चाक उलटे फिरवावे का ?
पुन्हा कुठल्याश्या वाहिनीवर स्मार्ट सिटी विषयक चर्चा चालु होती. सहभागात काँग्रेसचे नेते भाई जगताप, विवेक वेलणकर आणि शहररचनाकार महाजन मॅडम होत्या.
महाजन मॅडम सांगत होत्या की स्मार्ट सिटी घडवायची असेल तर सुरवातीला पायलट प्रोजेक्ट करायला हवा. तो सुध्दा पुण्यातल्या औंध, सकाळनगर, बावधन, पाषाण भागात कारण हे नविन पुणे आहे जे नगररचने नुसाल वसवले गेले आहे ज्यात मुळातल्या समस्या कमी आहेत.
पाच वर्षांत याची फळे दिसतील आणि मग ती इतर भागात कॉपी करता येतील.
विवेक वेलणकर म्हणाले की मग अश्या रितीने सर्व शहरे स्मार्ट होण्यासाठी कदाचित ५० वर्षे लागतील हे काही बरोबर नाही. यावर मॅडम म्हणाल्या की मुळ पुण्यातला रहदारीचा/ वहातुकीचा प्रश्न बिकट आहे. यावर तोडगा जर लोक मान्य करतील तर असा आहे की मुळ शहराच्या २ चौरस किलिमीटर परिसरात मोटर कार चालवायचीच नाही. यावर त्यांनी अनेक पाश्चात्य देशातील शहरांचा उहापोह केला जेथे कार वापरण्यास बंदी आहे.
प्रश्न असा आहे की अधुनिकता म्हणजे प्रगती असेल तर हे चाक उलटे फिरवता येईल का?
खेड्यात जा असा महात्मा गांधींनी संदेश देऊनही भारतात शहरांचाच विकास झाला परिणामी नोकर्या निर्माण झाल्या आणि जगाच्या इतिहासाप्रमाणेच भारताचे पण खेड्याकडुन शहराकडे पुनर्वसन झाले.
सगळ्याच्या मुळाशी लोकसंख्या, अपुरी नैसर्गीक साधने आणि जगाकडे पाहुन आपला विकास काय तो ठरवण्याची वृत्ती यातुन मार्ग कसा काढायचा ?
💬 प्रतिसाद
(3)
उ
उगा काहितरीच
Mon, 02/01/2016 - 06:38
नवीन
चांगली चर्चा होऊ शकते. अवांतर टाळले तर (च)!
- Log in or register to post comments
ग
गॅरी शोमन
Mon, 02/01/2016 - 07:41
नवीन
नितीनचंद्र
तुम्हाला इथे कायमच अर्धचंद्र मिळणार.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/01/2016 - 07:57
नवीन
जगात कुठे कुठे काय काय चांगले केले गेले आहे याची माहिती असणे उत्तमच... त्यातून योग्य ते उचलून आणि आपल्या सद्य परिस्थितीअनुरुप अजून भर घालून मग जो सर्वोत्तम उपाय असेल तो इथे व्यवहारात आणला पाहिजे.
जगातले सर्वोत्तम, जगात सर्वच ठिकाणी (आणि आपल्या ठिकाणी) सर्वोत्तम परिणाम देईलच असे नाही !/strong>
त्यासाठी आपल्या सद्य परिस्थितीचा सर्वंकष विचार करून त्याला योग्य असा उपाय करायला पाहिजे... इतर ठिकाणची कॉपी पेस्ट नाही.
असे विचार जेव्हा आपण करू, तेव्हाच भारताला उत्त्तम उपाय सापडतील आणि इतर जग आपल्याला अनुयाई नाही तर नेत्याच्या रुपात पहायला सुरुवात करेल.
- Log in or register to post comments