01/30/2016 - 17:00 नवीन
खुशवंत सिंग रोज ६० प्यायचे म्हणे. ९९ वर्ष जगले. एका डायटिशनने दारू वाईट नाही पण चकल्या/शेव्/वेफर्स हा चकणा बराच घातक असं सांगितलं होतं. बिना (असला) चकणा थोडी दारू फार वाईट नसावी.
  • Log in or register to post comments
स
सायकलस्वार Mon, 02/01/2016 - 20:34 नवीन
बरं मग? मोरारजीसुद्धा ९९ वर्षं जगले होते. नशीब कोणी त्यांचा दाखला दिला नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Tue, 02/02/2016 - 07:17 नवीन
तुम्ही काढा शिवांबूवर धागा. त्यावर देईल कोणीतरी तुम्हाला पाहिजे ती प्रतिक्रिया. दारूच्या धाग्यावर दारूऐवजी शिवांबू प्या असा सल्ला कोण देईल? उगाच कायतरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायकलस्वार
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 02/02/2016 - 07:20 नवीन
चियर्स अनूप भाऊ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
आ
आदूबाळ Sat, 01/30/2016 - 17:02 नवीन
ओल्ड मंकास पर्याय नाही याबद्दल अभ्या आणि बापूसो यांजशी बालके आदूबाळ सहमत आहे. दुसरा आवडता प्रकार म्हणजे जॅक डॅनियल्स. हेच मिपानाम घेतलेले आमचे परममित्र सध्या भेटत नसल्याने हा योग सहसा येत नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा